Shinde-Pawar: "महाराष्ट्र मंबाजी-तुंबाजींचा नाही"; मोदींचं कौतुक करणाऱ्या शिंदे-पवारांवर शिवसेनेचं टिकास्त्र

राज्यातील राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत.
Shiv sena
Shiv senaSakal
Updated on

नवी दिल्ली : राज्यातील राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा विराजमान होतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. यावरुनच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सामनातून या दोघांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. महाराष्ट्र धर्म हा मर्दांचा व स्वाभिमान्यांचा असून तुंबाजी आणि मंबाजींचा नाही, असं म्हटलं आहे. (Maharashtra is not about mambaji tumbaji Shiv Sena attacked Eknath Shinde Ajit Pawar who praised Modi)

Shiv sena
Paytm Layoffs: पेटीएमचा मोठा निर्णय! 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, काय आहे कारण?

लढण्याआधीच शस्त्रे ठेवली

लोकसभा निवडणूक पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. पण अद्याप निवडणूक झालेली नसतानाही निवडून मोदीच येणार असा प्रचार शिंदे-पवारांकडून केला जात आहे. यावर भाष्य करताना शिवसेनेनं म्हटलं की, जो लढलाच नाही त्यानं विजयाचे हाकारे देऊ नयेत, लढण्याआधीच यांनी शस्त्रे ठेवली आहेत. महाराष्ट्र धर्म हा मर्दांचा व स्वाभिमान्यांचा आहे, तुंबाजी व मंबाजीसारख्यांचा नाही. (Latest Marathi News)

Shiv sena
MTV Hustle 03 Winner: वयाच्या 18 व्या वर्षी दिल्लीचा रॅपर उदय ठरला 'Hustle 03' चा विजेता!

सरकारमध्ये वैचारिक गोंधळ

मोगलांना आपल्या लेकी, सुना देऊन स्वतःची मुंडकी अन् पदं वाचवणाऱ्यांना महाराष्ट्रानं कधीच जुमानलं नाही, मिध्यांनी हेच धोरण राबवलं आहे. धर्मनिरपेक्षतेसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असं म्हणणाऱ्या अजित पवारांमुळं राज्याच्या सरकारमध्ये वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे.

कारण भाजप हिंदुत्ववादी, त्यांच्यासोबत शिंदे गट बोगस हिंदुतत्ववादी अन् अजित पवारांचा धर्मनिरपेक्ष गट अडकून पडलाय. पण शिंदे-अजितदादा गटानं कोणत्या चिन्हावर लढायचं हे भाजपचं हायकमांड ठरवणार आहे. यांच्यातील कलंकितांना उमेदवारी देऊ नये असं भाजपचं म्हणणं आहे. (Marathi Tajya Batmya)

Shiv sena
Stock Market Holiday: ख्रिसमसनिमित्त आज शेअर बाजार बंद राहणार; सराफा बाजारातही होणार नाहीत व्यवहार

भ्रमाचा भोपळा फुटणार

जनता मोदींनाच निवडून देईल हा भ्रमाचा भोपळाही फुटल्याशिवाय राहणार नाही, असं दावा करताना अजित पवारांच्या प्रचाराला मोदी येणार हे महाराष्ट्राला पहायचच आहे. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यांच्या प्रचाराचा नारळ अमित शहा फोडतील तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था कशी असेल? सुनील केदार यांना गैरव्यवहाराचं प्रकरण भोवलं पण सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा, कोल्हापूर बँक घोटाळा, भीमा-पाटस बँक घोटाळा करणाऱ्यांचा कमळाबाईशी निकाह झाला आहे. यांच्यावर कारवाईचा बगडा कधी होणार. (Latest Marathi News)

Shiv sena
Health Care News : फळे खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी खाल्ल्यास काय होईल? जाणून घ्या

भाजपला शिवसेना-राष्ट्रवादी संपवायची

अजित पवार सांगतात जनता मोदींनाच निवडून देईल, मोदी व्यक्तिगत निवडून येतील पण भाजप अन् दोन्ही गटांचे बेईमान लोक पराभूत होतील. त्यामुळं मोदींच्या विजयाचा बँडबाजा कोणी वाजवायची गरज नाही. फुटीरांमुळं भाजपच्या अंगावर तोळाभर मांस वाढेल अशाही भ्रमात कोणी राहू नये.

सध्या दिल्लीश्वरांना महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवायचा आहे. मुंबईला वेगळी करायची आहे, यासाठी त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, असा आरोपही यावेळी ठाकरे गटाकडून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.