Marathi News Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Earthquake
Earthquake
Updated on

आसाम भूकंपाने हादरलं! ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा

आसाम राज्याला भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती.

काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा विश्वास

राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा बहुमत मिळवून सत्तेत येईल, असा दावा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे.

पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली एका आमदाराची हकालपट्टी

कॉंग्रेसने आमदार संदीप जाखर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाई करण्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे पुतणे आहेत.

नाशकातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अनुभव वाईट, आदित्य ठाकरेंनी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल केले भाष्य

आदित्य ठाकरे सध्या नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रवासाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, "खड्ड्यांचा अनुभव वाईट आहे. कुणीही लक्ष देत नाही "

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, ४० कोटींचा गांजा जप्त

दिल्ली पोलिसांनी ४० कोटींचा गांजा जप्त केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी घेतली नवाब मलिकांची भेट

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिकांची भेट घेतली आहे.

रतन टाटांचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'उद्योग रत्न 'पुरस्काराने गौरव

रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाकडून उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रतना टाटांना हा पुरस्कार देण्यात आला.

चर्चगेटमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, संजय राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी

दैनिक 'सामना'मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील चर्चगेटमध्ये आंदोलन करण्यात आलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

'आम्ही ३०० युनिट मोफत वीज देऊ', निवडणुकीच्या आधी अरविंद केजरवाल यांची घोषणा

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच, अरविंद केजरीवाल यांनी रायपुरमध्ये भाषण करताना छत्तीसगडच्या लोकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली.

कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतात आणीबाणी जाहीर, हजारो लोकांना करावे लागले स्थलांतर

कॅनडामध्ये जंगलाला लागलेल्या विक्राळ रुप धारण केलं आहे. या वणव्यामुळे जवळपास १० हजार लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. अजूनही २० हजार लोकांचे स्थलांतर करण्याची तयारी सुरु आहे.

भाजपने बोलावली पक्षाच्या सरचिटणीसांची बैठक

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पुढील आठवड्यात पक्षाच्या सरचिटणीसांची बैठक घेणार आहेत

रतन टाटांनी 'उद्योगरत्न' पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार - CM शिंदे 

महाराष्ट्र सरकारकडून उद्योगरत्न पुरस्कार सुरू करण्यात आला आणि हा पहिला पुरस्कार उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आला. देशासाठी रतन टाटा आणि टाटा समूहाचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्र सरकारचा हा महत्वपूर्ण पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. रतन टाटा यांना हा पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची देखील सन्मान आणि उंची वाढली आहे, अशी प्रतिक्रया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उद्योगपती रतन टाटा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात टाटांच्या निवासस्थानी पोहचणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी पोहचतील. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उद्योगपती रतन टाटा यांना आज पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

राज ठाकरे आज पासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. ढोल ताशांच्या गजरात त्यांचं शहरात स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या काळात ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत.

....असेच हे लोकसभेच्या निवडणुका स्थगित करू शकतात -  आदित्य ठाकरे

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूका आणि अमित ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही लोकांवर बोलत नाही. त्यांना करू दे... मी काल पण हेच सांगत होतो... निवडणूक जशी स्थगित झाली, यांची तयारी नाहीये. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुका स्थगित होणं हे अत्यंत धोकादायक आहे... असेच हे लोकसभेच्या निवडणुका स्थगित करू शकतात. आपल्या देशात लोकशाही नाहीय असच समजून पुढची वाटचाल होणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत

कर्नाटकात शिवरायांचा पुतळा हटवल्याबद्दल बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की, लोक योग्य ती प्रतिक्रिया देणारच आहेत... मात्र, या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे? हे पाहणं गरजेचं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार रतन टाटांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज, शनिवार, दि.१९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असणार आहेत. यावेळी रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाचा ''उद्योगरत्न" पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरवण्यात येईल.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.