Maharashtra HSC Exam 2025: विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबरपासून भरता येणार अर्ज, परीक्षा शुल्कामध्ये वाढ; जाणून घ्या प्रोसेस अन् डिटेल्स

HSC Exam application forms available online : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक म्हणजे HSC परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख घोषित केली आहे.
 HSC Exam
HSC Exam
Updated on

Maharashtra HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक म्हणजे HSC परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख घोषित केली आहे. HSC च्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील परीक्षेसाठी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर, २०२४ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

परीक्षेसाठी कोण पात्र?

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी, फेर परीक्षा देणारे, प्रमाणपत्र असलेले खाजगी उमेदवार आणि ग्रेड सुधारणा किंवा विशिष्ट विषय घेणारे विद्यार्थी हे अर्ज करू शकतील. विद्यार्थी निर्धारित तारखेपर्यंत website www.mahahsscboard.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करू शकतील.

 HSC Exam
SSC-HSC Form 17 : ‘१७ नंबर’ फॉर्म सर्व शाळा स्वीकारणार, पुणे बोर्डाचा निर्णय; असा भरा अर्ज

व्हेरिफिकेशन प्रोसेस कशी असेल?

- अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत प्री-लिस्ट कॉलेज लॉगिनच्या माध्यमातून पाहता येईल

- विद्यार्थ्यांनी प्री-लिस्टची प्रिंट काढायची असून त्यावर काही दुरुस्ती नाही ना, याची खातरजमा करायची आहे

- विद्यार्थी आणि प्रिन्सिपल यांनी व्हेरिफाय झालेल्या प्री-लीस्टवर स्वाक्षरी करायची असून त्यावर स्टॅम्प देखील मारायचा आहे

महत्त्वाच्या तारखा

-अर्ज भरण्याची मुदत (१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२४)

-ITI विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची तारीख ( २२ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोंबरपर्यंत)

अर्ज भरण्यासाठी शुल्क

कागदाची किंमत वाढली असल्याने अर्जाचे शुल्क यावर्षी वाढवण्यात आले आहे. १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुक्त १२ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ५० रुपये अधिकचे भरावे लागणार आहेत.

-दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ४२० वरून ४७० झाले आहे

-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ४४० वरून ४९० झाले आहे

याशिवाय प्रशासकीय सेवा खर्च, मार्क शीट, प्रमाणपत्र आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या शुल्कामध्ये देखील वाढ झाली आहे.

 HSC Exam
Career After HSC : ‘बारावीनंतरचे करिअर’वर आज मोफत मार्गदर्शन; ‘सकाळ’ आणि पीसीसीओईआरतर्फे आयोजन

SARAL वर नोंद आवश्यक

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी SARAL सिस्टिमवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. SARAL किंवा Systematic Administrative Reforms हे एक शैक्षणिक पोर्टल आहे. यामध्ये विद्यार्थी, शाळा आणि शाळा कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि सरलबाबत अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरल पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.