दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
Updated on

हिंडेनबर्ग अहवालाशी संबंधित याचिकांवर उद्या सुनावणी

सुप्रीम कोर्ट उद्या २ मार्च रोजी हिंडेनबर्ग अहवालाशी संबंधित याचिकांवर निकाल देणार आहे. ज्यात गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी नियामक यंत्रणेशी संबंधित समिती स्थापन करण्याच्या मुद्द्याचा समावेश आहे.

निकालाआधीच धंगेकर समर्थकांची 'ही' कविता सोशल मीडियावर व्हायरल

निकालाआधीच एक कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Who is dhangekar? ज्याने पाडला गणेश बिडकर, केला गड सर

Who is dhangekar? ज्याने वाटायला लावले, चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर

Who is dhangekar? प्रचाराला लावले RSSचे केडर, भले-भले मोठे बिल्डर

Who is dhangekar? देशाचे नेते फिरवले गल्लीभर, धास्तीने जागेच रात्रभर

Who is dhangekar? ज्याने अश्रू आणले ओठांवर, बंगल्याचे ओझे पेठांवर

Who is dhangekar? ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर, नदीत उतरून पाहाय लावले ओंकारेश्वर

Who is dhangekar? जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर, नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर

Who is dhangekar? घाम फुटलाय ज्याच्या धाकावर, ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.

कळले का❓Who is dhangekar..

अशा आशयाची ती कविता आहे. याकवितेमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आता या कवितेला भाजपकडून कसं प्रत्युत्तर देण्यात येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रार

नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेचा भंग भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

२३ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील केलेल्या भाषणात भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करून स्पष्टपणे मतदारांना भडकवल्याचा धंगेकर यांचा आरोप.

निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

आमदारांना मतदानापासून रोखता येत नाही

अध्यक्षांनी बहुमत पाहून निर्णय घ्यावा

शिंदे गटाचे वकील कौल यांच्यांकडून रवी नाईक व जी.विश्वनाथन केसचा दाखला

त्यांना महाविकास आघाडीचा भाग व्हायचं नव्हतं - कौल 

सत्तासंघर्षानंतर सुनावणीला पुन्हा सुरुवात, नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू

पानगळ झाल्याशिवाय वसंत फुलत नाही - संजय राऊत 

खरे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या मागे-  संजय राऊत

शिवसेनेच्या जखमी वाघाला डीवचू नका - राऊत

खरे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मागे - राऊत

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात आक्रोश

सत्य काय आहे हे 2024 मध्ये समजेल

आजचं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब  

आजचं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब  करण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाले त्यामुळे आजचं सभागृहचं कामकाज तहकुब करण्यात आलं आहे

राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान -  राहुल नार्वेकर 

संजय राऊत यांच्या व्यक्तव्याचे पाडसाद विधान सभेत उमटू लागले आहेत. सभागृहाचा अपमान केला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. यासंबधी हककभांगाचा निर्णय 8 मार्चला देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे.

संजय राऊत यांना आजच अटक करा; प्रवीण दरेकर यांची मागणी 

हक्कभांगाची कारवाई केली तरी मी भीत नाही - संजय राऊत 

हक्कभांगाची कारवाई केली तरी मी भीत नाही

महत्वाच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी हे प्रयत्न सुरू

अपात्रतेचा निर्णय फक्त अध्यक्षच घेऊ शकतात - नीरज कौल

ठाकरे गटाच्या मते अध्यक्षानी आयोगाचं काम करावं - नीरज कौल

विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू 

विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सत्ताधाऱ्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे.

4 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं - कौल 

२ जुलैला सुनील प्रभूंनी मुख्य प्रतोद म्हणून शिवसेना विधिमंडळ सदस्यांना व्हीप बजावला - कौल 

२ जुलैला सुनील प्रभूंनी मुख्य प्रतोद म्हणून शिवसेना विधिमंडळ सदस्यांना व्हीप बजावला. बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात हा व्हीप होता. पण २१ जून रोजीच त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं

३० जूनला ठाकरे गटानं आयोगाला पत्र लिहिलं - कौल

३० जूनला ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला पक्षांतर्गत बदलांची माहिती देणारं पत्र लिहिलं. त्यांना पक्ष नेतेपदावरून हटवल्याची माहिती दिली असं औल यांनी म्हंटलं आहे

संजय राऊतांविरोधात सर्वपक्षीय आमदार एकत्र; विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणं भोवणार?

खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सत्ताधाऱ्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. त्यामुळे विधीमंडळाला चोरमंडळ म्हणणं संजय राऊतांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राऊतांच्या या विधानाविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घेतली आहे.

अपात्रतेची नोटीस मिळालीच नाही - कौल

 २७ जून रोजी दुसरी अपात्रतेची नोटीस २२ आमदारांविरोधात उपाध्यक्षांनी जारी केली होती पण आजपर्यंत तशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही

२७ जूनला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली - कौल

२७ जून रोजी आम्ही सर्वोच्च न्यायालयात या सगळ्या बाबतीत याचिका दाखल केली होती. अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी अतिरिक्त वेळेची मागणी केली

नीरज कौल यांच्याकडून घटनाक्रमाच वाचन 

प्रभू यांची नेमणूक रद्द झाली होती गोगवले नावे प्रतोद होते - कौल

ही नोटिस अयोग्य असल्याचं तयाच दिवशी सांगितलं होतं.- कौल

22 जूनला ठाकरे गटाची बैठकीसाठी नोटिस - नीरज कौल

बैठकीस हजर न राहिल्यास कारवाईचा इशारा होता - कौल

23 जूनला आपत्रतेची याचिका उपाध्यक्षासमोर आली याचिका - कौल

कारण त्या आमदारांनी व्हीप पाळला नव्हता - कौल

प्रभू यांची नेमणूक रद्द झाली होती गोगवले नावे प्रतोद होते - कौल

घटनाक्रमाबाबत सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिपण्णी

म्हणजेच 21 जुनलाच दोन गट झालेले दिसतात - सरन्यायाधीश

शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद

21 जूनला ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल - कौल

अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नेमणूक झाली - कौल

सुनील प्रभू यांना त्याचवेळी प्रतोद म्हणून नेमल्या गेलं - कौल

21 जूनला शिंदे गटाची उपाध्यक्षांविरोधात नोटिस - कौल

शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद 

21 जून 2022 रोही शिंदेंच्या 34 आमदारांची बैठक झाली

याच बैठकीत सुनील प्रभू यांची नेमणूक रद्द झाली - कौल

महाविकास आघाडीत राहायला नको असा त्या बैठकीत ठराव झाला - कौल

राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरवात; शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू

शिवसेनेकडून नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू

फुटीला मान्यता देण्याची आमची कधीच मागणी नव्हती - कौल

आम्ही शिवसेनेचाच एक भाग आहोत - कौल

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल

खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' असं वक्तव्य संजय राऊत यांना करणं महागात पडलं आहे. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार विधीमंडळात आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांवर विधिमंडळ सभागृहात हक्कभंग दाखल केला आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवलं आहे.

विरोधकांना देशद्रोही म्हणणं तेवढंच चुकीच - बाळासाहेब थोरात 

सर्वांनी जपून शब्द वापरा असं बाळासाहेब थोरात म्हणालेत

संजय राऊत यांच्यावर हक्कभांगाची कारवाई करा- अतुल भातखाळकर 

आशिष शेलार यांच्या मताशी अजित पवार सहमत

एखाद्या नेत्याविषयी किंवा पक्षाविषयी चुकीच बोलल्यावर कारवाई करण्यात यावी या आशिष शेलार यांच्या मतावर अजित पवार आशिष शेलार यांच्या मताशी सहमत आहेत.

विधीमंडळ हे चोरमंडळ, संजय राऊतांचं धक्कादायक विधान

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटाला चोरमंडळ म्हटलं आहे. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्क भंग आणला जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे

पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज पुन्हा आंदोलन

पुण्यात एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज पुन्हा आंदोलन

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर विद्यार्थी एकत्र

एमपीएससी,सरळसेवा या मागण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

तांत्रिक सेवेच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, या घोषणा देत विद्यार्थ्यांचे आंदोलन

एम पी एस सी मार्फत होणाऱ्या सर्व परीक्षा २०२५ पर्यंत बहुपर्ययीच झाला पाहिजे, ही विद्यार्थ्यांची मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस, विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार?

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज विरोधकांकडून कोणत्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नवाब मलिकांच्या जामीनावर आज कोर्टात सुनावणी

नवाब मलिकांच्या जामीनावर आजही कोर्टात सुनावणी सुरू राहील. मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. 

सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस

सलग तिसऱ्या आठवड्यात मंगळवारपासून सुनाणीला सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यावर शिंदेंकडून नीरज कौल यांनी युक्तीवादास सुरूवात केली.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()