Latest Marathi News : राज्यासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा प्रदान

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांना दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.

राहुल गांधींचा लातूरमध्ये मुक्काम

राहुल गांधी लातूरमध्ये दाखल झाले असून अमित देशमुख यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरु आहे. त्यांचा आज लातूरमध्येच मुक्काम असणार आहे.

रेल्वे वंदे भारत प्रवाशांना 'फ्री'मध्ये देणार पाण्याची बाटली 

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय वाचवण्यासाठी, रेल्वेने सर्व वंदे भारत ट्रेनमध्ये प्रत्येक प्रवाशाला ५०० मिलीची एक रेल नीर पॅकबंद पेयजल (PDW) बाटली दिली जाईल असा निर्णय घेतला आहे. तसेच मागणीनुसार कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता ५०० मिली ची दुसरी रेल नीर PDW बाटली प्रवाशांना दिली जाईल.

दक्षिण मुंबई चा तिढा उदया सुटणार?

दक्षिण मुंबईच्या तिढ्या संदर्भात भाजपचे केंद्रीय नेतृत्व हस्तक्षेप करणार असल्याने दक्षिण मुंबईच्या तिढ्या संदर्भात लोकसभा भाजप प्रभारी दिनेश शर्मा उदया सलग पाच तास बैठक घेणार आहेत. शिवडीत उदया सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत बैठक होणार असून भाजपचे दोन्हीही इच्छुक उमेदवार मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राहूल नार्वेकर आणि प्रमुख पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत

Rahul Gandhi Solapur Sabha : मोदींंनी उद्योगपतींचं १६ हजार कोटींचं कर्ज माफ केलं - राहुल गांधी

सोलापूर : 16 लाख करोड नरेंद्र मोदींनी 22 ते 25 लोकांना (त्यांच्या मित्रांना) दिला आहे. मोदींंनी उद्योगपतींचं १६ हजार कोटींचं कर्जही माफ केलं, असा आरोप राहुल गांधींनी सोलापुरातील सभेत केला. काॅंग्रस सरकार गोरगरीबांसाठी महालक्ष्मी योजना आणणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Vinod Patil : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटलांची माघार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा दिलेल्या विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलीये. त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली. लोकसभा निवडणूक न लढवता तटस्थ राहण्याची भूमिका विनोद पाटील यांनी घेतली आहे.  

CP Joshi : उदयपूरमध्ये भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

देशात पुन्हा PM मोदीजींचं सरकार आलं, तर येणाऱ्या काळात बाबरचा बच्चा-बच्चा जय श्रीराम बोलेलं. उदयपूरमध्ये एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना भाजपचे नेते सीपी जोशी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे वादाची शक्यता आहे.

Amit Shah Amravati Sabha : नवनीत राणांना मत म्हणजे थेट पंतप्रधान मोदींना मत - अमित शहा

Amit Shah Amravati Sabha : नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत अमित शहा यांनी 'जय श्रीराम'चा नारा दिला. राणा यांना मत म्हणजे थेट पंतप्रधान मोदींना मत आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्राणप्रतिष्ठापणेला निमंत्रण दिलं, पण ते आले नाहीत. राहुल गांधींना देखील दिलं होतं, पण तेही आले नाहीत. तसेच राहुल गांधींनी सत्तेची स्वप्न पाहू नये, अशीही त्यांनी टीका केली.

CM Eknath Shinde : अहंकारी सरकारने राणा यांना जेलमध्ये टाकलेलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तेव्हाच्या (ठाकरे सरकार) अहंकारी सरकारने राणा यांना जेलमध्ये टाकलेलं, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. शहांच्या निर्णयामुळे काश्मीर शांत राहिलं, असंही ते म्हणाले.

Nitin Gadkari : यवतमाळमधील पुसदच्या प्रचारसभेत गडकरींना आली भोवळ, आता प्रकृती स्थिर

यवतमाळमधील पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ आली आहे, त्यामुळे काही काळ प्रचार सभा थांबवण्यात आली आहे. गडकरींना उष्णतेचा त्रास झाल्याची माहिती आहे.

