Marathi News Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
BJP
BJPesakal
Updated on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन भुवनेश्वर विमानतळावर दाखल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन भुवनेश्वर विमानतळावर दाखल झाल्या आहेत. त्या दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे देखील होते.

महाराष्ट्रातील भाजपचे 40 आमदार मध्यप्रदेशमध्ये ट्रेनिंग साठी जाणार

19 ऑगस्टला राज्यातील आमदार मध्यप्रदेश ला जाणार आहेत. 4 राज्यातील भाजपच्या 350 आमदारांना भोपाळमध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 18 तारखेला आमदार भोपाळ मध्ये पोहोचतील. ज्या राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत, त्या ठिकाणी इतर राज्यातील आमदारांकडून सर्वे घेण्यात येईल. या सर्वेबद्दलचं ट्रेनिंग या आमदारांना दिली जाणार आहे.

अजित पवार नवाब मलिकांची भेट घेण्यासाठी पोहोचले त्यांच्या निवासस्थानी

मनी लॉंड्रिंग प्रकरणात दीड वर्ष शिक्षा भोगल्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या नवाब मलिकांची भेट घेण्यासाठी अजित पवार त्यांच्या घरी पोहोचले आहेत. यावेळी नवाब मलिका कोणत्या गटात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सीईसीच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या कार्यालयात दाखल

सेंट्रल इलेक्शन कमीशनच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि शिवराज सिंह दिल्लीत दाखल

केंद्रीय समितीच्या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

अजित पवार गटाच्या बैठकीला सुरुवात

अजित पवार गटाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे मंत्री देखील उपस्थित आहेत.

अजित पवार गटाकडून राज्यात लवकरच महाराष्ट्र परिक्रमा यात्रा

27 तारखेला बीड मधुन अजित पवार गटाच्या महाराष्ट्र परिक्रमा यात्रला सुरू होणार आहे. महाराष्ट्र परिक्रमा यात्रे सोबत 'संत आपुले दारी' यात्रा देखील वारकरी अध्यात्मिक आघाडीच्या वतीने यात्रा काढण्यात येणार. तुकाराम महाराजांचे विचार या यात्रेच्या माध्यमातून गावागावात पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने करण्यात येणार आहे.

शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा, कार्यकर्त्यांशी साधतायत संवाद

नुकतीच शरद पवारांनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,"मी ८-१० दिवसांपासून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतोय." जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एक गट सत्तेत सामील झाला होता, त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की ते कार्यकर्त्यांमध्ये जाऊन पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात करतील.

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारतीय जनता पक्षावरही टीका केली. ते म्हणाले की,"भाजपची भूमिका समाजविरोधी आणि तेढ निर्माण करणारी आहे. समाजात कटुता कशी वाढेल हीचं भाजपची भूमिका आहे. "

मुंबई -गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून पाहणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली आहे. राज ठाकरे पाहणी करण्यासाठी पनवलेला पोहोचले होते. यावेळी त्यांचे असंख्य कार्यकर्तेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा महत्वाचा निर्णय

कृषी विद्यापीठातील घडामोडीबाबतची माहिती माध्यमांपर्यंत तातडीने पोहचवण्याच्या कृषी विद्यापीठांना कृषी मंत्र्यांच्या सक्त सूचना दिल्या आहेत. राज्यातील हवामान बदल, शेतीतील नवनवीन प्रयोग, संशोधन याबाबतची माहिती नियमीत माध्यमांना देण्याची सक्त सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. कृषी विद्यापीठातील सकारात्मक घडामोडी माध्यामांपर्यंत आणि त्या माध्यमातुन शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचत नसल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. कृषीमंत्री यांच्या नाराजीनंतर कृषी खात्याकडून परिपत्रक जारी करून तत्काळ माहिती पोहोचवण्याचे विद्यापीठांना आदेश देण्यात आले आहेत.

शरद पवारांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा

शरद पवार उद्या अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सभा घेत आहे. त्यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शरद पवार उद्या काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सना खान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

सना खान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, मध्य प्रदेशमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे, तो मृतदेह सना खान यांचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर चालतं पण मी बोललो तर देशद्रोही? राज ठाकरेंची टीका

२०१४ मध्ये गोव्यात कायदा झाला. शेत जमिन मिळणार नाही, जर शेत जमीन घेतली तर तिथे शेतीच करावी लागते असा कायदा आहे. तिथे भाजपाचा सत्ता आहे. आम्ही गोव्याचा गुरगाव किंवा छत्तीसपूर होऊ देणार नाही, असं गोव्याचे मुख्यमंत्री म्हणतात. उत्तरेच्या लोकांना जमिनी देणार नाही, असा अर्थ असं राज ठाकरे बोलला तर राज ठाकरे देशद्रोही असं राज ठाकरे बोलताना म्हणाले आहेत.

घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी दिला दम म्हणाले..

एक अंगार बाकी भंगार अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. त्यावर एक अंगार बाकी भंगार म्हणजे सगळेच आले नाही, त्यात आपणही आलो असं राज म्हणाले. विषय रस्त्यांचा आहे, ही घोषणा मला समजली नाही म्हणत घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी दम दिला आहे.

राज ठाकरे पालघरमधील निर्धार मेळाव्याच्या ठिकाणी दाखल

राज ठाकरे पालघरमधील निर्धार मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'आम्ही शरदमित्र' नावाने नोंदणी अभियान

पुण्यातील कोथरूड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)कडून नवीन अभियान सुरु करण्यात आले आहे, 'आम्ही शरदमित्र' या नावाने नोंदणी करण्यात येणार आहे. पुण्यातील कोथरूड भागातून सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज करण्यात येणार आहे. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं अभियान होत आहे.

काँग्रेस कोअर कमिटी बैठक सुरू

काँग्रेस कोअर कमिटी बैठक सुरू आहे. यामध्ये नाना पटोले, अशोक चव्हाण ,सुशील कुमार शिंदे, सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, नसीम खान, कुणाल पाटील उपस्थित आहेत.

राष्ट्रवादी पक्षानं आपला संभ्रम दूर करावा- अशोक चव्हाण

काँग्रेस कोअर कमिटीची आज बैठक पार पडणार आहे. राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे, पण महाविकास आघाडी एकत्र येणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाने आपला संभ्रम दूर करावा असं आवाहन अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

अजित पवार गटाची आज देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू

अजितदादा गटाची आज देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडत आहे. या बैठकीत पक्ष संघटनावाढीवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, संजय बनसोडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अमोल मिटकरी यांच्यासह इतर पदाधिकारी बैठकीसाठी पोहोचलेत.

भीषण अपघातात काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या मुलाचा जागीच मृत्यू

रोहित हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. यावेळी समोरून येणाऱ्या कारला दुचाकी धडकली. दुचाकी जास्त वेगात असल्याने धडकेत रोहित उंच हवेत फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय

एसटी बसचा अपघात; चालकासह १० ते १५ विद्यार्थीं जखमी

सवणा ते चिखली या ठिकाणी एस टी बसचा अपघात झाला आहे. स्टिअरिंग लॉक झाल्याने एस टी पलटी झाली. चालकासह दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. बस सवणावरून चिखलीकडे जात होती. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते. सकाळी सातच्या सुमारास घडली घटना.

कोल्हापूर सांगली, सातारा जिल्ह्यात भूकंपाचे जाणवले धक्के

कोल्हापूरमध्ये आज 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी 6.45 च्या सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थळ 5 किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.