CM Eknath Shinde : राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक शासकीय कार्यालयात बेरोजगारांना 'इंटर्नशीप'ची मिळणार संधी; 'एवढं' मिळेल मानधन...

Government Decision : बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्देश देत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र बहिणींना संधी मिळणार आहे. लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून आता उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
cm eknath shinde
cm eknath shindeSakal
Updated on

Maharashtra Government : प्रत्येक शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय कार्यालयामध्ये मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.

बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्देश देत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र बहिणींना संधी मिळणार आहे. लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून आता उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

cm eknath shinde
Maharashtra flood situation Gadchiroli: पुणेचं नाही तर गडचिरोलीला पावसाने झोडपले, तब्बल 50 मार्ग बंद! आवश्यक गोष्टींचा तुटवडा

''राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उद्योगांनाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी ही मोठी संधी आहे. उमेदवाराला अनुभव चांगला अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या उमेदवारांना आपण शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार रुपये, आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये असे विद्यावेतन देणार आहोत.'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योगांसह, सहकारी बँका, कृषी सहकारी पतसंस्था याठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिणार्थींना संधी मिळणार आहे असून त्यासाठी अशा रिक्त पदांची यादी करून त्या-त्या जिल्ह्यांमध्ये प्रशिणार्थींना संधी उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी ऑनलाईन तसेच ऑफ लाईन या दोन्ही पद्धतींने नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

cm eknath shinde
Pune Flood Viral Video: ओढ्याचा प्रवाह चिरत कारजवळ पोचले अन्.. प्रसंगावधानाने वाचवले कोहली पिता-पुत्राचे प्राण

जिल्हा रोजगार कार्यालये, जिल्हा उद्योग केंद्र आदींनी विशेष बाब म्हणून प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र यांपासून ते सिडको, एमएसआरडीसी यांच्यासारख्या स्वतंत्र प्राधिकरणांपासून ते सर्वच ठिकाणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना संधी देता येणार आहे. त्यासाठी या सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.