'अनिल देशमुख ईडी प्रकरणातून लवकरचं बाहेर पडतील'

उद्या जिल्हा प्रशासनाला निवडणुकीसंदर्भातील सूचनांचे आदेश दिले आहेत.
politics
politicsesakal
Updated on
Summary

उद्या जिल्हा प्रशासनाला निवडणुकीसंदर्भातील सूचनांचे आदेश दिले आहेत.

नागपूर - नागपूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी राजकीय नेते आणि पक्ष यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान, आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत कुणाला मतं द्यायची ते स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य होणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केल आहे. दरम्यान, उद्या जिल्हा प्रशासनाला निवडणुकीसंदर्भातील सूचनांचे आदेश दिले आहेत.

politics
महाआघाडीची राजकीय गणित बदलली; शिवसेनेच्या आमदाराला बसणार धक्का?

यावेळी मंत्री जयंत पाटील संजय राऊत आणि प्रियांका गांधी यांच्या भेटीसंदर्भात म्हणाले, महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकदुसऱ्याला भेटले चांगलंच आहे. काँग्रेसनं नागपूर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार दिला आहे. दरम्यान, आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. काल डीसीएस रावत यांच्या हेलीकॉप्टरला झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या देशाचा सर्वोच्च सेनानी यांचा अपघाती मृत्यू होणे हा देशासाठी मोठा हादरा आहे. त्याच दुखही आहे. या अपघाताच्या चौकशीत योग्य ते बाहेर येईल. याच्या खोलात जाण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत.

प्राजक्त तनपुरे यांच्या ईडी कारवाई बद्दल विचारले असता, ते म्हणाले, याविषयी प्राजक्त तनपुरे यांनाच विचारा. मात्र अनिल देशमुख या सगळ्यातून लवकरंच बाहेर येतील. काही कारण नसताना त्यांना अटक करुन प्रयत्न ठेवण्याचा केंद्रीय एजंसीज करत आहेत. त्यांच्यावरील आरोपात काही तथ्य नाही. संपर्क मंत्री म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था जाहीर करु. महाविकास आघाडी सरकारमध्ये रिक्त असलेल्या आमच्या पक्षाच्या मंत्रीपदाबबात योग्य वेळी निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

politics
Political News : 'नगरपंचायत निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.