HSC Result 2023: मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता होणार ऑनलाईन जाहीर

HSC Result 2023: मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता होणार ऑनलाईन जाहीर
esakal
Updated on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. (maharashtra hsc result 2023 out tomorrow 25 may 2023 check maharashtra board 12th result science commerce arts at mahresult nic in)

या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार

mahresult.nic.in

https://hsc.mahresults.org.in

http://hscresult.mkcl.org

पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला.

त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे (२५ मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

HSC Result 2023: मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता होणार ऑनलाईन जाहीर
HSC Result 2023: बारावीचा निकाल कसा पाहायचा? इथे 2 सेकंदात मिळेल रिझल्ट

गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार

12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

निकालानंतर प्रवेश प्रक्रिया

यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.

बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.

HSC Result 2023: मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता होणार ऑनलाईन जाहीर
HSC Result 2023 : उद्या निकाल, कसा पाहाल?

मागील वर्षी लागलेल्या निकालाची टक्केवारी

दरम्यान गेल्या वर्षी २०२२ला ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातून दोन लाख ४२ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील ९३.६१ टक्के म्हणजेच दोन लाख २७ हजार ०२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

तर पुणे विभागीय मंडळात सोलापूर जिल्ह्यातील ९४.८३ टक्के विद्यार्थी पास होत सोलापूरने बारावीच्या निकालात बाजी मारली होती. तर पुणे जिल्ह्यातील ९२.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

एकूण निकालात विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी २.७७ टक्क्यांनी जास्त होती. मात्र यावेळी ऑफलाईन पध्दतीने घेतलेल्या परीक्षेत कोण बाजी मारणार हे उद्या दुपारीच कळणार आहे.

HSC Result 2023: मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता होणार ऑनलाईन जाहीर
HSC Result 2023 : बारावीचा निकाल गुरूवारी होणार जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.