देशातील हवामान झपाट्याने बदलत आहे. उत्तर भारतात थंडी वाढली असताना दक्षिण भारतात पाऊस सुरूच आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असून, त्यामुळे देशातील अनेक राज्यांना याचा फटका बसू शकतो. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
21 ऑक्टोबर रोजी मध्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडेल. 20-21 ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि 24-25 ऑक्टोबर रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडू शकतो.