Budget 2024: 'खोटं नरेटिव्ह' सादर झालंय; उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर कडवी प्रतिक्रिया

Maharashtra Monsoon Session Budget 2024: राज्याचा आज अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर झालेलं हा अर्थसंकल्प असल्यानं यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

Maharashtra Monsoon Session Budget 2024: विधानसभेत आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर झालेला हा अर्थसंकल्प असल्यानं यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह' सादर झालंय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्यावतीनं प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Interim Budget 2024 false narrative Uddhav Thackeray comment)

Uddhav Thackeray
Petrol-Diesel : मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त; अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा

उद्धव ठाकरे म्हणाले, एकूणच लोकसभा निवडणुकीत गेले दहा वर्षे आश्वासन आणि थापांना कंटाळून जनतेने यांना धडा शिकवला. पण जनता आता यांच्या थापांवर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं यांचं षडयंत्र आहे.

जनतेच्या डोळ्यात धुळफेक करायची हाच यांचा प्रयत्न आहे. जनतेला फसवायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्राला ओरबाडायचं काम सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत सांगायचं तर हा अर्थसंकल्प म्हणजे खोटं नरेटिव्ह सादर झालं आहे.

Uddhav Thackeray
AI Research: AI संशोधनासाठी मोठा निर्णय! विद्यापीठांना देणार 100 कोटींचा निधी; अजित पवारांची मोठी घोषणा

आजपर्यंत दोन वर्षात ज्या घोषणा झाल्या त्या किती अंमलात आल्या? याबाबत एक कमिटी स्थापन करुन त्याची श्वेतपत्रिका सादर करावी. महिलांना आपल्या बाजूनं करण्याचा केविलवाणा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.

मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका. माता-बहिणींना जरुर द्या पण तरुण बेरोजगार आहे. त्यांच्या रोजगार वाढीसाठी या अर्थसंकल्पात उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांच वीजबिल अर्थसंकल्पात माफ केलं पण कर्जमाफी करा हे सरकारनं मान्य केलेलं नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.