राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज

राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज
Updated on
Summary

राज्यात 112 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे.

माळीनगर (सोलापूर) : महाराष्ट्र पुढील वर्षीच्या गाळप हंगामात यावर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा विक्रमी साखर (Sugar) उत्पादनाचा साक्षीदार ठरण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात राज्यात 112 लाख टन साखर उत्पादन (Sugar production) होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे.

राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज
सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ग्राहक संरक्षण मंत्रालयास याबाबत एक पत्र लिहिले आहे. 2021-22 च्या गाळप हंगामात राज्यात 12.32 लाख हेक्‍टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल, असा अंदाज त्यांनी पत्रात व्यक्त केला आहे. येत्या हंगामात एक हजार 96 लाख टन ऊसाचे गाळप होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा एक हजार 12 लाख टन उसाचे गाळप होऊन झालेल्या 106.3 लाख साखर उत्पादनापेक्षा पुढील हंगामातील साखर उत्पादन अधिक राहील.

राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज
सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन;पाहा व्हिडिओ

आगामी हंगामात इथेनॉल उत्पादनाकडे वळविलेल्या साखरेसह 122 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील हंगामात साधारण 10 ते 15 टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची शक्‍यता आहे. इथेनॉलकडे वळलेल्या साखरेसह 11.13 टक्के सरासरी साखर उतारा मिळण्याचा अंदाज आहे. इथेनॉलमध्ये रूपांतरित होणारी साखर वगळता 10.21 टक्के साखर उतारा राहण्याची शक्‍यता आहे. राज्यात स्थापित असलेल्या 245 साखर कारखान्यांपैकी अनेक कारखाने आर्थिक ओझ्यामुळे सुरू होण्याची शक्‍यता नाही.

राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज
'या' पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

येत्या हंगामात साधारण 192 कारखाने सुरू होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात 190 कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) मते, निधीची तरलता राखून ठेवण्यासाठी कारखान्यांना आर्थिक दबावाखाली कमी किमतीत सध्या साखर विकावी लागत आहे. त्यामुळे अनेक कारखाने निश्‍चित केलेली एफआरपी देऊ शकत नाहीत.

राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज
सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु

ऊस लागवड वाढण्याची शक्‍यता

सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे राज्यात ऊस लागवडीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. बहुतांश भाजीपाला व अन्नधान्य उत्पादन घेणारे शेतकरी लॉकडाऊनमुळे वारंवार मार्केट बंद राहत असल्याने ग्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खात्रीशीर उत्पन्न मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज
सोलापूर रेल्वे विभागात गेल्या दोन वर्षांत गुन्ह्यांमध्ये घट

येत्या हंगामात ऊसाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने साखर व इथेनॉल उत्पादन देखील वाढणार आहे. त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे. ऊस क्षेत्रात वाढ होत असल्याने यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याबाबत विचार करावा लागणार आहे.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.