दोन डोस पूर्ण किंवा ७२ तासांपूर्वीची RT-PCR; राज्याची नवी नियमावली

देशांतर्गत विमान प्रवासासाठी राज्यानं नवी नियमावली जाहीर केली आहे.
air travel
air travelesakal
Updated on

मुंबई : ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान प्रवाशांनी दोन्ही डोस घेतलेले आवश्यक अन्यथा ४८ तासांपूर्वी RT-PCR बंधनकारक करण्यात आली होती. पण आता राज्य शासनानं पुन्हा या नियमावली बदल केला आहे. नव्या नियमावलीनुसार, ४८ तासांऐवजी ७२ तासांपूर्वीची RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

हाय रिस्क देशांमध्ये तीन देशांचा समावेश

राज्यानं काढलेल्या नव्या नियमावलीनुसार, हाय रिस्क देशांच्या यादीत तीन देशांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी यामध्ये सहा देशांचा समावेश होता. नव्या नियमावलीनुसार, तीन देशांमध्ये दक्षिण अफ्रिका, बोटस्वाना आणि झिम्बाब्वे या देशांचा समावेश आहे. ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटच्या उद्रेकाची स्थिती आहे, अशा देशांचा समावेश हाय रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. या निकषांनुसार तो राज्य सरकारकडून यापुढेही अपडेट केला जाईल, असंही या नव्या नियमावलीत म्हटलं आहे.

'हे' प्रवासी असतील हाय रिस्क एअर पॅसेंजर

१) जे विमान प्रवाशी हाय रिस्क देशांमधून महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

२) महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी गेल्या १५ दिवसांत ज्या व्यक्तींनी हाय रिस्क देशांना भेटी दिल्या आहेत.

हाय रिस्क देशांमधून आलेल्यांसाठी 'हे' नियम बंधनकारक

हाय रिस्क देशांमधून महाराष्ट्रातील विमानतळांवर आलेल्या सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग आणि व्हिरिफिकेशन करण्यात येईल. तसेच त्यांची संबंधित विमानतळांवर तातडीनं RT-PCR चाचणी करण्यात येईल. तसेच त्यांना सात दिवस संस्थात्मक क्वारंटाइन राहणं बंधनकारक असेल. यानंतर सातव्या दिवशी त्यांची दुसरी RT-PCR चाचणी करण्यात येईल. या चाचणीमध्ये जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर अशा हाय रिस्क पॅसेंजरला उपचारांसाठी कोविड केअर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल. तसेच सात दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाइननंतर जर प्रवाशाचा रिपोर्ट निगेट्वि आला तर त्या व्यक्तीला पुढील सात दिवस होम क्वारंटाईन रहावं लागेल.

चुकीची माहिती दिल्यास कारवाई होणार

DCP इमिग्रेशन आणि FRRO हे घोषणापत्राचा मसुदा तयार करतील. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास केलेल्या प्रवाशांनी गेल्या १५ दिवसांत भेट दिलेल्या देशांचा तपशील जाहीर करावा लागेल. तसेच त्यांचा हा रिपोर्ट मुंबई इंटरनॅशन एअरपोर्ट (MIAL) सर्व एअरलाईन्ससह शेअर करेल. तसेच प्रवासासंबंधीची माहिती शेवटच्या 15 दिवसात आगमन झाल्यानंतर इमिग्रेशनद्वारे क्रॉस चेक केली जाईल. यामध्ये जर एखाद्या प्रवाशानं चुकीची माहिती दिल्याचं आढळून आलं तर त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अतंर्गत संबंधित कलमांखाली कारवाई केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()