दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Updated on

इटलीत कारमध्ये बॉम्बस्फोट

इटलीतील मिलामध्ये एका कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

ठाकरे गटाच्या आमदारांची तातडीची बैठक

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 'मातोश्री'वर ठाकरे गटाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलाखण्यात आली आहे.

शरद पवारांनी विरोधकांचं नेतृत्व केलं तर आनंदच- नितीश कुमार

शरद पवारांनी विरोधकांचं नेतृत्व केलं तर आनंदच होईल, अशी भूमिका जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे.

'सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आदित्य ठाकरेंची शिंदे- फडणवीसांवर टीका

"असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक आजच्या निकालानंतर, मिंध्ये- भाजप गद्दार सरकारकडे पाहण्याचा हा एकमेव मार्ग आहे," अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केली आहे. तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी" पूर्वीच्या राज्यपालांची भूमिका ही सरकार ताब्यात घेणे आणि लोकशाही आणि संविधान दडपून टाकणे अशीच होती. त्यांनी राज्यपाल म्हणून नव्हे तर पक्षाचा माणूस म्हणून काम केले," असा घणाघातही यावेळी केला.

निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीला नितीश कुमार

बहुमत चाचणीला पुरेसे पुरावे नव्हते, राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय अयोग्य; राज्यपालांच्या भूमिकेवरही सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी बोलावणं बेकायदेशीर - सर्वोच्च न्यायालय

एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का! शिंदे गटाचा प्रतोद बेकायदेशीर

भरत गोगावलेंची नेमणूक बेकायदेशीर, मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करु शकत नाही. अपात्रतेपासून बचाव करण्यासाठी आम्हीच खरी शिवसेना असे म्हणणे चुकीचे आहे. तो दावा कोर्टानं बाद ठरवला आहे.

दिल्लीच्या निकालाचं सुप्रिम कोर्टात वाचन चालू

'वर्षभरानंतर आम्हीच सत्तेत असू', अमित ठाकरेंचा मोठा दावा

'एका वर्षानंतर नक्कीच आम्ही सत्तेत असणार आहोत.', असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केला आहे. अमित ठाकरे यांनी आज सकाळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची रामटेक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार

माजी केंद्रीय मंत्री आणि जनता दल (युनायटेड) माजी अध्यक्ष आरसीपी सिंह आज दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल ‘या’ दिवशी, दहावीचा निकाल १० जूनपूर्वी

दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल ३ ते ४ जून रोजी जाहीर होईल. तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे.

सविस्तर बातमी- बारावीचा निकाल ‘या’ दिवशी, दहावीचा निकाल १० जूनपूर्वी; ‘डी.एड’ २०२८ पर्यंत सुरुच राहणार

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()