Amravati BJP Sabha : जितकं माझं नागपूरवर प्रेम आहे, तितकंच अमरावतीवर आहे - देवेंद्र फडणवीस

आजची सभा ही सर्वात मोठी सभा आहे. जितकं माझं नागपूरवर प्रेम आहे, तितकंच माझं अमरावतीवर आहे, असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी सभेत व्यक्त केलं. नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

EVM-VVPAT Judgement Reserved: सर्वोच्च न्यायालयाने VVPAT पडताळणीबाबतचा निर्णय राखून ठेवला

निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक स्पष्टीकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज 100 टक्के EVM-VVPAT पडताळणीबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने EVM-VVPAT ची 100 टक्के पडताळणी करण्याच्या याचिकेवर सुनावणी करत निवडणूक आयोगाकडून काही स्पष्टीकरण मागितले आणि त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली.

लग्नात अन्नातून विषबाधा 70 जण रुग्णालयात भरती

उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर मध्ये एका लग्न समारंभात अन्नातून विषबाधा झाली. त्यामुळे 70 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई

पत्राचाळ प्रकरणी ईडीने नुकतीच 73 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात एकूण 116 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

नोटबंदी, बेरोजगारीमुळे देशवासियांना त्रास झाला: राहुल गांधी

अमरावती लोकसभेचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, नोटबंदी आणि बेरोजगारीमुळे देशवासियांना खूप त्रास झाला आहे.

भाजप, आरएसएस लोकशाही संपवण्याच्या प्रयत्नात: राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरावतीमधील प्रचार सभेत भाजप आणि आरएसएसवर टीका केली. ते म्हणाले, भाजप आणि आरएसएस लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुक्ताईनगरात शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांचा जाळला पुतळा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. मुक्ताईनगर शिंदे गट आक्रमक होत मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात आदित्य ठाकरे यांचा पुतळा जाळला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा अन्... २१ लाख रूपये जिंका - अंनिस

लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि एकवीस लाख रूपये जिंका, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना केलं आहे.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. अनेक राजकीय नेते देखील ह्या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे अशी माहिती अंनिसने दिली आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी साठी अर्ज केला होता त्यांना दीड महिना उलटून गेल्यानंतर सुध्दा फोटोकॉपी मिळालेली नाही असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. परीक्षा विभागात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar : अपक्ष उमेदवार चक्क उंटावर बसून गेला फॉर्म भरायला

छत्रपती संभाजीनगरमधील साहेब खान पठाण हे अपक्ष उमेदवार सध्या चर्चेत आहेत. चक्क उंटावर बसून उमेदवारी अर्ज भरायला जातानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सुप्रीम कोर्टात नव्याने याचिका

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. ईडीने त्यांना अटक केल्याप्रकरणी ही याचिका आहे. झारखंड उच्च न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण केली आहे, मात्र अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Electoral Bonds : इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. या याचिकेत ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला आहे, त्या कंपन्यांची इडी आणि आयटी कडून चौकशी सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या कंपन्यांची एसआयटी स्थापन करून चौकशी केली जावी अशी याचिकेत मागणी केली आहे. ही याचिका कॉमन कॉज आणि CPIL ने दाखल केली आहे. ADR हे या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते आहेत.

Rahul Gandhi : काँग्रेसचा जाहीरनामा पाहून मोदींचं टेन्शन वाढलं

काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सोशल जस्टिस कॉन्क्लेव्हला उपस्थित आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, की काँग्रेसचा जाहीरनामा वाचून पंतप्रधान मोदी पॅनिक झाले आहेत. हा एक क्रांतिकारी जाहीरनामा आहे.

