अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याची पाहिला मिळत आहे.
अदानी समूहातील एकूण कंपन्यांचे मार्केट कॅप 9800 कोटी डॉलरची घसरले आहे.
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून बहिणीला प्रपोज करून लग्नासाठी तगादा लावत असल्याचा राग मनात धरून भावाने केली तरुणाची हत्या.
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा.
पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचलं असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा केल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण हे असून दोन वर्षांपासून ट्रस्टच्या सरचिटणीसपदी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आहेत तर उत्सव प्रमुख प्रमुख अक्षय गोडसे हे आहे.
सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर ठाकरे गटाचे वकील येत्या मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी भूमिका मांडणार आहे.
सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा 3 दिवस शक्यता होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाचा युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे.
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीकडे बहुमत नव्हतं
महाविकास आघाडीला अपक्षांचाही पाठिंबा आहे
कोर्टात बहुमताची आकडेमोड सुरू
पक्षाध्यक्ष ठाकरे असताना शिंदे यांना भेटीची वेळ कशी दिली?
कायदेशीर सरकार राज्यपालांच्या निर्णयामुळे पडलं
सरकार स्थापनेसाठी शिंदे भाजप राज्यपालांकडे गेले
राज्यपालांनी बंडखोरांना वैधता दिली
राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं
निर्णय अध्यक्षांनी घ्यावा की नाही, हे पाहण्यात अर्थ नाही
याच कोर्टाने आपत्रतेचा निर्णय घ्यावा
राज्यपालांच्या निर्णयाची समीक्षा व्हावी
राज्यपाल कोणतीही गोष्ट गृहीत धरू शकत नाहीत
राज्यपाल सरकार पडण्यास मदत करू शकत नाहीत.
राज्यपालांनी आमदारांची शरणागती घ्यायला हवी होती का
अपात्रतेबाबत कल्पना असताना बहुमत चाचणीचे आदेश योग्य नाही का?
अशा परिस्थितीत बहुमत चाचणी योग्य नव्हती का?
आपत्रतेचा मुद्दा लक्षात घेतला तर बहुमताचा आकडा घटेल
राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं - सिब्बल
याच कोर्टाने आपत्रतेचा निर्णय घ्यावा - सिब्बल
राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरवात झाली आहे. सुरवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत.
MPSC विद्यार्थी अन् मुख्यमंत्र्यांची भेट अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू राहणार आहे. दोन दिवस ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर आज शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.