Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
esakal Breaking News
esakal Breaking News
Updated on

सोलापूरातील बार्शीमध्ये एका हॉटेलला भीषण आग

सोलापुरातील बार्शीमध्ये एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. यात जीवितहानी झाली नसल्याचं कळतंय.

अमेरिकीचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू, शीख, बौद्ध, जैन मोठ्या प्रमाणात राहत असून ते अमेरिकेत उत्सव साजरा करत असतात. त्यांना माझ्या शुभेच्छा असं ते म्हणाले आहेत.

हिंगोलीमध्ये मराठा तरुणांचे अर्धनग्न आंदोलन

हिंगोलीमध्ये मराठा तरुणांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ तरुणांनी अर्धनग्न आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दिवाळीनिमित्त राष्ट्रपती भवनावर रोषणाई

दिवाळीनिमित्त राष्ट्रपती भवन, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकवर रोषणाई करण्यात आली आहे.

शरद पवारांचं व्हायरलं होणारं सर्टिफिकेट खोटं

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं खोटं सर्टिफिकेट व्हायरल होत आहे. याप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. शरद पवारांचं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी केला आहे. (संपूर्ण बातमी येथे वाचा)

मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले; शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. ठाकरे शनिवारी मुंबईत तोडफोड झालेल्या शाखेला भेट देण्यासाठी आले होते. या मुद्द्यावरुन त्यांनी निशाणा साधला.

उत्तर प्रदेशात स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

उत्तर प्रदेशातील नंदग्राममध्ये स्क्रॅप मार्केटला आग लागली होती. यावेळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. सध्या आग नियंत्रणात आली आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांचा पुन्हा भारतावर निशाणा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला. खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्त्येचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की, आम्ही कायदा विरोधी राजवटीच्या विरोधात कायम उभे ठाकतो.

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा मराठा आंदोलकांनी कीर्तनाच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं

परभणीमधील मराठा बांधवांनी रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांची गाडी अडवून त्याना गावात येण्यास मज्जाव केला. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. काही दिवसांपुर्वी त्यांची गाडी अडवली होती, आजही त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. आज त्यांना गंगाखेड तालुक्यातील पडेगावात जाण्यापासून रोखलं आमदार रत्नाकर गुट्टे हे परभणी तालुक्यातील पडेगावात एका कीर्तनाच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी त्यांची गाडी अडवण्यात आली आहे.

हिमाचलमध्ये PM मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशात पोहोचले आहेत. लेपचा येथे पंतप्रधानांनी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (Twitter) वर लिहिले, 'मी शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे आलो आहे'. अचानक पंतप्रधानांना त्यांच्यामध्ये पाहून सैनिकही आश्चर्यचकित झाले.

ठाण्यातील मामलेदार मिसळवर CM शिंदेंना मारला ताव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दीपावलीच्या निमित्ताने तलाव पालीला फेरफटका मारत थेट ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदारची मिसळ खायला गेले. मुख्यमंत्री यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील मिसळवर ताव मारला. मिसळ खाल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मिसळचे पैसे आणि तेथील कामगारांना दिवाळी भेट ही दिली.

मनोज जरांगेंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीकडे जाताना जंगी स्वागत

मनोज जरांगे पाटील हे डिस्चार्जनंतर अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. रस्त्यामध्ये त्यांचं अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. काही ठिकाणी क्रेनद्वारे पुष्पगुच्छ तर काही ठिकाणी मोठमोठे हार घातले जात आहेत. काही दिवसापूर्वी भालगाव येथील मराठा युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती, त्या युवकाच्या कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे. आज दिवसभर विविध ठिकाणी त्यांच्या भेटीही आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साजरी केली पालावरची दिवाळी 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालावरची दिवाळी साजरी केली आहे. यावेळी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

शरद पवारांची प्रकृती स्थिर, गोविंदबागेत पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती आज व्यवस्थित असून त्यांनी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शनिवारी (ता. 11) विद्या प्रतिष्ठानची बैठक सुरु असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. दिल्ली येथील वास्तव्यामुळे प्रदूषणामुळे त्यांच्या घशाला सूज आली होती.

राज्यात आज दिवाळीचा उत्साह. आज लक्ष्मी पूजण आहे. तसेच देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.