Marathi News Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Latest Marathi News
Latest Marathi Newssakal
Updated on

पीव्ही सिंधू डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल

भारताच्या पीव्ही सिंधूने डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

पुण्यात उद्या दोन्ही "दादा" पुन्हा एकत्र दिसणार

अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच दिसणार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दिसणार आहेत. दोन्ही "दादांच्या" उपस्थितीत  पुण्यात बैठक पार पडणार आहे.

नवी मुंबई मेट्रोचं लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई मेट्रोच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. ३० ऑक्टोबरला हे उद्घाटन होऊ शकतं, अशी शक्यता साम टीव्हीनं वर्तवली आहे.

राज ठाकरे पुण्यात दाखल

राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्यावर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत.

जयंत पाटील आमच्या बैठकांना उपस्थित होते- सुनील तटकरे

जयंत पाटील हे आमच्या बैठकांना उपस्थित होते, असा खळबळजनक दावा सुनील तटकरे यांनी केला होता.

इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतली ऋषी सुनक यांची भेट

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली आहे.

गोकूळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी भेट

दूध संस्थाच्या खात्यावर फरकाची 101 कोटी 34 लाख रुपये रक्कम जमा होणार आहे. गोकूळकडून दूध उत्पादकांना बोनस जाहीर करण्यात आला. बोनसची ही रक्कम दिवाळीपूर्वी जमा होणार आहे. याबद्दल चेअरमन अरुण डोंगळे यांची माहिती दिली. म्हशीच्या दूधाला सरासरी प्रतिलिटर 2 रुपये 80 पैसे तर गाईच्या दूधास सरासरी प्रतिलिटर 1 रुपये 80 पैसे फरक जाहीर करण्यात आला.

मोदींच्या हस्ते कौशल्य केंद्राच उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन कौशल्य केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींकडून हे उद्घाटन व्हर्चुअल पद्धतीने करावं लागलं.

बारामतीच्या कटफलमध्ये विमान कोसळलं

बारामतीच्या कफटलमध्ये शिकाऊ विमान कोसळलं आहे. लँडिंग करताना हे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. हे विमान रेडबर्ड कंपनीचं होतं.

गहूंजे स्टेडियम परिसरात वाहतूक ठप्प

गहूंजे स्टेडियम परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. भारत आणि बांग्लादेश या संघांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा एकदिवसीय सामना पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर खेळवला जात आहे. त्यामुळे लोकांनी या ठिकाणी गर्दी केली.

अर्चना निकम आणि प्रज्ञा कांबळे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी , ललित पाटील ड्रग्ज प्रकरण

अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीमध्ये संपूर्ण समाधान झाल्याशिवाय पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही अटक आरोपी ललित पाटील याच्याशी अटक केलेल्या महिला आरोपींचा संबंध असल्याचं केस डायरीत दिसून येत आहे. आरोपींनी ललित पाटील याला 25 लाख रुपयांची मदत केल्याचं रिमांड रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत निष्पन्न झालेल्या बाबींवरून आणखी तपास आवश्यक आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने या दोघींना ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे आणि 23 ऑक्टोबर ला पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

विधान परिषद अपात्रता प्रकरण, हिवाळी अधिवेशनानंतर सुनावणीची शक्यता

विधान परिषदेच्या आमदार अपात्रता प्रकरणी होणारी सुनावणी हिवाळी अधिवेशनानंतर घेतली जाऊ शकते.

रोहित पवारांना न्यायालयाचा दिलासा

बारामती ॲग्रोला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या नोटीस प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली असून गुरुवारी या प्रकरणात निकाल अपेक्षित आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांने केलेले सगळे आरोप बारामती ॲग्रोन फेटाळले असून विनाकारण किरकोळ कारणांचा बागुल बुवा केल्याचा आरोप रोहित पवारांच्या वकिलांनी केला आहे करण्यात आला आहे.

मास्क सक्ती बाबत मुंबई महानगर पालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई पालिकेने मास्क सक्तीचा कुठला ही निर्णय घेतला नाही. मास्क सक्तीची बातमी निर्धार असल्याची माहिती त्यांनी प्रसिध्दी पत्रक काढून दिली आहे. हवेची गुणवत्ता खराब झाली असली तरी महानगर पालिका राज्य सरकार सोबत समन्वय साधत उपाय योजना विषयी विचाराधीन असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली.

चिपळूणमध्ये कोसळलेल्या पुलाच्या पाहणीसाठी मनसे नेते घटनास्थळी दाखल

चिपळूणमध्ये कोसळलेल्या पुलाच्या पाहणी करण्यासाठी मनसेचे नेते दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी उड्डाणपूल कोसळला होता. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे पाहणी करत आहेत.

कोरेगाव भीमा प्रकरण: आयोगासमोर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साक्ष नोंदवणार

कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगासमोर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साक्ष नोंदवणार आहेत. प्रकाश आंबेडकरांनी सुनावणीची तारीख बदलून घेतली आहे. कोरेगाव भीमा आयोगासमोर उद्या सुनावणी होणार होती. मात्र, आज दुपारी प्रकाश आंबेडकर आयोगासमोर आपली साक्ष नोंदवणार आहेत.

सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन शेजारी आगीची घटना

सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन शेजारी आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचं काम सुरू आहे. रेल्वे ट्रकच्या खाली आग लागल्याची घटना घडली आहे.

ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई

ड्रग्स प्रकरणातील ललीत पाटीलला मदत करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोन्ही महिलांकडे ललित पाटीलने मिळवलेली बेनामी संपत्ती असण्याची शक्यता आहे.

पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाच्यावतीनं पहाटेपासून छापेमारी सुरू

पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्स वर आयकर विभागाच्यावतीन पहाटेपासून छापेमारी सुरू आहे. पत्र्या मारुती चौक,हडपसर, बाणेर परिसरात आयकर विभागाची छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या ४० वाहनातून आलेले आयकर अधिकारी छापेमारी करत आहेत. सोन्याच्या खरेदी विक्री सह इतर व्यवहाराबाबत तपासणी केली जात आहे.

आज तेराव्या दिवशीही इस्रायल आणि हमास युद्ध सुरूच, मनोज जरांगे पाटील आज माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची भेट घेणार आहेत, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com