Telangana BJP Candidate : 'काँग्रेसने सगळं मुस्लिमांना दिलं तर 120 कोटी हिंदूंनी कुठे जायचं?' भाजप उमेदवाराचं वक्तव्य

तेलंगणामधील हैदराबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार सुभा माधवी लता यांनी ओवैसींवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीयांसाठी कित्येक स्कीम आणल्या आहेत. यातील एकाही योजनेवर हिंदू-मुस्लिम असं लिहिलेलं नाही. ओवैसी सारखे लोक जनतेच्या मनात विष कालवत आहेत. ते आणि काँग्रेस म्हणतात की देशातील सगळं मुस्लिमांना देऊ. मग 120 कोटी हिंदूंनी कुठे जायचं? असंही त्या म्हणाल्या.

EVM आणि VVPAT मॅटर प्रकरणात न्यायालयाचे निवडणूक आयोगाला सवाल

EVM आणि VVPAT मॅटर प्रकरणात न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि दिपांकर दत्ता यांच्या बेंचचे निवडणूक आयोगाला सवाल. न्यायालयाच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी निवडणूक अधिकारी नसल्यामुळे सुनावणी दुपारी दोन वाजता होणार आहे. न्यायालयाने हे प्रश्न विचारले आहेत -

  • सोर्स कोड आणि प्रोग्राम हा वन टाइम असतो का?

  • प्रोग्राम लोड झाल्यानंतर हा प्रोग्राम कोणत्या युनिट मध्ये होतो. ".. व्हीव्हीपॅट की इव्हीएम मशीनमध्ये होतो?

  • इव्हीएम स्टोरेज ४५ दिवस स्टोरेज असतं यात वाढ होऊ शकते का?

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पुण्यात होणार; तारीख समोर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पुण्यात होणार आहे. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा २५ एप्रिल रोजी प्रकाशित होईल. हॉटेल कृष्ण चैतन्य मध्ये प्रकाशन सोहळा पार पडेल.

Raj Thackeray : ..तर राज ठाकरेंना लोकसभेची जागा मिळाली असती

राज ठाकरेंनी जर आधी चर्चा केली असतील, तर त्यांना लोकसभेला जागा मिळाली असती. चर्चेला उशीर केल्यामुळे त्यांनी संधी गमावली. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्यास, विधानसभेमध्ये महायुतीत सहभागी होण्याची संधी राज ठाकरेंना मिळू शकते अशी माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे.

Mallikarjun Kharge : काँग्रेसने लपवलेला काळा पैसा अन् 15 लाख कुठायत? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

केरळमधील काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं, की ते प्रत्येक परिवाराला 15 लाख रुपये देतील. काँग्रेसने बाहेरच्या देशात लपवलेला काळा पैसा आपण परत आणू असंही ते म्हणाले होते. कुठे आहे हा पैसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Nashik: पोलिसांची मोठी कारवाई ; २२० सराईत गुंडांची हद्दपारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पाचही जिल्ह्यातून २२० सराईत गुंडांची हद्दपारी करण्यात आली असून, सुमारे २१ हजार गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

इंग्लिश चॅनेल ओलांडताना बोट उलटली, चिमुकलीसह पाच जणांचा मृत्यू

इंग्लिश चॅनेल ओलांडत असताना एक छोटी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान ही बोट निर्वासितांनी खचाखच भरलेली होती.

२५ दिवसानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आले यश

वसई किल्ल्यात मागील २५ दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला मंगळवारी (ता. २३) पहाटे जेरबंद करण्यात आले. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला आहे. परिसरात बिबट्याच्या वावर असल्याने अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मोदींची पुण्यातील सभा आता रेसकोर्सवर

मोदींची पुण्यातील सभा आता रेसकोर्सवर होणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी स.प. महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस कोर्स येथे सभा होण्यात असल्याचे भाजप तर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभा स्थळात बदल करण्यात आलेले आहे.

Latest Marathi News Live Update : आज राहूल गांधींच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार आहेत..दुसरीकडे शिखर बँक घोटाळा प्रकरणी EOW कडून अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी क्लीनचीट मिळाली आहे..वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, यामुळे देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.