पंतप्रधान म्हणतात एका घरात दोन कायदे कसे असतील? हे चुकीचे आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये सीआरपीसी अद्याप लागू नाही. हिंदू अविभक्त कुटुंबांतर्गत इतर समाजातील लोकांना कर सवलत का मिळत नाही? समान नागरी कायदा आल्याने आपल्या हिंदू बंधू-भगिनींना सर्वाधिक त्रास होईल. हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा हे सर्व निघून जाईल. हिंदू अविभक्त कुटुंबांतर्गत हिंदू भावंडांना मिळणारा करमाफीचा लाभही निघून जाईल: AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी, नांदेड
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजप नेत्यांची ते भेट घेणार आहेत.
वसई शहरात १० जुलै रोजी झालेल्या हिट अँड रन प्रकरणी आरोपी कार चालक अर्जुन श्रीवास्तव याला अटक करण्यात आली आहे.
वसई शहरात पालघरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नांदेडमध्ये 2011 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान परवानगीशिवाय जाहीर सभा आयोजित केल्याप्रकरणी AIMIM अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना आज नांदेड न्यायालयाने जामीन मंजूर केला.
काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक १६ जुलै रोजी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे.
रणनीती आणि संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडल्या जाणार्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
खाते वाटपावर चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.
उद्या संध्याकाळपर्यंत मंत्रिमडळ विस्तार होणार अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली आहे
देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत ते त्यांची निराशा आहे. जे काल मुख्यमंत्री होते, ते आता दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत काम करत आहेत. राजकारणात आणि प्रगतीच्या शिखरावर असलेला महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांच्या राजवटीत इतका खाली आला आहे. याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार इतका वाढला आहे की ते त्याला प्रतिसाद देत नाहीत: संजय राऊत
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवार आज त्र्यंबकेश्वर तालुक्यात पहिली बैठक होत आहे.
शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीचे नेतेही काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ सुरू असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत.राहुल गांधींवर झालेल्या कारवाई विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी एकवटले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधी दिली नसावी, त्यामुळे आमच्या शपथविधीचा विचार झाला नाही, असा दावा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे.
मोदी आडनावाचा वाद आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे. राहुल गांधी यांची याचिका फेटाळल्यानंतर भाजप आमदार पूर्णेश मोदी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. मोदी यांच्याकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्यापूर्वी मोदी यांच्याकडून कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे. आमची बाजूही ऐकून घेण्यात यावी अशी मागणी मोदी यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. गुजरात हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे.
महाराष्ट्रासह पाच राज्यात काँग्रेसकडून मौन आंदोलन करण्यात येणार आहे. . राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेस मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ‘मौन सत्याग्रह’ आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी मौन सत्याग्रहासाठी वर्षा गायकवाड आणि नाना पटोले उपस्थित झाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. आज मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांच्या पत्नी सीता दहल यांचे आज दिर्घ अजारानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. त्यातील 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 9 जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालकमंत्री दादा भुसे यांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, सप्तश्रृंगी घाटात ST बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे, त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अशी प्राथमिक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना.
सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 18 प्रवासी होते. सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी बसचा अपघात झाला. सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.