Marathi News Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update
Marathi News Update
Updated on

अभिनेता सलमान खान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र घेतलं बाप्पांचं दर्शन

बॉलिवुड अभिनेता सलमान खान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या राहुल कनाल यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत ऐतिहासिक बहुमताने मंजूर

केंद्र सरकारकडून लोकसभेत सादर करण्यात आलेलं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. महिला आरक्षण विधेयकाला ४५४ मत मिळाली.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत ऐतिहासिक बहुमताने मंजूर

मुंबईत विसर्जनाची आकडेवारी , कृत्रीम तलावांमधील विसर्जानात वाढ

मुंबई शहर व उपनगरांतील सार्वजनिक ३० व घरगुती ६९३० असे एकूण ६९६० गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. यापैकी कृत्रिम तलावांत सार्वजनिक १४ व घरगुती २८१९, असे एकूण २८३३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ही आकडेवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची आहे.

अंबानींच्या घरी उद्धव ठाकरे, बापांचं घेतलं दर्शन

शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी जाऊन गणपती बापांचं दर्शन घेतलं आहे.

राहुल गांधींच्या 'डरो मत' या शब्दांवर सभापतींचा आक्षेप

राहुल गांधी यांनी महिला आऱक्षणाच्या विधेयकावर चर्चा करताना ओबीसींचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी जेव्हा सत्ताधारी खासदारांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राहुल गांधी त्यांना 'डरो मत' असे म्हणाले. यावर सभापतींनी आक्षेप घेतला.

अमेरिकेच्या राजदूताचा भारत-कॅनडाला इशारा, जे दोषी असतील त्यांना...

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी म्हणाले की, 'दोन्ही पारंपारिक मित्रांनी चौकशीमध्ये सहकार्य करावं. जे दोषी असतील त्यांना यासाठी जबाबदार धरलं जाईल.'

कांदा लिलाव बंद पाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई

काही दिवसांपुर्वी कांद्याचा लिलाव काही व्यापाऱ्यांनी बंद पाडला होता. यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

राहुल गांधी आज लोकसभेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडणार

नुकतचं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलय. या विधेयकाच्या लागू होण्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद बघायला मिळतोय. अशातच, काँग्रेसचे नेते लोकसभेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी, बाप्पांचं घेतलं दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आहे.

एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

गोपीचंद पडळकरांना जोडे मारणाऱ्याला १ लाखांचं बक्षिस; नागपूरमध्ये कार्यकर्ते आक्रमक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. "आमदार गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोर असून त्यांना जोडे मारणाऱ्यास एक लाखंचे बक्षीस देऊ.", आशी घोषणा राष्ट्रवादीचे नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे.

पुणे-बंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू 

सकल धनगर समाजाच्यावतीनं आज पुणे-बंगलोर महामार्ग पारगाव-खंडाळा इथं रोखण्यात आला होता. यावेळी धनगर समाजानं मोठी घोषणाबाजी केली, तर महामार्गावरच गजीनृत्य सादर केले. दरम्यान, महामार्ग अडवल्यानंतरही गाड्या पुण्याकडे सुरु झाल्यानंतर आंदोलकांनी महामार्गावर धिंगाणा घातला. यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. डीवायएसपी यांनी यात लक्ष घातल्यामुळे आंदोलक शांत झाले आणि यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरु केली.

एसटी प्रवर्गामध्ये समावेशासाठी धनगर समाज आक्रमक

धनगर समाजाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाने अनेक ठिकाणी माहामार्ग रोखले आहेत.

खांबाटकी घाटामध्ये धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेशासाठी अडवला महामार्ग

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी मागच्या कित्येक वर्षांपासून धनगर समाज आंदोलन करीत आहे. १ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाचा वाद पेटल्यानंतर राज्यात मराठा समाजाने आंदोलनाचं हत्यार उपसलं. त्यानंतर ओबीसी समाजानेदेखील अनेक ठिकाणी उपोषणं आणि मोर्चे काढले. त्याचबरोबर खांबाटकी घाटामध्ये धनगर समाजाने महामार्ग अडवला आहे.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनी महिला आरक्षण विधेयकाच केलं स्वागत 

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी महिला आरक्षण विधेयकाच स्वागत केलं आहे. आमच्या पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मी या विधेयकाचे स्वागत करते असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

'हे विधेयक आणलं नसतं तर महिला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेमध्ये अडकून राहिल्या असत्या. 27 वर्षात या निर्णययावर धूळ बसली होती ती घालवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. INDIA आघाडी म्हणजे एक दलदल आहे पण त्याच दलदलीमध्ये कमळ फुलत असतं, असं खासदार गवळी यांनी म्हटलं आहे.

