Maharashtra Congress Meeting: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची आज महत्वाची बैठक, पक्षात बदलाचे संकेत; वडेट्टीवारांनी दिली महत्वाची माहिती

काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते आता भाजपत प्रवेश करणार आहेत.
Vijay Vadettivar
Vijay Vadettivar
Updated on

मुंबई : काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते आता भाजपत प्रवेश करणार आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसनं आज एक महत्वाची बैठक बोलावली असून महाराष्ट्राचे प्रभारी महेश चेन्नीथला यांनी ही बैठक बोलावली आहे.

याची माहिती विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच आपल्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. (maharashtra imp congress meeting today after ashok chavan resignation vijay vadettivar gives info)

आज पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून मुंबईत सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यापार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे, पक्षामध्ये बदल होत आहेत. पण मी काँग्रेससोबत असून भविष्यातही काँग्रेसमध्येच असेल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Vijay Vadettivar
Plane Door Falls : धक्कादायक! विमान हवेत असतानाच निखळला दरवाजा; 'या' आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

मी विधानसभेच्या चार निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर जिंकल्या आहेत, तसेच मंत्रीही झालो. तसंच दोनदा विरोधीपक्ष नेताही झालो. आता मला पक्षाकडून अधिक काही अपेक्षित नाही. त्यामुळं मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहिल याची खात्री देतो, असं वडेट्टीवार यांनी आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

Vijay Vadettivar
Retail Inflation : किरकोळ महागाईत घसरण; जानेवारीत दर ५.१० टक्क्यांवर

आमदारांना एकत्र ठेवणार

दरम्यान, आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार असून उद्या सर्व आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिली आहे. या बैठकीसाठी सर्व आमदारांना हजर राहणं बंधनकारक असणार आहे. आमदरांना एकत्र ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

अशोक चव्हाण यांच्यानंतर इतर किमान १५ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा काल रंगल्या होत्या. पण नंतर ज्या कथित आमदारांची नाव समोर येत होती, त्या आमदारांनी आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.