हॉकी इंडियाने सरदार सिंह यांची मुलांच्या सब-ज्युनिअर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, तर राणी रामपाल हीची मुलींच्या सब-ज्युनिअर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेसोबत तुटलेल्या युतीबद्दल वक्तव्य केलंय, ते म्हणाले की, "शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे युती तुटली."
घरात पाळलेल्या मांजर तुमच्याकडे आली आहे तिला घराबाहेर सोडा असे सांगणाऱ्या महिलेला मारहाण केल्याची घटना खडकी भागात घडली. याप्रकरणी सिकंदर बागवान, तसलीम बागवान,सलीना बागवान, काल्या बागवान यांच्या विरोधात खडकी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिना सय्यद यांनी याबाबत पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हिना यांनी घरात मांजर पाळले आहे.शेजारी राहणाऱ्या बागवान यांच्या घरातून मांजराचा आवाज आला.यामुळे हिना यांनी दार उघडून मांजराला सोडा असे सांगितले त्यावरून फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस तपास करत आहेत
एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी 11 सप्टेंबरला ही संपाची हाक दिली आहे. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत.
पुणे दौऱ्यासाठी राज ठाकरे रवाना झाले आहेत. पुण्यात संघटनात्मक बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना जाहीर जाहीर करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये निकाल दिला होता, त्यात 3 जण असतील हे स्पष्ट केलं होतं. पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीशांची समिती निवडणूक आयुक्त ठरवतील असं सांगितलं होतं. त्यात केंद्र सरकारने बदल केला आहे. सरन्यायाधीशांना वगळून ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा त्यात समावेश केला आहे.
अविश्वास प्रस्तावावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
संसदेतील अविश्वास प्रस्तावासाठी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांनी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाकडून फझल यांचा व्हीप तर अजित पवार गटाकडून तटकरेंनी व्हीप जारी केला आहे.
काल चर्चेत आलेल्या फ्लाईंग किस प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रीया दिली आहे. प्रेमाचे ममत्व उरले नाही, अशा लोकांना फ्लाईंग किसचे महत्व काय मिळणार आहे. द्वेशावर प्रेमाचा उतारा म्हणून राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिले, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
मायणी दहिवडी मार्गावरील धोंडेवाडी ता. खटाव गावानजीक ओमनीचा अपघात होऊन 3 जण ठार झाले तर 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर वडूज येथे उपचार सुरू असल्याची माहिती घटनास्थळ व पोलिसांकडून मिळाली आहे. सिद्धेश्वर कुरवली व बनपुरी तालुका खटाव येथून आदमापूर या ठिकाणी देवदर्शनाला निघाले होते. साडेसहाच्या दरम्यान धोंडेवाडी तालुका खटाव गावानजीक ओमनीचा अपघात झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.