नागपूर : भारतात जगातील ३० टक्के बांबू वनस्पतीचे उत्पादन होते. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, त्याचे उद्योगात रूपांतरण झालेले नाही. बांबूला उद्योगात परिवर्तित करण्याचे तंत्र विकसित करण्याची गरज असल्याचे मत बेंगळुरू येथील आयपीआयआरटीआयचे वैज्ञानिक डॉ. बिपिनकुमार चावला यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, आशिया खंडात ६५ टक्के, भारतात ३० टक्के तर चीनमध्ये ३५ टक्के बांबूचे पीक घेतले जाते. चीनमध्ये पिकणारा बांबू उसासारखी असल्याने, त्याचे हार्वेस्टिंग चांगल्या प्रकारे होते. मात्र, भारतात बांबूचे हार्वेस्टिंग कठीण काम आहे. त्याअनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने मात्र, त्याअनुषंगाने उत्तम पाऊल टाकले आहे.
डॉ. गिरीश गांधी यांनी ग्रामिण व आदिवासी भागात इंधनाची समस्या अजूनही मिटलेली नाही. त्यामुळे तेथे जंगलातील झाडांचा उपयोग इंधनासाठी आजही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात बांबूचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. या पार्श्वभूमीवर बांबू डेव्हलपमेंट गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. जगात बांबूच्या १४८ प्रजाती असून भारतात केवळ २९ प्रजातीच असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी बांबू बास्केटरीचे प्रशिक्षण घेणाऱ्या चंद्रपूर येथील मीनाक्षी वाळके यांनीही अनुभव कथन केले. वेबिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ नागपूर एलाईटचे अध्यक्ष शुभंकर पाटील, एम. श्रीनिवास राव, डॉ. एन. भारती, स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी मॅनेजर सचिन गोडसे, बांबू टेल्सचे वास्तुविशारद शुभम कोटावडेकर, बांबूपासून तयार केलेल्या दागिन्यांवर पुणे येथील बांबू तंत्राच्या संस्थापिका दया पत्नी यांनी यावेळी बांबूच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकला. संचालन वनराई फाउंडेशनचे अजय पाटील यांनी तर आभार महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाचे वास्तुविशारद गणेश हरीमकर यांनी मानले.
महाराष्ट्रातील बांबू उत्तम
आमच्या संस्थेत बांबूच्या वस्तूं तयार करण्यासाठी लागणारा ८० टक्के बांबू महाराष्ट्रातून येतो. बांबूपासून खुर्ची, मॅट्रेस, घराला लागणारे छत, घराच्या भिंती, क्रिकेट बॅट्स, सायकल आदी बनविण्याचे प्रयोग शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत.
- परमेश्वरन अय्यर, संस्थापक, बांबूपेकर बंगरुळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.