Marathi News Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
beating
beatingesakal
Updated on

पुण्यातील वानवडी भागात दोन गटात तुफान हाणामारी, २ते ३ जण गंभीर जखमी

पुण्यातील वानवाडीभागातील सय्यदनगरमध्ये दोन गटांमध्ये तुफान मारहाण झाली आहे. या हाणामारीत २ ते ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सध्या राज्यात येड्याचं राजकारण, नाना पटोलेंची सरकारवर टीका

नाना पटोलींनी पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, "सध्या राज्यात येड्याचं राजकारण."

कुर्ल्याच्या नारायणनगरमधील औद्योगिक वसाहतीला आग

कुर्ल्याच्या नारायण नगर येथील औद्योगिक वसाहतीला भीषण आग लागली आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या छतावर आग लागली होती. आगीत टेरेसवर ठेवलेले डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले आहे. पाच फायर इंजिन आणि सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

घाटकोपरमधील कंपनीला भीषण आग, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

घाटकोपरमधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, कंपनीमध्ये ज्वलनशील साहित्य असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचण निर्माण होत आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट निर्माण झाले आहेत.

महिलेशी गैरवर्तन करणारा आयपीएस अधिकारी निलंबित

गोव्याच्या एका नाईट क्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्य़ात आलं आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी सीमेवरील टोलनाका अज्ञातांनी फोडला

सिंधूदुर्ग-रत्नागिरी सीमेवरील हातविले गावातील टोलनाका काही लोकांकडून फोडण्यात आला आहे. काही लोकांच्या मते हा टोलानाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला असल्याचं समजतंय. मात्र, मनसेकडून अद्याप या घटनची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली नाही.

जेपी नड्डा दमणमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा दमणला पोहोचले आहेत. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

मलेशियामध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत १० लोकांचा मृत्यू

मलेशियामध्ये एक्सप्रेसवेवर इमर्जंन्सी लॅंडिंग करताना झालेल्या दूर्घटनेत १० लोकांचा मृत्यू झाला आहे.

देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक सुरु

शरद पवारांची नुकतीच बीडमध्ये सभा पार पडली. त्यानंतर आता अजित पवार गटांच्या नेत्यांची देखील बैठक देवगिरी बंगल्यावर सुरु झाली आहे.

मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना मोठा धक्का

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना मोठा धक्का बसलाय. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याचे उघड झाले आहे.

शरद पवारांचा वयाच्या मुद्द्यावरुन विरोधकांना टोला

शरद पवारांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला आहे.

'स्त्रियांची धिंड काढली जात आहे' शरद पवारांचा भाजपच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

सध्या बीडमध्ये शरद पवारांची सभा सुरु आहे. यावेळी त्यांनी मणिपुरच्या विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मणिपुरमधील मधील एका घटनेचा उल्लेख करत सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,कारवाईसाठी तरुणांचा रास्ता रोको

सोशल माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी करण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात घडला. हा प्रकार निंदनीय असून हजाराे युवकांनी आज (गुरुवार) संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले. आज शेकडाे युवक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले. या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी थांबवावी अशी मागणी करत आंदाेलनास प्रारंभ केला.

हसन मुश्रीफांना कोर्टाचा दिलासा, त्यांच्या मुलांच्या जामीनाची सुनावणी तहकूब

राष्ट्रवादी आमदार आणि विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी तहकुब करण्यात आली आहे. पुढील सुनावणी 4 सप्टेंबरला होणार आहे. हसन मुश्रीफ यांची मुलं साजिद, आबीद आणि नाविद यांना दिलासा मिळाला असून 4 सप्टेंबर पर्यंत तिघांना राहणार कोर्टाचं संरक्षण कायम राहणार आहे.

जितेंद्र आव्हाडांची संभाजी भिडेंवर बीडच्या सभेत सडकून टीका

सध्या बीडमध्ये शरद पवारांची सभा सुरु आहे. या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उल्लेख केला की, " भिडे समजतात की त्याच्या मनूपेक्षा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर छोटे आहेत."

मणिपुर मुद्द्यावरुन सभागृहात गोंधळ, भाजपच्या ४ आमदारांना मार्शलने दाखला बाहेरचा रस्ता

मणिपुर विषयावर सभागृहात गोंधळ बघायला मिळाला होता. अशातच, दिल्ली विधानसभेतून भारतीय जनता पक्षाच्या चार आमदारांना मार्शलने बाहेर काढले आहे.

