अकोला येथे काल रात्री ही घटना घडली मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करुन १५ वर्षीय आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुली परतत होत्या. रस्त्यात त्यांना एक तरुण दिसला. त्याने त्यांना घरी सोडतो म्हणून सोबत नेलं. तिथे गेल्यावर त्यांना शीतपेयामधून गुंगीचं औषध दिलं आणि चौघांनी मिळून अत्याचार केला. ही घटना काल सायंकाळी घडली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर केला धक्कादायक आरोप, मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या मनात मुंबईत येण्याची भीती असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तर सरकारमध्ये मंत्री सुरक्षित नाहीत.असा आरोप त्यांनी केला आहे.
हिंगोलीत अतिक्रमणधारकांचे बांधकाम काढण्याचे काम चालू होते मात्र याला विरोध करण्यासाठी काही अतिक्रमणधारकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये पोलिसांच्या वाहनाची काच फुटली तर नगरपालिकेचा एक कर्मचारी व पत्रकार जखमी झाले.
पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची २ दिवसांपूर्वी अपर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई येथे बदली करण्यात आली होती. मात्र आज नव्याने प्राप्त झालेल्या आदेशात अमिताभ यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. गुप्ता यांची नियुक्ती आता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आली आहे.
घाटकोपर पूर्व भागात असलेल्या पारख रुग्णालयाला ही भीषण आग लागली आहे. रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या मागच्या बाजूला आग लागली. काही क्षणांमध्ये ही आग पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यापर्यंत पोहोचली. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुण्यातील एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भीमा कोरेगांव, वडू या ठिकाणी एआयएम कंपनीत ही आग लागली. अग्निशमन दलाकडून (पीएमआरडीए ४, एमआयडिसी १, पीएमसी १) वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटकोपरमध्ये रुग्णालय असलेल्या इमारतीतील हॉटेलच्या मागील बाजूस आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नसल्यामुळे आग वाढत चालली आहे. रुग्णालयात अनेक लोक अडकले आहेत. स्थानिकांकडून त्यांना वाचवण्याचे आणि इमारतीच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या नाकाखालून त्यांचं सरकार नेलं. आमचं सरकार टिकणार आहे. आमचं सरकार पूर्ण काळ टिकेल. आम्ही पुढची निवडणुकही जिंकू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला आहे. महाविकास आघाडीचा मिळून इतकांच मोर्चा निघाला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
'छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. संयुक्त महाराष्ट्रावेळी मोर्चे निघाले. महाराष्ट्रासाठी आपण सगळे एकवटलो आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना लवकरात लवकर हाकला. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना राज्यातून हाकला त्यांची हकालपट्टी करा असं शरद पवार म्हणाले आहेत.
सध्याचे पालकमंत्री मुंबईचा हिशोब स्क्वेअर फुटामध्ये करतात. तर मी कोश्यारी यांना राज्यपाल मानत नाही.
आपल्या राज्याला, देशाला सांस्कृतिक वारसा आहे. आपण हे विसरू नये. मराठी भाषिकांना त्रास देऊ नये. त्यांचं रक्त सांडू नये. राज्यातील महापुरुषांचा अपमान दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कर्नाटकच्या सीमेवर मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. गाड्या फोडल्या जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. शरद पवार मविआच्या सभेला संबोधित करणार करणार आहेत.
शिवशक्ती भीमशक्तीला काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध कायम असल्याचे दिसत असून आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. त्यामुळे शिव भीम शक्तीचा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. ठाकरेंनी सामावून घेतलं नाही तर आम्ही एकटे लढू पण भाजपसोबत जाणार नाही. शरद पवारांचा आम्हाला विरोध कायम आहे असंही आंबेडकर म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. तर या राज्यातील विविध प्रश्नांवर आज महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेल्या महामोर्चात रश्मी ठाकरे सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर या मोर्चात रश्मी ठाकरे सहभागी झाल्यामुळे त्या सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या जामीन अर्जावर आज दिल्लीतील न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने आफताबच्या जामीन याचिकेवर सुनावणीसाठी 22 डिसेंबर ही पुढील तारीख सांगितली आहे.
महाविकास आघाडीचे नेते, आमदार आणि खासदारही कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मोर्चासाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या आहेत. या नेत्यांसाठी सर गोष्टींनी सुसज्ज अशी व्हॅनिटी व्हॅन तैनात ठेवण्यात आली आहे. महत्त्वाच्या नेत्यांसाठी ही व्हॅनिटी व्हॅन ठेवण्यात आली आहे.
मविआच्या मोर्चामध्ये ठाकरे कुटुंबीय सहभागी झाले आहेत. मविआच्या महामोर्चामध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत.तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे आदी मोठे नेते सहभागी झाले आहे.
एकीकडे मविआचा महामोर्चाला तर दुसरीकडे भाजपचं माफी मागो आंदोलन सुरू झालं आहे. अमोल मिटकरी, सुषमा अंधारे, यांनी माफी मागितली पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
मविआच्या महामोर्चाला सुरवात; फलक, झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.
सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानोच्या आधीच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. गुजरात सरकारला 1992 च्या धोरणानुसार दोषींच्या माफीच्या याचिकेवर विचार करण्यास सांगितले होते.
पुण्यात अलका चौकात भाजपचे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला आहे. पाकिस्तानच्या वादग्रस्त व्यक्तव्याचे पुण्यात पडसाद दिसून येत आहेत.
रिचर्डसन क्रुडास मिल, जे. जे. मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाइम्स ऑफ इंडिया या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मध्य मुंबईतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भायखळा येथून नागपाडा जंक्शनमार्गे मुंबई सेंट्रल येथून पुढे जाता येईल किंवा चिंचपोकळी, सातरस्ता मार्गे आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल या रस्त्याने दक्षिण मुंबईकडे जाता येईल, अशी माहीती वाहतुक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. चार रस्ता, रफी अहमद किडवाई मार्ग, पी डिमेलो मार्गेही दक्षिण मुंबईत जाण्यासाठी मार्ग मोकळा असणार आहे.
महाविकास आघाडीचा मुंबईत आज महामोर्चा निघणार आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करणारे सत्तेत बसले आहेत. ठाणे बंद करण्यापूरतीच एकनाथ शिंदे यांची ताकद आहे.
महाविकास आघाडीचा मुंबईत आज महामोर्चा निघणार आहे. या मार्चाच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संबोधित करणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील भायखळ्यातील रिचर्ड सन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असली तरी राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.