Maharashtra Interim Budget 2024: विद्यार्थ्यांसाठी धावून आले अजित पवार! अर्थसंकल्पात केल्या 'या' योजना जाहीर

Maharashtra Interim Budget 2024: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
Maharashtra Interim Budget 2024 ajit pawar announcement education sector
Maharashtra Interim Budget 2024 ajit pawar announcement education sector
Updated on

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवग्र तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांसाठीदेखील सन-2024-25 पासून विदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.

Maharashtra Interim Budget 2024 ajit pawar announcement education sector
Maharashtra Budget 2024: ऊसतोड कामगारांच्या मुलामुंलीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा; ८२ शासकीय वसतीगृह स्थापन करण्यास दिली मंजूरी

विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता

वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अर्थिक दृष्टा दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत दरवर्षी 37 के 60 हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता देण्यात येत आहे.

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीपाई फुले आधार योजनेअंर्गत दरवर्षी 37 ते 60 रुपयांपर्यंत निवासभत्ता देण्यात येणार आहे.

Maharashtra Interim Budget 2024 ajit pawar announcement education sector
Maharashtra Interim Budget 2024: महिलांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर, कोण आहेत लाभार्थी ?

ऊसतोड कामगारांच्या मुलांमुलींसाठी वसतीगृहे

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतीगृह स्थापन करण्यात मंजूरी देण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये

राज्यात सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर उपलब्ध आहेत. सन 2035 पर्यंत हे प्रमाण 100 हून अदिक करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढविने आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमदेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Maharashtra Interim Budget 2024 ajit pawar announcement education sector
Maharashtra Interim Budget 2024: शिंदे सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट; गॅस सिलिंडर मोफत मिळणार; काय आहे नियम ?

तसेच, राज्याच्या ग्रामीण भागात ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रातून १५ ते ४५ वयोगटातील १८९८० उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवसी संशोधन प्रशिक्षण संस्था, बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था-सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था-महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी इत्यादी संस्था काम करत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून २ लाख ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी ५२ हजार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. अशी माहितीदेखील यावेळी अजित पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.