पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं १२ ऑगस्टला उद्घाटन करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेश : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भोपाळला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांचे स्वागत केले.
मराठा क्रांती मोर्चाचा शरद पवार यांना पाठिंबा
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली शरद पवार यांची भेट
शरद पवार यांना तलवार भेट देत मराठा क्रांती मोर्चाने दर्शवला पाठिंबा
खासदार अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने लोकसभा व विधान सभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने सुडबुद्धीने कारवाई केली. खासदारकी रद्द करुन राहुल गांधी यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. या दडपशाहीविरोधात तसेच राहुल गांधी यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्यासाठी आज (ता.१२) मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे.
मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही सुरू केली आहे. राज्यात प्रत्येक स्तरावर काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर महाराष्ट्रातील जनतेशी बोलू”, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
लवकरच मंत्रिंडळ विस्तार होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहेत. तसेच कितीही दौरे केले तर सत्ता महायुतीची येणार, असा टोला सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रदीप गारटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दत्ता मामा भरणे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
राज्यात आणि केंद्रात सुरू असलेल्या राजकारणाबाबत जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. मी जिथे जिथे गेलो तिथे मला तेच चित्र दिसले. एकही काम झाले नाही, योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे विचार करण्याची वेळ आली आहे - या योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही?: उद्धव ठाकरे
राज्यातील काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीतील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले असल्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांबद्दल वापरलेल्या एका शब्दावरून भाजप आक्रमक झाली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एवढं लागायला काय आहे. ज्यांना लागलं त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले तो कलंक नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन आक्रोश केला होता. आता हसन मुश्रीफ यांना सोबत घेतलं. आता मांडीला मांडी लावून बसलेत. आधी आम्हाला बोलायचे बाळासाहेब यांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. आता बर झालं यांनी भरष्टाचाराचे आरोप लावले त्यांना मांडीवर घेतलं. त्यांना मांडी आहे हे आता कळलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
युगेंद्र पवार आज शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. ते मलबार हिल येथील घरी परतले. तर या ठिकाणी मागील २ तासांपासून अजित पवार हे थांबलेले आहेत.
राजभवनात मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे. लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात तीन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ५० लाखांची मागणी केली आहे. तर आज सकाळी छगन भुजबळ यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
'त्या' 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे. विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्जदारानं याचिका मागे घेतली आहे. राज्यपालांना आमदार नियुक्त करायचे असेल तर करू शकतात असं कोर्टाने म्हंटलं आहे.
बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम, अमित देशमुख, नसीम खान, वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, भाई जगताप, कुणाल पाटील, मुकुल वासनिक पोहोचले आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात बैठीला सुरुवात होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निर्भया पथक वाहनांचे लोकार्पण करण्यात आले आहे. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १८४ दुचाकी आणि ४० चारचाकी गाड्या निर्भया पथकात सामील झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निर्भया पथक वाहनांचे लोकार्पण होणार आहे. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १८४ दुचाकी आणि ४० चारचाकी गाड्या निर्भया पथकात सामील होणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता देवगिरी या शासकीय निवासस्थानी आलेले आहेत
गुजरतचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. वागेला यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. वाघेला हे आता काँग्रेस मध्ये आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. लोकमान्य टिकळ स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्काराचे वितरण लोकमान्य टिळक यांच्या १०३व्या पुण्यतिथी दिवशी (१ ऑगस्ट रोजी) पुण्यात पार पडणार आहे. या कार्यक्राचे प्रमुख पाहुणे शरद पवार असणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहित टिकळ यांनी दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महाराष्ट्र काँग्रेसच्या २०-२५ प्रमुख नेत्यांसह पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यांच्या कार्यालयातील व्यक्तीच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आलेली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले आहे. धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.