मुंबई : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत कोरोनामुळे लावलेले नोकरभरती वरील निर्बंध हटवण्यात आले आहेत, त्यामुळे आता राज्यात विविध विभागांमध्ये महाराष्ट्र सरकारी सेवांमधील तब्बल ७५ हजार रिक्तपदे पहिल्या टप्यात भरली जाणार आहेत.
कोरोना काळात ५० टक्के नोकरभरतीची मर्यादा शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता १०० टक्के नोकरभरती करता येणार आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत या पार्श्वभूमिवर आता ७५ हजार इतकी नोकरभरती होणार आहे. याचा तरुणांना मोठ्या प्रणाणात फायदा होणार आहे
कुठे किती पदे भरली जाणार?
कोरोनाच्या काळात नोकरभरतीवर निर्बंध लावण्यात आले होते, ते हटवल्यानंतर आता राज्यात १०० टक्के नोकरभरती होणार आहे. या नोकरभरती अंतर्गत आरोग्य खात्यात १० हजार ५६८, गृह खात्यात ११ हजार ४४३ पदे, ग्रामविकास खात्यात ११ हजार पदांवर भरती होणार आहे. कृषी खातं २ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम खातं ८ हजार ३३७, नगरविकास खाते १ हजार ५००, जलसंपदा खात्यात ८ हजार २२७ पदे, जससंधारण खाते २ हजार ४२३ पदे, पशुसंवर्धन खाते १ हजार ४७ पदे भरली जाणार आहेत. दरम्यान या मुळे राज्यातील तरूणांना रोजगार मिळणार आहे.
राज्यात कुठे किती जागा रिक्त?
गृहविभाग ४९ हजार ८५१ पदे, सार्वजनिक आरोग्य विभाग २३ हजार ८२२, जलसंपदा विभाग २१ हजार ४८९, महसूल आणि वन विभाग १३ हजार ५५७, वैद्यकिय शिक्षण विभाग १३ हजार ४३२, सार्वजनिक बांधकाम विभाग ८ हजार १२ पदे, आदिवासी विभागात ६ हजार ९०७ पदे, सामाजिक न्याय विभाग ३ हजार ८२१ पदे रिक्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.