सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर ७ दिवसांच्या आता निर्णय घ्यायला सांगितला होता. त्यानंतर आमदारांच्या अपात्रता प्रकरणाला वेग आला. अशातच, देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट राहुल नार्वेकरांनी घेतली. या भेटीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याविषयी माहिती मिळू शकली नाही. मात्र, १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी संवाद झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एका कॅनेडियन पत्रकाराने गौप्यस्फोट केलाय की, कॅनेडाच्या राजकारणात चीनचा हस्तक्षेप झाकण्यासाठी भारताला बदनाम केलं जातय.
कॅनडा आणि भारताच्या परराष्ट्रीय संबंधांमध्ये कटुता आली . आता भारताने कॅनडाला इशारा दिला आहे की, दहशतवादाचे आरोप असलेल्यांवर कारवाई करुन दाखवा.
केंद्रीय मंत्री किशन रेड्डी म्हणाले की,'नवी संसद महिलांना समर्पित करावी. ही एक ऐतिहासिक वास्तु आहे. '
केंद्रीय मंत्री आश्विनी कुमार चौबे म्हणाले की, "महिला आऱक्षण विधेयक २७ वर्षांपासून रखडलं होतं, मोदींनी या देशाच्या महिलांसाठी काय केलंय हे देश लक्षात ठेवल."
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेतला.
धनगर आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "धनगर आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल."
बॉलिवुडचा किंग खान लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला आहे. यावेळी त्याचा मुलगा अब्राम देखील सोबत आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारकडून धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी मागणी केली की धनगर समाजामध्ये समावेश करावा.
कॅनडा आणि भारत देशातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच, भारताच्या व्हिसा सेवा कॅनडामध्ये बंद करण्यात आल्या आहेत.
नाशिक : कांदा व्यापाऱ्यांच्या बहिष्काराच्या अनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. यावेळी काही मागण्या केंद्रीय स्तरावरील तर काही धोरणात्मक स्वरूपाच्या असल्याने पुन्हा चर्चा होईल असे दादा भुसे यांनी सांगितले. तसेच या विषयावर विपणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे बैठक घेण्याचे ठरले आहे.
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी नगरच्या चौंडी येथे गेल्या १६ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. याठिकाणी आज आणखी एका आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्याला हलवण्यात आलेलं आहे. आज यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली आहे. मात्र आण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांनी उपोषण सुरूच ठेवलं आहे.
डेक्कन-ओडीसी रेल्वे कोरोना काळात बंद करण्यात आली होती, हा रेल्वे आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
चित्रपट क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री तमन्ना भाटिया ही आज दिल्लीतील संसदेत दाखल झाली, तिचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. त्याचे कामकाज पाहण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना संसदेत निमंत्रीत करण्यात येत आहे
लोकसभेत गुरूवारी महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सर्वांचे आभार मानले. कालचा महिला नारीशक्तीचा निर्णय देशाच्या मातृशक्तीचा मिजाज बदलेल. ही देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणारी गोष्ट असून यासाठी आपण सर्वांनी चर्चा केली, समर्थन दिलं त्याबद्दल मी सदनाचा नेता म्हणून तुमचे आभार मानण्यासाठी उभा राहिलो आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील आनंद विहार ISBT येथे रेल्वे पोर्टर्सची भेट घेतली. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी पोर्टर्सचा ड्रेस आणि बिल्ला देखील परिधान केला.
काल लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज (२१ सप्टेंबर) राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये दाखल झाल्या आहेत.
राज्यात आणि देशात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून मुंबईतील लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी भाविकांचा ओघ आजही सुरूच आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मध्य प्रदेशात शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण होणार आहे. आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थितीत असणार आहेत.
मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात पांढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण उद्या काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुलनाथ यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला शिवसेना (UBT) नेते, आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.