मुंबई- जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये धुसफूस निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे यात भर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना राज्यात १२० जागा लढवेल असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे.
आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत की, 'येत्या विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वामध्ये लढल्या जातील. शिवसेना 120 जागा लढवणार आहे.आमचं टार्गेट हे 100 जागा जिंकण्याचं आहे.' संजय गायकवाड यांच्या या दाव्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.