मुंबई : पावसाने उघडीप (rain stops) घेतल्याने उकड्यामुळे हैराण झालेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या चार-पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (heavy rainfall) कोसळणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (monsoon update) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात (bay of Bengal) तयार होण्याऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान विभागाचे डॉ. के. एस. होसाळीकर. यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी हवामान विभागाने कुठेही 'रेड अलर्ट' दिलेला नाही.सोमवारी (ता.30) परभणी जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवारी मुंबईत ऑरेंज अलर्ट
मंगळवारी मुंबईत देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं सिंधुदुर्ग , बीड, उस्मानाबाद, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट दिला आहे. याशिवाय 29 ऑगस्टला रत्नागिरी , सिंधुदुर्ग,उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, यवतमाळ वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.