चिंताजनक! देशाची आर्थिक गरज भागवणाऱ्या महाराष्ट्रातील माता असुरक्षित, मागील पाच वर्षात ७५१६ महिलांचा मृत्यू

महाराष्ट्रात प्रसुती दरम्यान दगावणाऱ्या मातांची संख्या वाढली, विधानसभेत जाहीर करण्यात आली आकडेवारी
mother child
mother childgoogle
Updated on

Maternal Mortality Rate:महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आमदार विलास पोतनीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने धक्कादाय गोष्टीचा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात महिला प्रसुती मृत्यूची संख्या चिंताजनक ठरत आहे. गेल्या पाच वर्षात ७५१६ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

आमदार विलास पोतनीस यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने प्रसुती दरम्यान मृत्यू पावलेल्या महिलांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. या आकडेवारीनुसार, राज्यात सन २०१७ ते २०२२ या काळात एकूण ७५१६ महिलांचा मृत्यू झाला असून, प्रसुती दरम्यान १२९ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती यावेळी समोर आली.

या आकडेवारीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील आकडे सर्वांन्ना सुन्न करणारे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात २०१७मध्ये १८६ मातांचा मृत्यू झाला, २०१८मध्ये २३५ मातांचा मृत्यू ,२०१९मध्ये २६० मातांचा मृत्यू , २०२०मध्ये २०१ मातांचा मृत्यू, २०२१मध्ये ३२४ मातांचा मृत्यू तर, २०२२मध्ये (डिसेंबरपर्यंत) १६१ मातांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.(Latest Marathi News)

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही अनेक कारणांमुळे प्रसुती दरम्यान मातांचा मृत्यू होतोय ही अत्यंत वाईट बाब आहे. महाराष्ट्रातील काही दुर्गम भागात अजूनही पायाभुत सुविधांची कमतरता आहे. प्रसुती दरम्यान मृत्यूला अनेक कारणे आहे. वैद्यकिय सुविधांचा अभाव, गावामध्ये दवाखाना नसणे आणि असला तरी खुप लांब असणे, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न होणे, अशा अनेक कारणांचा समावेश आहे.

mother child
Devendra Fadanvis:फडणवीसांची मोठी घोषणा; लव-जिहादवर बनवणार कायदा, पोलिसांना दिले 'हे' आदेश

आजही दूर्गम भागात राहणाऱ्या महिला प्रसुतीसाठी दवाखान्यात न जाता, घरीच प्रसुती करतात. ज्यामध्ये स्वच्छता राखली न गेल्याने बाळाचा किंवा मातेचा मृत्यू होऊ शकते. दूर्गम भागात घरी प्रसुती करताना बाळाची नाळ कापताना, सर्वाधिक संसर्गजन्य रोगाचा किंवा इन्फेक्शनचा धोका उद्भवतो. (Latest Marathi News)

आंतरराष्ट्रीय संघटना संयुक्त राष्ट्र संघटनेने राष्ट्राच्या विकासासाठी १७ शास्वत विकास उद्दिष्टे जाहीर केली होती. या उद्दिष्टांमध्ये प्रसुती मृत्यू दर हे देखील एक शाश्वत उद्दिष्ट आहे.

mother child
Haryana Violence: हरियाणा हिंसाचाराची धग राजधानीत; बजरंग दल, VHP कडून दिल्ली-फरीदाबाद हायवे ब्लॉक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()