Maharashtra Assembly: विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

Maharashtra Assembly
Maharashtra Assembly
Updated on

मुंबई- महाराष्ट्रात विधानसभेतील आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी असे संकेत दिले आहेत. आमदारांची संख्या तीनशेपेक्षा अधिक होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात जास्त आमदार बसता येतील अशा प्रकारे विधानसभेची इमारत बांधावी लागेल, असं फडणवीस म्हणाले आहेत. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

२०२६ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी जागा वाढणार आहेत. सध्या आपली विधानसभा नवीन आमदारांना सामावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला विधानसभेची नवीन इमारत बांधावी लागेल. विधानसभेत सध्या फक्त ३०० आमदार बसतील इतकी जागा आहे. त्यामुळे ३०० पेक्षा जास्त आमदार बसू शकतील अशी इमारत आपल्याला बांधावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Maharashtra Assembly
Contract Recruitment: मागच्या सरकारचे पाप मग GR आताच रद्द का केला? देवेंद्र फडणवीसांना पत्रकार परिषदेत सवाल

सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये २८८ आमदार आहेत. त्यामुळे २०२६ च्या विधानसभेच्या निवडणुकीआधी या जागा वाढण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात मतदारसंघाची पुनर्रचना केली जाण्याची शक्यता आहे. त्याप्रकारचे संकेत केंद्र सरकारकडून मिळाले आहेत. त्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाढवल्या जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly
Maratha Reservation : आंतरवालीच्या सभेचं फंडिंग विचारणारे देवेंद्र फडणवीसच; प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला मुद्दा

देशात महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. हे आरक्षण मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर दिले जाणार असल्याचे केंद्राने म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या जागांमध्ये वाढ होणार आहे. त्यादृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे २०२६ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदारांच्या संख्येत वाढ होते का, हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.