Marathi News Update : इर्शाळवाडीतील दुर्घटना ते मणिपूरमधील हिंसाचार; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update : इर्शाळवाडीतील दुर्घटना ते मणिपूरमधील हिंसाचार; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Updated on

घाटकोपर येथे शंभर लोकांना केलं स्थलांतरित

मुंबईतल्या घाटकोपर येथे डोंगरावरील माती आणि झाड कोसळल्याने 100 लोकांना स्थलांतरित केल्याची माहिती आहे.

मणिपूर हिंसाचारवर संसदेत होणार चर्चा

मणिपूर हिंसाचारावर उद्या लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा होऊ शकते. विरोधकांनी नियम १९३, १७६ आणि २६७ अंतर्गत नोटीस दिलेली असून सरकारने यावर चर्चा करण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे.

निवडणूक आयोगाने गुवाहाटीमध्ये घेतली बैठक

आसामसाठी सीमांकन प्रस्तावाच्या मसुद्यावर भारतीय निवडणूक आयोगाने गुवाहाटी येथे राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली.

पालघरमध्ये जोरदार पाऊस

पालघरमध्ये जोरदार पाऊस सुरु असून सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

इर्शाळवाडीमधील मदतकार्य थांबवलं

मुसळधार पाऊस सुरु झाल्यमुळे इर्शाळवाडीमधील मदतकार्य थांबवण्यात आलेलं आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांना अखेर जामीन

 महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह यांना गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्याला जामीन देताना न्यायालयाला माहिती दिल्याशिवाय परदेश दौऱ्यावर जाता येणार नाही, अशी अट घातली आहे.

मुंबई मनपातर्फे इर्शाळवाडी गावासाठी पोकलेनसह इतर यंत्राची व्यवस्था

इर्शाळवाडी येथे वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून संयंत्र पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार एकूण तीन बॉब कॅट संयंत्र घन कचरा व्यवस्थापन विभागाद्वारे रवाना झाले आहेत. माहीम रेतीबंदर, मुलुंड आणि जुहू येथून प्रत्येकी एक याप्रमाणे ही तीन वाहने रवाना झाली आहेत.

तसेच, पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत वांद्रे येथून पोकलेन संयंत्र रवाना करण्यात आले आहे.

इर्शाळवाडी येथील मृतांची संख्या 12 वर; बचावकार्य अद्याप सुरू

इर्शाळवाडी येथील मृतांची संख्या 12 वर पोहचली आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. आताही 100 जण मातीखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

2 तासानंतरही 'त्या' चार महिन्यांच्या चिमुकलीचा शोध लागला नाही

कल्याण : 22 तासानंतरही 'त्या' चार महिन्यांच्या चिमुकलीचा शोध लागला नाही. एनडीआरएफ टीम कल्याणमध्ये दाखल झाली आहे. एनडीआरएफ टीम आणि कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागाचे पथकाचे ठाकुर्ली खाडी परिसरात शोध कार्य सुरू आहे. बोटीच्या सहाय्यने शोध सुरु आहे.

इर्शाळवाडीत आतापर्यंत ९८ जणांना वाचवण्यात यश, अंबादास दानवे यांची माहिती

इर्शाळवाडीत आतापर्यंत ९८ जणांना वाचण्यात यश आले आहे. अजून बचावकार्य सुरू आहे

लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनात मणिपूर हिंसाचार, दिल्ली अध्यादेश आणि ओडिशा रेल्वे अपघातावर विरोधकांनी गदारोळ केला. लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे स्पष्ट केले. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशीही चर्चा केली.

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक; BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक करण्यात आली आहे. BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.

रायगड इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू

रायगड इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 21 जण जखमी आहेत. या गावातील लोकसंख्या 228 आहे. 48 कुटुंबांचा ही वाडी होती. 57 लोकांना आतापर्यंत बाहेर काढलं आहे. त्यातील 60 ते 70 लोक गावाच्या बाहेर होते

इर्शाळवाडी दुर्घटनेची पाहणी करायला आदित्य ठाकरे खालापूरला रवाना

खालापूर इर्शाळवाडी दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू दुर्घटनास्थळी रवाना झाले आहेत.

इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांना जेजे, केईएम हॉस्पिटलमध्ये मदत केली जाईल- हसन मुश्रीफ

माळीण सारखी घटना घडली आहे. अनेक लोक दबले गेले आहेत. लोकांना जेजे, केईएम हॉस्पिटलमध्ये मदत केली जाईल. तिथे मोठं रुग्णालय बांधण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग नाही तर आरोग्य खात्याकडून बांधण्यासंदर्भात सूचना करू असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

इर्शाळवाडी येथे अजून मुसळधार पाऊस, बचाव कार्यात अडथळे- देवेंद्र फडणवीस

इर्शाळवाडी येथे अजून मुसळधार पाऊस, बचाव कार्यात अडथळे येत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. २१ जणांवर मुंबईत उपचार सुरू आहेत असल्याची माहीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

बचाव कार्याला प्राधान्य, दोन हेलिकॉप्टर तयार, पण खराब हवामानामुळं टेकऑफ अशक्य; CM शिंदेंची माहिती

हवाई मार्गाने बचावकार्य करण्याचा पर्याय विचारधीन आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर आतापर्यंत 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्वतः मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना झालेत. सध्या मुख्यमंत्री घटनास्थळी असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधून सर्व परिस्थितीची माहिती दिली.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

इर्शाळवाडीतील दुर्घटनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली माहिती 

"महाराष्ट्रातील रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. एनडीआरएफच्या 4 पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि स्थानिक प्रशासनासोबत बचावकार्य सुरू आहे. तिथून लोकांना बाहेर काढणे आणि जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देणे हे आमचे प्राधान्य आहे", असं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

इर्शाळवाडीतील मालब्याखाली अडकलेल्या 75 जणांना बाहेर काढण्यात यश

प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

इर्शाळवाडीतील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार मुख्यमंत्र्यांची माहीती

खालापूर येथील दरड दुर्घटनेत दगावलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत केली जाणार आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तसेच मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

रायगडातील इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेतील नियंत्रण कक्ष

ग्रामस्थांना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संपर्क साधण्यासाठी हा नंबर 810 819 5554 देण्यात आला आहे.

इर्शाळवाडीतील मलब्याखाली अडकलेल्या २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश

जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 100हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू अॉपरेशन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

इर्शालगडावर बचाव कार्य करताना अनेक अडचणी येत आहेत. या ठिकाणी जेसीबी, पोकलेन किंवा अन्य कोणतीही यंत्रणा या ठिकाणी पोहचू शकत नसल्याने NDRFचे जवान आणि स्थानिक खोरे, कुदळ यांच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

बचावकार्यासाठी जाताना NDRF दलाच्या जवानाचा दम लागल्यानं मृत्यू

घटनास्थळी जात असतानाच एका NDRF दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इर्शालगडावर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. दोन किलोमीटरचा हा ट्रेक आहे. डोंगर चढत जात असताना NDRF दलाच्या एका जवानाला धाप लागली. त्यानंतर वाडीवरील दृश्य पाहून एका NDRF जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. इतर जवानांनी या जवानाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी या जवानाला मृत घोषित केले.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीमध्ये दाखल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीमध्ये दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (इरसालगड) याठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यत 22 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने चार जणांचा मृत्यू; 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (इरसालगड) याठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून, पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद केले आहेत, अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.