Government Decision : सरकारला मद्यप्रेमींची काळजी! दर्जेदार दारु मिळावी, यासाठी जर्मनीहून मागवले महागडे ८९ यंत्र

राज्यातील 'मद्यप्रेमीं'ना रेस्टॉरंट आणि बारामध्ये दर्जेदार मद्य मिळावे, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशातून 'अँनटपार' नावाचे ८९ अत्याधुनिक यंत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातही प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला असून त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिली. अशा पद्धतीचे यंत्र घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहेत.
Government Decision
Government Decision esakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई: राज्यातील 'मद्यप्रेमीं'ना रेस्टॉरंट आणि बारामध्ये दर्जेदार मद्य मिळावे, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशातून 'अँटनपार' नावाचे ८९ अत्याधुनिक यंत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातही प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला असून त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिली. अशा पद्धतीचे यंत्र घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहेत.

मद्य निर्मिती आणि विक्रीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र राज्यातील परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये सर्रास मद्यात भेसळ सुरु असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे भेसळयुक्त मद्य मिळत असल्याचा तक्रारी दिवसेंदिवस वाढत जात आहे. याला आळा घालण्यासाठी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगीरी उंचावण्यासाठी जर्मन बनावटीचे अँनटपार मशीन घेण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता.

Government Decision
Rishabh Pant IPL 2024 : कदाचित जुना पंत आपल्याला दिसणार नाही... गावसकर असं का म्हणाले?

ही अत्याधुनिक तपास यंत्र मद्याची तीव्रता व प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. या आधुनिक यंत्रामुळे मद्याचे प्रमाण दोन ते तीन मिनिटांत शोधणे शक्य आहे. ही यंत्रे आता राज्य उत्पादन शुल्क विभाग खरेदी करणार असून प्रत्येक जिल्ह्यात ही यंत्रे दिली जाणार आहे. त्यामुळे भेसळयुक्त मद्य ओळखणे आता उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकांना ओळखणे शक्य होणार आहे. हे तपासणी यंत्र खरेदीसाठी राज्य उत्पादन विभागाने खरेदीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. त्यालाही राज्य सरकराने मंजुरी दिली आहे. खरेदीसाठी निविदा सुद्धा काढण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आह.

पाच कोटी रुपयांचा खर्च

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य तपासणी करणाऱ्या अत्याधुनिक ८९ अॅन्टनपार मशीन खरेदी करणार आहे. प्रत्येक मशीन किमंत ४ लाख ७७ हजार इतकी आहे. ८९ अॅन्टनपार मशीन खरेदीसाठी साधरणतः ४ कोटी २४ लाख ५३ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. या मशिनीसोबतच हॅण्डीकॅम, बायनाकुलर आणि ब्रेथ अनालायझर' मशीनी सुद्धा खरेदी करण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अॅन्टनपार, हॅण्डीकॅम, बायनाकुलर आणि ब्रेथ अनालायझर मशीनी खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे

Government Decision
Self-Care while Living Alone: एकटे राहताय, तर अशी घ्या स्वत:च्या मानसिक आरोग्याची काळजी अन् राहा आनंदी

राज्यात अंदाजित ११ हजार परमीट असून या परमिट रूममध्ये बऱ्याच आणखी नफ्यासाठी ब्रँडेड मद्याच्या बाटलीत अन्य मद्य भरले जाणे किंवा मद्यात पाणी मिसळवून ग्राहकांना देण्याचे प्रकार राज्यात सुरु आहे. मात्र, अॅन्टनपार नव्या यंत्रामुळे मद्याची तीव्रता तत्काळ तपासता येणार आहे. तसेच मद्यातील भेसळ तपासणीत समोर येणार आहे. या भेसळयुक्त मद्यामुळे राज्याच्या उत्पादन शुल्काच्या रुपाने मिळणाऱ्या महसुलावर परिणाम होत होता. तो आता टाळता येईल आणि ग्राहकांनाही मद्याचा आस्वाद लुटता येईल, असा दावा अधिकाऱ्याने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.