शरद पवार बीडमध्ये सभास्थळी दाखल, कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा

शरद पवार बीडमध्ये सभास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

आज संध्याकाळी 5 वाजता अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक

आज संध्याकाळी 5 वाजता अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येत आहे. शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर अजित पवार गटाच्या पुढच्या भूमिकेबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या बीडच्या आजच्या सभेनंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटातील नेत्यांचे देखील शरद पवारांच्या आजच्या सभेकडे प्रामुख्याने लक्ष असणार आहे. शरद पवारांची भूमिका स्पष्ट झाल्यास अजित पवार गट देखील आपली आगामी काळातली रणनीती ठरवणार असल्याची माहिती आहे.

शरद पवार सभेसाठी बीडमध्ये दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जल्लोषात स्वागत

शरद पवार सभेसाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे जल्लोषात स्वागत केलं आहे. सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात शरद पवार गटाचे पहिले पक्ष कार्यालय नाशिकमध्ये सुरू

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून तात्पुरत्या स्वरूपात नवीन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ मुख्य कार्यालयाच्या शेजारीच शरद पवार गटाकडून हे कार्यालय तयार करण्यात आले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकची व्यवस्था व्हावी, यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. सत्तेचा वापर आणि पोलिसांच्या मदतीने मुख्य कार्यालय अजित पवार गटाने बळकावल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय. तसेच मुख्य कार्यालय राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावावर असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही कार्यालय ताब्यात घेऊन, अशी माहिती शहराध्यक्ष गजानन शेलार व जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी दिली.

बालेवाडीजवळ मुंबई बंगळूर महामार्गालगत एका चारचाकी वाहनाने घेतला पेट

बालेवाडी येथे मुंबई बंगळूर महामार्गालगत एका चारचाकी वाहनाने पेट घेतला आहे.त्यामुळे रस्त्यावर नागरिकांनी बरीच गर्दी केली आहे. तसेच येथे वाहतूक कोंडी झाली आहे. ही घटना नुकतीच घडली असुन अग्निशमन दल आग विझवत आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणील सुनावणीसाठी खासदार संजय राऊत, सहआरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर

पत्राचाळ घोटाळा प्रकरणील सुनावणीसाठी खासदार संजय राऊत, सहआरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर झाले आहेत. आज आरोप निश्चिती होणार आहे. गुरू आशिष कंस्ट्रक्शनसाठी पत्राचाळ घोटाळ्याचा खटला थांबवून ठेवायचा का? असा सवाल मागील सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं केला होता. कंपनीची जबाबदारी घेण्यास कुणीही पुढे येत नसल्यानं आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली आहे. ईडीनं बनवलेल्या आरोपी क्रमांक 4 वरील कंपनीचं प्रकरण NCLTत प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर आज महत्वाची सुनावणी होणार आहे.

शरद पवार संभाजीनगरवरून बीडकडे रवाना; कार्यकर्त्यांकडून फुलांचा वर्षाव

शरद पवार संभाजीनगरवरून बीडकडे रवाना झाले आहेत. वाटेत कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जात आहे.

जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी RPF जवान चेतन सिंहला केले बडतर्फ

जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी RPF जवान चेतन सिंहला बडतर्फ करण्यात आले आहे. आर पी एफ च्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी चेतनला बडतर्फ केलं आहे. चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात तीन प्रवाशांसह ASI टिकाराम मीना यांचा मृत्यू झाला होता. सध्या चेतन सिंह ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात भर्ती आहे.

शरद पवार संभाजीनगरवरून बीडकडे रवाना 

आज बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी शरद पवार संभाजीनगरवरून बीडकडे रवाना झाले आहेत.

बीडमध्ये आज शरद पवारांची तोफ धडाडणार

आज बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात ही सभा होत आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटाची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गट तयारीला लागला आहे. कालपासून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ठाकरेंच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. आज नगर, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या बैठका होणार आहेत. आज दुपारी 12 वाजल्यापासून बैठकांना सुरुवात झाली आहे. काल झालेल्या बैठकांमध्ये भाजपच्या विरोधात लढण्याच्या तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

या बैठकीला मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख, विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख उपस्थित राहणार आहेत

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Related Stories

No stories found.