Maharashtra Rain Alert : राज्यात येत्या ४८ तासांत पुन्हा मुसळधार; 'या' जिल्ह्यांना IMDचा इशारा

Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain AlertSakal
Updated on

राज्यात ऑगस्ट महिन्यांत गायब झालेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात दमदार पुनरागमन केलं आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला. येत्या दोन दिवसात पुन्हा राज्यात चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान वर्तवली आहे.

येत्या गुरूवारपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. पुढील दोन दिवस राज्यात हवामानाची स्थिती अशीच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Alert
Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीत मनसेची काहीच भूमिका नाही; राज ठाकरेंनी घेतली होती जरांगेंची भेट

राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये हलका पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल.मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Rain Alert
Sharad Pawar : अजित पवार अन् त्यांच्यासोबत गेलेले आमदार परत आल्यावर काय? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.