भिवंडीजवळ सोनाळे गावाजवळ LPG गॅस टँकरला आग; वाहतूक मंदावली

भिवंडीजवळ सोनाळे गावाजवळ एलपीजी गॅस टँकरने पेट घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीकाठी पवित्र स्नानासाठी महिलांची गर्दी

ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीकाठी रामतीर्थ (रामकुंड) येथे पवित्र स्नानासाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे.

'मी स्वतः आरक्षण विधेयक संसदेत आणण्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला पण..' - खासदार कनिमोझी

DMK खासदार कनिमोझी म्हणतात, "मी स्वतः आरक्षण विधेयक संसदेत आणण्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. याआधी त्यावर काहीच चर्चा झाली नाही. मग आता मला जाणून घ्यायचे आहे आता काय झाले त्यामुळे एकमत झाले आणि हे विधेयक समोर आणले. आम्हाला न सांगता गुप्तता पाळून हे विधेयक आणण्यात आले. हे सत्र कशासाठी बोलावले होते ते आम्हाला माहित नव्हते असंही DMK खासदार कनिमोझी म्हणाल्या आहेत.

'ओबीसींना आरक्षण द्यायचं होतं, तर महापालिका निवडणुकीत का दिलं नाही?' निशिकांत दुबे यांचं सोनिया गांधींना उत्तर

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक 2023 वर चर्चेदरम्यान, सोनिया गांधी यांनी जात जनगणना आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देते मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार हे सरकारने सांगावे. या विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे. सोनिया गांधीच्या या वक्तव्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हल्लाबोल केला आहे.

निशिकांत दुबे म्हणाले की, ओबीसींना आरक्षण द्यायचे होते तर नागरी व पंचायत निवडणुकीत का दिले गेले नाही. हा देश राज्यघटनेने चालतो, असंही ते म्हणालेत.

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू; काँग्रेसने दिला पाठिंबा

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. या विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. सोनिया गांधी या विधेयकाबाबत बोलताना म्हणाल्या कि, 'महिला आरक्षण हे माझे पती राजीव गांधी यांचे स्वप्न होते. नंतर ते पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारने मंजूर केले. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न आतापर्यंत अर्धेच पूर्ण झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होणार आहे.'

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेत सोनिया गांधी यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.

वाहनांच्या मराठी नंबर प्लेट वरून आता होणार नाही कारवाई

वाहतूक पोलीस वाहनाच्या मराठी नंबर प्लेट दिसली की थांबवून कारवाई करतात. मात्र, अशी नंबर प्लेट अधिकृत असून मराठी देवनागरी भाषेत लिहिण्याची परवानगी आहे. मात्र, वाहनांवर मराठी भाषेचा वापर होत नाही. वाहतूक कर्मचारी सुद्धा अशी नंबर प्लेट दिसल्यास गाडी थांबवितात. मात्र, या कारणासाठी आता कारवाई होणार नाही, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर 35,000 महिलांनी केलं गणपती अथर्वशीर्षाचे पठण 

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर आज सकाळी 35,000 हून अधिक महिलांनी एकत्र येऊन गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले. दरवर्षी अथर्वशीर्षाचे पठणाचे आयोजन केले जाते. अथर्वशीर्षाचे पठण करण्याचे हे ३६ वे वर्ष आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; आज कोणती विधेयके मांडली जाणार याकडे लक्ष

आज विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवस आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. तर, हे विधेयक राज्यसभेत आधीच मंजूर करण्यात आलं आहे. तर आज आणखी कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज राज्यभर दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार. महिला आरक्षणाचा मुद्दा, पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.