Devendra Fadanvis:फडणवीसांची मोठी घोषणा; लव-जिहादवर बनवणार कायदा, पोलिसांना दिले 'हे' आदेश

Love Jihad Law:महाराष्ट्र शासन देखील बाकीच्या भाजपशासित राज्यांसारखा लव-जिहादवर कायदा बनवण्यावर विचार करत आहे.
Love Jihad
Love Jihad Esakal
Updated on

Maharashtra Love Jihad Act:महाराष्ट्र शासन देखील बाकीच्या भाजपशासित राज्यांसारखा लव-जिहादवर कायदा बनवण्यावर विचार करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि.२ ऑगस्ट)म्हणाले की खोटी ओळख सांगून आंतर-धर्मीय लग्न करत हिंदू मुलींची फसवणूक होण्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलिसांसाठी एक प्रमाणित संचालन प्रक्रिया तयार करण्यासाठी सांगण्यात येणार आहे. फडणवीसांकडे गृह खातं देखील आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कथितरित्या एका मुलीला खोटी ओळख सांगून त्यांची दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करुन देण्यात आले. या प्रकरणाची विधानसभेत चर्चा झाली. या चर्चे दरम्यान फडणवीस यांनी घोषणा केली की पोलिसांना अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी एक प्रमाणित संचालन प्रक्रिया तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील.

उपमुख्यमंत्री सभागृहात म्हणाले की या मुद्द्यावर प्रत्येक पोलीस ठाण्याला संवेदनशील बाळगण्यास सांगितले जाईल आणि योग्य कारवाई करण्यात असक्षम राहिलेल्या अधिकाऱ्यांना याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

फडणवीसांनी स्पष्ट केले की, "जर कोणतीही सज्ञान मुलगी आपल्या धर्माच्या बाहेर लग्न करत असेल, तर कायदा तोपर्यंत काही करु शकतं नाही, जोपर्यंत आपली खोटी ओळख सांगून पुरुषाकडून तिची फसवणूक झाली नसेल."फडणवीस म्हणाले की ते पोलीस महानिर्देशकांना (डीजीपी)प्रमाणित संचालन प्रक्रिया तयार करण्याचे निर्देश देतील.(Latest Marathi News)

फडणवीसांनी सभागृहात सांगितले की याशिवाय महिलांना अंमली पदार्थ देऊन आणि खोटी ओळख सांगून लग्नासाठी तगादा लावण्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणांमध्ये वाचवलेल्या महिलांना गरजेनुसार मनोवैज्ञानिक उपचारही केले जातील.

Love Jihad
Haryana Violence: दंगलखोरांनी कार पेटवली; अशी झाली महिला न्यायाधिश आणि तीन वर्षाच्या लेकीची सुटका

फडणवीसांचे हे विधान जवळपास १ वर्षांनंतर आले आहे, जेव्हा ते म्हणाले होते की महाराष्ट्र शासन बाकीच्या राज्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा अभ्यास करुन योग्य निर्णय घेतला जाईल.

डिसेंबर,२०२२मध्ये भारतीय जनता पक्षाच्या या नेत्याने अशा प्रकरणांविरोधात एका कडक कायद्याची मागणी केली होती. त्यावेळी श्रद्धा वाळकर प्रकरणाबरोबचं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात 'लव-जिहाद'चे प्रकरणे समोर आले होते.

Love Jihad
Nitin Desai: 'त्यांच्या हातात स्टुडिओ देऊ नका',अखेरच्या ऑडीओ क्लिपमध्ये नितीन देसाईंची PM मोदींना भावनिक साद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.