Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Manoj Jarange
Manoj Jarangeesakal

रामदास आठवलेंची शिर्डी मतदारसंघातून निवडणुकीची तयारी!

महाराष्ट्रात आम्हाला दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. दोन जागांवर निवडून आल्यास रिपब्लिक पार्टीला महत्त्व येईल. मला जर शिर्डीमधून लढता आले तर मी त्याचा विचार करेन, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.

'राई का पहाड': महुआ मोईत्रा प्रकरणावर काँग्रेसची प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केलेत. यावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली. याप्रकरणाला 'राई का पहाड' केलं जात आहे. अदानी यांच्यावर टीका केल्यानेच भाजप प्रकरण गाजवत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याचा खासदाराला हक्क आहे. भाजपच्या हातात सर्व यंत्रणा आहेत. त्यांनी याचा तपास करावा, असं ते म्हणाले.

ललित पाटील प्रकरणात गोलूला अटक, कारखाना उभारणीला केली होती मदत

ललित पाटील प्रकरणातील आरोपी रेहान शेख अन्सारी उर्फ "गोलू" हा आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. नाशिकमध्ये एमडी ड्रग्सचा कारखान्याचा सेटअप उभारण्यासाठी अन्सारीने ललित पाटिलला मदत केली होती. अन्सारी ड्रग्सची मोठ्या प्रमाणात विक्री करत होता अशी माहिती आहे.

विरोध करणारे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला पहिलं येतील- मनोज जरांगे पाटील

जरांगे पाटलांच्या भाषणातील मुद्दे

- कुणबी असल्याचे पाच हजार पुरावे सापडलेत

- आमच्या पूर्वजांनी अनेकांना मोठं केलं.

-आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही

- समाजाची कधीही गद्दारी करणार नाही

-समिती स्थापन केली आहे. ३ ते साडेतीन कोटी खर्च समितीने केल्याचं कळतंय

- शांततेत आंदोलन करायचं. गाव पिंजून काढायचं

- सामान्य मराठ्याच्या तरुणावर गुन्हे नोंद व्हायला नको

-मराठा समाजाने कधीही जात बहितली नाही

- उद्यापासून घराघरात जाऊन आरक्षण कशासाठी हे समजावून सांगा

-२४ तारखेपर्यंत काही बोलणार नाही, त्यानंतर सरकारला आंदोलन पेलणार नाही

- ही संधी पुन्हा येणार नाही

-कुणबीचा सुधारित शब्द शेती आहे. त्यामुळे यांना कुणबी का चालत नाही. प्रमाणपत्राला विरोध करणारेच ते घ्यायला सर्वात पुढे असतील. आता कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. भविष्य आणि अस्तित्वासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे. लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भातील समितीने मागितला दोन महिन्यांचा वेळ

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केलेल्या संदिप शिंदे समितीने आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. काही पुरावे गोळा करण्यासाठी हा वेळ मागण्यात आल्याचं समजतं

रविंद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलं

मुंबई- जोगेश्वरी भूखंड प्रकरणी रविंद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने समज बजावला आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंनी दिशा सालियान प्रकरणी खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं- निलेश ओझा

आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान प्ररकणी खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं, असा दावा याचिकाकर्ते राशिद खान यांचे वकील निलेश ओझा यांनी केला आहे. दिशा सालियान प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.

ड्रग्स प्रकरणात योग्य चौकशी होईल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ड्रग्स प्रकरणात योग्य चौकशी होईल. आमचं सरकार पारदर्शकपणे काम करत आहे. नाशिकमध्ये काढलेला मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कंत्राटी पद्धत रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आता यापुढे योग्यपणे भरती होईल. मागच्या सरकारचा निर्णय रद्द करण्यात आलायं, असं ते म्हणाले.

6 याचिकांमध्ये 34 याचिका एकत्र करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, सुनावणी संपली

आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी आता २६ ऑक्टोबर होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटालाही कोर्टात दिलेले कागदपत्रं सादर करायला सांगितले आहेत. 6 याचिकांमध्ये 34 याचिका एकत्र करण्याचा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला आहे.

शिंदेंच्या आमदारांना २५ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्यासाठी वेळ देण्यात आला

शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांचे प्रतिग्नापत्र ग्राह धरण्यात यावे अशी मागणी केलेली होती. ती मागणी अध्यक्षांनी मान्य केलीय. शिंदेंच्या आमदारांना २५ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

ड्रग्ज प्रकरणात दोन आरोपींना २२ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी

ड्रग्ज प्रकरणात भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे न्यायालयाने दोन आरोपींना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ललित पाटील ससून रुग्णालयात अनेकदा प्रज्ञा कांबळेला भेटला, पुणे पोलिसांचा कोर्टात मोठा दावा

पुणे- प्रज्ञा कांबळे अनेक वेळा ससून रुग्णालयात येऊन गेली असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे. ललित रुग्णालयात असताना हे दोघे अनेक वेळा हॉटेलात भेटल्याची पुणे पोलिसांची माहिती. ड्रग्स तस्करीतून मिळालेल्या पैशातून प्रज्ञा कांबळे हिने अनेक मोबाईल फोन आणि गाड्या खरेदी केल्या. काल पहाटे पुणे पोलिसांनी प्रज्ञा कांबळे हिला नाशिक मधून केली अटक केली होती.

