महाराष्ट्र-कर्नाटक सीमावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंय. पाणी प्रश्नावरुन जत तालुक्यातल्या काही गावांमध्ये कर्नाटकचे झेंडे फडकले. अशातच सोलापूरमधील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. (Maharashtra Karnataka Border issue Eknath Shinde Solapur 28 villages merge with Karnataka)
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही जिल्ह्यांवर दावा सांगितला आहे. बोम्मई यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले आहेत. राज्यातील एकही गावच काय जमिनीचा तुकडाही कर्नाटकाला जाऊ नये म्हणून राज्यसरकार जोरदार प्रयत्न करत आहे.
दरम्यान, सोलापुरातील 28 गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठरावही केला आहे. एवढंच नव्हे तर बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असो, अशा घोषणाही गावकऱ्यांनी दिल्या आहेत. अशी माहिती टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिली आहे.
कर्नाटकात जाण्याचे काय आहे कारण?
आम्हाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नाही. म्हणूनच वैतागून आम्ही कर्नाटकात सामील होण्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललोय, त्यांना फॅक्सही पाठवला आहे.
हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
यापूर्वी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्या मतदारसंघात होतो. मात्र मुख्यमंत्री असूनही त्यांनी आमच्या गावांचा विकास केलेला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही 28 ते 30 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्याचीही दखल राज्यकर्त्यांनी घेतली नाही. जर लोकप्रतिनिधी, प्रशासन आमची दखलच घेणार नसतील तर आम्ही राज्यात राहू कशाला? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, एखादी महिला डिलिव्हरीला घेऊन जात असताना रस्त्यातच तिची डिलिव्हरी होते. एखाद्या रुग्णाला शहरात घेऊन जात असताना तो रस्त्यातच दगावतो, इतके खराब रस्ते आहेत. त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहोत. अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.