Chanakya Niti : महाराष्ट्र शासन देणार चाणक्य नितीचे धडे!

प्राचीन भारतीय विचारवंत चाणक्य यांचे तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी सेंटर स्थापन करण्याचा निर्णय
Chanakya Niti
Chanakya Niti Esakal
Updated on

महाराष्ट्र शासन आर्य चाणक्य यांची राजनीती, अर्थव्यवस्था, राष्ट्रहित, युद्धनीती, जीवनपद्धती आणि विविध विचारांना प्रदर्शित करणार आहे. पुणे येथील लोणावळा येथील कार्ला येथे चाणक्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने प्राचीन भारतीय विचारवंत चाणक्य यांचे तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार 'चाणक्य एक्सलन्स सेंटर' महाराष्ट्राच्या लोणावळ्याजवळील कार्ला येथे हे सेंटर सुरू होणार आहे.

चाणक्य यांचे कायद्याचे तत्त्वज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय या केंद्रामध्ये शिकवले जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Chanakya Niti
Maharashtra Politics : पुन्हा शिंदे फडणवीसांची दिल्ली वारी; शहां बरोबर खलबतं

पर्यटक, शिक्षक आणि चाणक्य यांच्याबद्दल आणखी शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सात दिवसांपर्यंतचे छोटे अभ्यासक्रम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

तिसर्‍या शतकातील प्रसिद्ध प्राचीन भारतीय विचारवंत, ज्याला ‘कौटालिया’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी उत्कृष्ट ‘अर्थ-शास्त्र’ लिहिले, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या राजकारण, वित्त आणि परराष्ट्र व्यवहारांवरील तत्त्वज्ञानावर चर्चा केली त्यांच्याबद्दल या सेंटरमध्ये शिकवले जाईल.

Chanakya Niti
Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; अडीच किलो सोन्यासह मुद्देमाल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.