झारखंडमधील जगुवारमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये दोन जवांनाचा मृत्यू झाला. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी माहिती दिली.
मुसळधार पावसामुळे हिमाचलप्रदेशमध्ये आपत्ती सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांच्या बचावासाठी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली आहे. आतापर्यंत १५० नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे.
इर्शाळवाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीच्या नागरिकांची ज्या कंटेनरमध्ये तात्पुरती सोय करण्यात आली आहे, त्या निवारा केंद्राची पाहणी केली. या लोकांना पायाभुत सुविधा मिळत आहेत की नाही याचा आढावा त्यांनी घेतला. जे मुलं या घटनेत अनाथ झाले, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले
नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण यांच्यात कोणी गल्लत करु नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच ऐकमेकांशी भांडण झालेलं नाही. गैरसमज नसावे. मी स्वत: काँग्रेस आणि शिवसेनेशी बोलली आहे. त्यामुळे इतरांनी कोणी चिंता करु नये. सांगोल्यातली पवारसाहेबांची सभा आणि प्रेस बघितली असेल, तर मला संभ्रमाची स्थिती वाटत नाही', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीतील लाभार्थी रुग्णांचा आनंद मेळावा सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असून, यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मोबाइल अॅप तथा व्हॉट्सअॅप हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे.
उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व 48 जागांचा आढावा घेणार आहेत. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा मतदार संघनिहाय उद्यापासून बैठकांचा धडाका सुरु होणार आहे. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.
राजगडावर पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील ४ पर्यटक रात्री राजगडावर गेले होते. रात्रीच्या सुमारास त्यातील एक पर्यटक जवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो पाण्यात पडला. त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांनी शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही. सकाळी तो पाण्याच्या टाकीत आढळुन आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांची कुर्ला येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.