फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला - एकनाथ शिंदे

maharashtra government formation shivsena  eknath shinde on devendra fadanvis
maharashtra government formation shivsena eknath shinde on devendra fadanvis
Updated on

मुंबई : काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेगे आहे. आज सकाळीच एकनाथ शिंदे यांनी गोव्याहून मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर आज त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी घोषणा केली आहे, त्यानंतर बोलताना बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. (maharashtra government formation shivsena eknath shinde on devendra fadanvis)

मविआ सरकारमधले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अवघ्या काही वेळात त्यांचा शपथविधी होणार आहे. यादरम्यान त्यांनी भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, "आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. शिवसेना पक्ष म्हणून कायदेशीर प्रक्रीया करून शिवसेनेचे तसेच अपक्ष आमदार मिळून आम्ही गेले काही दिवस एकत्र आहोत."

अडीच वर्षापूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे, गेल्या काही काळामध्ये मुख्यमंत्र्‍यांना मतदारसंघातील समस्या विकास प्रकल्प याबाबत वारंवार माहिती दिली, दुरूस्तीची मागणी केली, अनेक वेळा चर्चा केली, पण मविआ बाबत आमदारांमध्ये नाराजी होती, मतदार संघातील प्रश्न पाहाता पुढच्या निवडणूक लढताना येणार्‍या अडचणी हे लक्षात घेत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले. आपण विरोधकांकडून सत्तेत जात आसतो पण मागील घटनाक्रम बघीतला तर सत्तेतून विरोधकांकडे जाण्याचा प्रकार घडला" असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

maharashtra government formation shivsena  eknath shinde on devendra fadanvis
शिंदे सरकारची ताकद किती? फडणवीसांनी आकडेच मांडले!

मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत होतो पण महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते, बाळासाहेंबांचं हिंदुत्व घेऊन पुढे जात असताना घेतलेल्या काही निर्णयाचं स्वागत आहे, पण हे पूर्वीच आपण करायला हवं असे शिंदे यावेळी म्हाणले. ५० आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ याचं कारणं याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. ५० लोक एकत्र आले, मला असलेल्या अडचणी सोडा पण या ५० जणांना मतदारसंघात येत असलेल्या अडचणी पहाता हा निर्णय घ्यावा लागला असेही शिंदे म्हणाले.

"आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

maharashtra government formation shivsena  eknath shinde on devendra fadanvis
Eknath Shinde: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री; साध्या शिवसैनिकाचा प्रवास

शिंदे म्हणाले की, "भाजपकडे १२० चं संख्याबळ आहे. असे असताना मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मनाचा मोठेपणा दाखवला यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद पाहिजे असं काही नव्हतं. जे घडलं ते वास्तव तुमच्यासमोर होतं, राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम आपण करू"

फडणवीसांचे आभार मानत, एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मिळणार नाही, ते मंत्रीमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी ते आमच्या सोबत आहेत असेही शिंदे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.