थोड्याच वेळात आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात

आमदार अपात्रताबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत एकत्र सुनावणीबाबत राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत.

२५ मराठी चित्रपटांना साडे ८ कोटी रुपयांचं अनुदान

मुंबई- २५ मराठी चित्रपटांना साडे ८ कोटी रुपयांचं अनुदान सरकारकडून जाहीर झालं आहे. काही चित्रपटांना ३९ लाख तर काही चित्रपटांना २९ लाखांचं अनुदान मिळाल्याची माहिती आहे.

मनोज जरांगेंच्या सेभेदरम्यान गोंधळ, आंदोलकाचा भाषण करण्याचा प्रयत्न

मला अजुनही आशा, सरकार २४ तारीख उजडू देणार नाही- जरांगे पाटील

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना जरांगे यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी मला अजुनही आशा आहे की सरकार २४ तारीख उजडू देणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगेंची राजगुरू नगर येथे जाहीर सभा; सभास्थळी जल्लोषात स्वागत

पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमिवर मनोज जरांगे यांच सभास्थळी जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

पुण्यात राज ठाकरेंच्या स्वागतासाठी उडवलेल्या फटक्यांमुळे झाडाला आग

पुणे : राज ठाकरे मेळाव्यासाठी पुण्यात आले असताना त्यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आले. यावेळी या फटाक्यांमुळे एका झाडाला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आणली असून यामध्ये कुठलीही हानी झाली नाही.

राहुल गांधींविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला एक लाखांचा दंड

नवी दिल्ली - राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा एकदा बहाल करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला सर्वोच्च न्यायालयाचा एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

गुजरात न्यायालयाने मोदी आडनावावर केलेल्या टिकेसंदर्भात राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. दोन वर्षे शिक्षा झालेल्या राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभेने रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालायने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल यांची खासदारकी पुन्हा एकदा बहाल करण्यात आली आहे.

पहिली कंत्राटी भरती काँग्रेसने केली; फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

राज्यात कंत्राटी भरतीच्या संदर्भात मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जे याचे दोषी आहेत तेच जास्त आवाज करत आहेत. म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समाजापुढं आलं पाहिजे. यांची थोबाडं उघडी पडली पाहिजेत या दृष्टीने काही गोष्टी मी आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतोय. राज्यात पहिली कंत्राट भरतीचा पहिला निर्णय १३ मार्च २००३ रोजी झाला तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये हा निर्णय झाला, अशी माहिती पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असताना, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीला भाजप आमदारांची दांडी

पुणे : पुण्यात पालकमंत्र्यांच्या महत्वपूर्ण पाण्याच्या महत्वपूर्ण बैठकीला भाजप आमदाराची दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समिती आढाव बैठक पार पडली. मात्र कालवा समिती बैठकीला भाजपचे एकच आमदार उपस्थितीत होते.

या बैठकीला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर तेवढे उपस्थितीत होते. पुण्यात आठ मतदारसंघापैकी दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तर एक काँग्रेसचा आमदार आहेत. तर भाजपच्या पाच आमदार पैकी एकच आमदार बैठकीला उपस्थितीत होते.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर आला समोर 

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर आला आहे. शिवसेनेचे दोन्ही गट पक्ष फूटीपासून वेगवेगळे मेळावे घेतात. दरम्यान शिंदे गटाने तयारी सुरू केली आसून त्यांची टीझर समोर आला आहे.

आदित्य ठाकरेंची चौकशी करा; याचिकेवर आज सुनावणी

दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर काही आरोप केले जात आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या सीबीआय चौकशीची मागणी फौजदारी स्वरूपाच्या जनहित याचिकेद्वारे केली जात आहे. याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे, यादरम्यान आपली बाजूही ऐकण्यात यावी यासाठी हायकोर्टात आदित्य ठाकरे यांच्याकडून कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मनोज जरांगे कार्यकर्त्यांनासह किल्ले शिवनेरी वर दाखल

पुणे: मनोज जरांगे पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांनासह जुन्नर मध्ये किल्ले शिवनेरी वर दाखल झाले आहेत. येथे मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर खेड राजगुरूनगर मध्ये होणाऱ्या सभेसाठी ते रवाना होतील.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com