Maharashtra Free Health Treatment : राज्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना मिळणार मोफत उपचार

Maharashtra Free Health Treatment : मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला
bed
bed e sakal
Updated on

Maharashtra Free Health Treatment : संपूर्ण राज्याच्या विचार केला तर अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे यापुढे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील गरीब गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे सर्वच रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

bed
Ambarnath News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ; आता पावसाळ्यात तुम्ही 'या' ठिकाणी जाऊ शकता फिरायला

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून त्यांना मोठे यश मिळाले आहे.

bed
Yawning & Health : सतत येणाऱ्या जांभईकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल; वेळीच ओळखा हे आजार

भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार आहे. त्यानुसार आजचा हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital - नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटल नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहे.

bed
MUM vs GUJ WPL: हरमनच्या वादळात गुजरातचा पालापाचोळा! मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

सध्या या सर्व रुग्णालयांमध्ये वर्षभरात सरासरी अडीच कोटी नागरिक उपचार घेण्यासाठी येत असतात. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २५१८ शाखा आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांना निशुल्क उपचार मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.