Marathi News Update: मुंबईसह देशभरातील पावसाची स्थिती जाणून घ्या, एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Live Update
Live Update
Updated on

यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी पहिल्यांदाच पडली पात्राबाहेर

यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे. शिवाय कासारी नदीने देखील पात्र ओलांडले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना कऱण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बांधाऱ्याची पातळी 28.3 फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील तीन जिल्हा मार्ग आणि दोन राज्यमार्ग बंद करण्यात आले आहेत. उद्या कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.

पुढे ढकललेल्या दहावी, बारावीची परीक्षा पुढील महिन्यात

राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने 10वी आणि 12वी च्या पुरवणी परीक्षा उद्या दिनांक 20 जुलै 2023 रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत. 10वी चे पुढे ढकलण्यात आलेले पेपर 2 ऑगस्ट 2023 रोजी होतील. तर 12 वीचे पेपर 11 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन राज्यातील पूरप्रवण क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि गडचिरोली येथील परिस्थितीची माहिती त्यांनी जाणून घेतली.

पावसाच्या पाण्यात पोलीस स्थानक बुडाले 

मुसळधार पावसाने कोकणासह रायगड जिल्ह्याला झोडपले. अनेक ठिकाणी पाणी साचले असून रसायनीमधील पोलीस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. संपूर्ण पोलीस स्थानक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये उद्या  सुट्टी

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदार वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये शाळांना उद्या सुट्टी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

रेल्वे स्थानकांच्या बाहेर एसटी बसेस सोडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुसळधार पावसामुळे रेल्वे उशीरा धावत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेरून तातडीनं बस आणि एसटी सेवा सुरु करण्होयाचे निर्देश दिले आहेत. सर्व रेल्वे स्थानकांत सध्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, ठाणे स्थानकाच्या बाहेरून एसटी व बसेस सोडण्यात येणार आहे. तसेच चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अधेरी व बोरिवली स्टेशनच्या बाहेर एसटी व बसेसची सोय करण्यात येणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. काही मार्गावरील लोकस सेवा बंद असून अनेक लोक उशिराने धावत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते डोंबिवली लोकल सुरू

मध्ये रेल्वेवरची सीएसएमटी ते डोंबिवली लोक सुरू झाली आहे. हर्बर रेल्वेरली वाहतूक अर्ध्या तास उशिराने धावत आहे. मात्र कल्यापासून पुढची लोकसेवा बंद आहे. मुसळधार पावसामुळे तिन्ही रेल्वेमार्गावर लोकल उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चिपळूण तालुक्यातील कामथे धरण ओव्हरफ्लो

कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत असून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील कामथे धरण मुसळधार पावसाने पूर्णपणे प्रवाहीत झाले आहे. पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता.

मुसळधार पावसाची स्थिती पाहता मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि परिसरातील मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

कोकणातील वाशिष्टी नदीने धारण केले रौद्ररूप

कोकणातील चिपळूण तालुक्यातील वाशिष्टी नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाने कोकणामध्ये थैमान घातले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत.

पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय

पनवेल मध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते झाले जलमय. मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर देखील पाणी साचले. मुंबई-गोवा महामार्ग जलमय झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

वाहत्या पाण्यात चार महिन्यांचं बाळ गेलं वाहून 

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यातच एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई चालत होती. अचानक त्या काकाच्या हातून चार महिनाचे बाळ सटकलं आणि वाहत्या पाण्यात वाहून गेलं.

कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस

कल्याणमधील रामबाग, बेतुरगड पाडा, वालधुनी, कोळसेवाडी, आढवली- ढोकली, काकांचा ढाबा, चिंचपाडसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच काही दुकाने आणि घरातही पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठाकुर्ली मध्येरेल्वे ठप्प झाल्याने प्रवासी चालत करतायत प्रवास

ठाकुर्ली येथे मध्य रेल्वे ठप्प झाल्याने डोंबिवली आणि कल्याण मध्ये लोकल उभ्या आहेत. त्यामुळे प्रवासी चालत प्रवास करत आहे

रायगड जिल्ह्यातील पूरस्थिती व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

रायगड जिल्ह्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करुन त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण होणारी पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटना, त्यामुळे करावे लागणारे नागरिकांचे स्थलांतर लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची कार्यवाही तातडीने आणि शक्यतो दिवसाच पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

वशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; 

सध्या वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी १ फूट पाणी भरलेले आहे. सध्या पाणी वाढत आहे. नाईक पूलाची पातळी ५ मी या इशारा पातळीवर पुन्हा पोहचली आहे.

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली असल्यामुळे मौजे कांबा येथील मोरया नगर येथील चाळींमध्ये पाणी शिरले आहे. या ठिकाणी सद्यस्थितीला ९० कुटुंबे राहत असून ६० कुटुंबांचे स्थलांतर कांबा गावातील इतर रिकाम्या असलेल्या घरामध्ये तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले आहे

चिपळूणजवळील परशूराम घाटातील वाहतूक बंद 

चिपळूणजवळील परशूराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आला आहे.

अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरातील मुलाला रेस्क्यू करण्यात यश

अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरात एक मुलगा मंदिराच्या जवळ अडकला होता, सामाजिक कार्यकर्ते किरण यांनी फायरब्रिगेड बोलूंन त्याला रेस्क्यू करण्यात आले आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी 

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

डोंबिवली स्टेशन बाहेरील रस्त्यांवर साचले गुडघाभर पाणी  

डोंबिवली स्टेशन बाहेरील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. नालेसफाई योग्य रीतीने न झाल्यामुळे पुन्हा एकदा स्टेशन परिसर पाण्याखाली गेला आहे.

पोलादपूर तालुक्यात कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचं काम सुरू

सवाद माटवणं रस्त्यावर माटवणं फाट्याच्या पुढे रस्त्यावर 4 ते 5फूटपर्यंत पुराचे पाणी आलेले आहे, सवाद गावात पाणी शिरायला सुरुवात झालेले आहे कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. सूचना देण्यात आल्या असून विस्थापन सुरू आहे. नरवीर मदत पथक हे सवाद येथे पोहोचले असून योग्य त्या सूचना देण्यात आले आहेत. NDRF यांचे सहाय्याने RAFT तयार करून पुढे पाठवीत आले असून बचाव कार्य सुरू आहे.

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे सत्र न्यायालयात

भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे सत्र न्यायालयात हजर झाले आहेत. अटकपूर्व जामिनासाठी खडसे सत्र न्यायालयात दाखल झालेत. मात्र ED चे वकील ASG अनिल सिंग हे कोर्टात नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी आता १ ऑगस्ट रोजी होणार आहे.

उल्हासनगरमध्ये पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

उल्हासनगरमध्ये पाच ते सात ठिकाणी पावसाचे पाणी भरले असून उल्हासनगर आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान, अग्निशामक दलाचे जवान आणि इतर यंत्रणा प्रत्यक्ष घटनास्थळी असून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रायते ते दहागाव मार्गावरील उल्हास नदीवरील पुलावर पाणी

रायते ते दहागाव मार्गावरील उल्हास नदीवरील पुलावर पाणी गेले आहे. मुरबाड तालुक्यातील चिखले गावाला जाणाऱ्या काळू नदीवरील पुलावरून पाणी गेले आहे. मुरबाड येथिल मुरबाडी नदीवरील पुलावरूनही पाणी जात आहे. प्रत्येक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन व महसूल यंत्रणा कार्यरत आहेत.

शरद पवार यांनाही NDAच्या बैठकीला आणण्याचे प्रयत्न सुरू होते पण...

शरद पवार यांनाही NDA च्या बैठकीला आणण्याचे प्रयत्न सुरू होते, पण शरद पवार यांचा मात्र त्याला विरोध होता. काल दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी शरद पवार यांना बोलावलं होतं. 2 दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून कनव्हेन्स करत होते, पण पवार मात्र विरोधावर ठाम होते, अशी माहिती 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पाऊस आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे चाकरमान्यांना मात्र कार्यालयास जाण्यास उशीर झाला. उड्डाणपुलाचे काम, सोबतच सुरू असलेली विविध कामे, रस्त्यात ठिकठिकाणी खोदलेले खड्डे, यामुळे वाहतुक संथ गतीने पुढे जात होती.

चिपळूण परिसर वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा अजित पवारांनी घेतला आढावा

पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.

पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल

1)वसई:- 153 मी मी

2)जव्हार:- 30 मी मी

3) विक्रमगड:- 21.50 मी मी

4) मोखाडा:- 16.40 मी मी

5) वाडा :- 21 मी मी

6)डहाणू :- 42 मी मी

7) पालघर:- 83.8 मी मी

8) तलासरी :- 32.50 मी मी

एकूण पाऊस :- 400 मी मी

एकुण सरासरी :- 50 मी मी

पावसामुळे कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूनमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर

कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

कल्याण ते कर्जत दोन्ही बाजुंची रेल्वे वाहतूक बंद 

कल्याण ते कर्जत दोन्ही बाजुंची रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढला आहे. रुळावर पाणी साचल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

चिपळूण-कराड मार्ग वाहतूकीसाठी बंद

चिपळूण-कराड मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूर ते आसनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन मध्ये खड्ड्यामध्ये एक गाडी आदळून बंद पडली. त्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेंनवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; पॉईंट फेल झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पॉईंट फेल झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पनवेल ते बेलापुर दरम्यान लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी

रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. IMD ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.

साताऱ्यातील अंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्ण बंद

साताऱ्याच्या अंबेनळी घाटातील चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळली आहे. काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.