महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशाचा क्रमांक असून तेथील 117 साखर कारखान्यांत 18.60 लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे.
माळीनगर (सोलापूर) : साखर (Sugar) उत्पादनात यंदा महाराष्ट्राने (Maharashtra) आघाडी मारली असून, येथील 184 साखर कारखान्यांनी 15 डिसेंबरपर्यंत सर्वाधिक म्हणजे 31.90 लाख टनाचे उत्पादन केले आहे. हंगामा अखेर महाराष्ट्र 110 लाख टनाचे साखर उत्पादन करून यंदा देशात प्रथम क्रमांकावर राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. (Maharashtra is leading in sugar production compared to other states in the country)
देशातील गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. 15 डिसेंबर 2021 पर्यंत देशातील 471 साखर कारखान्यांतून (Sugar Factories) 75 लाख टनापेक्षा अधिक साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून चालू गळीत हंगामाअखेर ते 315 लाख टन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशाचा (Uttar Pradesh) क्रमांक असून तेथील 117 साखर कारखान्यांत 18.60 लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन झाले असून, हंगामाअखेर ते 107 लाख टन होण्याचा अंदाज असल्याचे चित्र आहे. तृतीय क्रमांकावरील कर्नाटक (Karnataka) राज्यातील 69 साखर कारखान्यांतून 17.90 लाख टन साखर उत्पादन झाले असून, हंगाम अखेर 48 लाख टनाचा साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (National Cooperative Sugar Factory Federation) म्हटले आहे.
चांगले पाऊसमान, शास्त्रीय पद्धतीने केलेली उसाची लागवड, संशोधित वाण व हमीदर यामुळे देशातील ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. देशभरातील 471 साखर कारखान्यांत आतापर्यंत (15 डिसेंबर) 820 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्याचा सरासरी साखर उतारा 9.22 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गेल्यावर्षी 15 डिसेंबर 2020 पर्यंत देशातील 458 साखर कारखान्यांनी 819.57 लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यातून सरासरी साखर उतारा 9.02 टक्के मिळून जवळपास 74 लाख टन साखरेची निर्मिती झाली होती. म्हणजेच यंदाचा विक्रमी गाळप हंगाम गतवर्षीच्या हंगामापेक्षा सर्वच बाबतीत थोडाफार वरचढच असल्याचे चित्र समोर येत आहे.
यंदा साखरेच्या सरासरी उताऱ्यात उत्तराखंड (Uttarakhand) (10 टक्के), उत्तर प्रदेश (9.40), महाराष्ट्र (9.35), बिहार (Bihar) (9.15) व कर्नाटक (9 टक्के) ही राज्ये अग्रेसर आहेत. त्यानंतर गुजरात (Gujrat) (8.85), पंजाब (Punjab) (8.75), तमिळनाडू (Tamilnadu) (8.50), हरियाणा (Haryana) (8.10) व आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तेलंगणा (Telangana) प्रत्येकी आठ टक्के असा क्रमांक येतो. मात्र, अत्युच्च साखर उताऱ्याचा कालावधी नुकताच सुरू झाल्याने हंगामाअखेर सरासरी साखर उताऱ्यात चांगली वाढ दिसण्याचे तज्ज्ञांचे अनुमान आहे.
कोविड (Covid-19) महामारीतही ऊस लागवड व साखर उत्पादन वाढले असून या महामारीच्या काळात घातलेली बंधने शिथिल केल्याचा फायदा साखर उद्योगाला होत आहे. साखरेच्या विक्रीत आणि विक्रीदरात वाढ होताना दिसते. दुसरीकडे, इथेनॉल (Ethanol) प्रकल्प प्रगतिपथावर असून 30 नोव्हेंबरअखेर संपलेल्या वर्ष 2020-21 मध्ये विक्रमी 302.30 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा देशभरातील 275 आसवनी प्रकल्पातून तेल कंपन्यांना झाला असून, त्याद्वारे देशभरात सरासरी 8.1 टक्के मिश्रणाचे प्रमाण गाळले गेले आहे. या एकाच वर्षात इथेनॉल पुरवठ्याच्या माध्यमातून हजार कोटी रुपयांची मिळकत इथेनॉल पुरवठादारांना झाली असूनही देशातील सर्वोत्तम विक्रमी कामगिरी ठरली आहे.
यंदाच्या वर्षी साखर निर्यातीत (Sugar Export) देखील देशभरातील साखर कारखान्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. 2019-20 मधील 59 लाख टन साखर निर्यातीनंतर 2020-21 मध्ये विक्रमी लाख टन साखरेची यशस्वी निर्यात झाली असून चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच लाख टन अनुदान विरहित साखर निर्यातीचे करार झाले आहेत. यात सहकारी क्षेत्राचा सुमारे 40 टक्के वाटा आहे.
- जयप्रकाश दांडेगावकर (Jaiprakash Dandegaonkar), अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.