भारताची नारी शक्ती प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहे. या नारी शक्तीकडे जगाचं लक्ष आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
मणिपूरमधील परिस्थितीबद्दल काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.
अमरावती येथील मोर्शी तालुक्यातील हिवरखेडा येथे एका हॉटेलमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत हॉटेलला आग लागली होती.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी आयोजित केलेली एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. बिहारचे मंत्री विजय कुमार चौधरी आणि डॉ अशोक चौधरी बैठकीनंतर बाहेर पडले आहेत.
Mumbai Crime News: सोशल मीडियाद्वारे भेटलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर अंमली पदार्थ पिऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका २१ वर्षीय तरुणीने केल्यानंतर मुंबईच्या वरळी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३७६ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
bomb threat call on a Spice Jet Flight: PS IGI (Indira Gandhi International Airport Police Station) विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी 24 जानेवारी रोजी दरभंगा ते दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी देणाऱ्या जय कृष्ण कुमार मेहता नावाच्या एका आरोपीला अटक केली. त्याने फ्लाइटला उशीर करण्यासाठी हा कॉल जाणूनबुजून केला होता, दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
Nitish Kumar: पाटण्यात बिहार भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे आता नितीश कुमार यांच्याबाबत काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या करिअप्पा परेड ग्राऊंडवर आज वार्षिक एनसीसी रॅलीमध्ये मानवंदना स्विकारली. 24 विदेशी देशांच्या युवा कॅडेडनी यावेळीच्या एनसीसी पीएम रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.
बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाबाबत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि मैनपुरीच्या सपा खासदार डिंपल यादव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सपा खासदार डिंपल यादव म्हणाल्या की, सीएम नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीसोबत राहावे, ते पंतप्रधान पदाचा चेहरा आहेत.
''मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले असे आज म्हणणे योग्य ठरणार नाही. मराठा समाजाला 1 जून 2004 च्या निर्णयाप्रमाणे 83 व्या कुणबी जातीत, कुणबी मराठा म्हणून दुरुस्ती सूचवली आहे. यानुसार 1967 पूर्वीचे पुरावे देऊन मराठा समाजातील व्यक्तीला ही कुणबीची वंशावळ सिद्ध करावी लागणार आहे.
त्यानंतर त्यांचे पणजोबा, खापर पणजोबा यांचे नातेसंबंध आणि आणि चार नातेवाईक कुणबीशी संबंधित असतील तर त्यांना व्हॅलिडीटी सर्टिफिकेट देण्यात येण्यार आहे.'' असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी मत व्यक्त केले आहे.
ओबीसी जन मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ.बी. डी.चव्हाण यांनी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावं अशी विनंती केली आहे
मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन केले आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट करत लिहिले की, ''श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !''
राज्याच्या वन खात्याचा भोंगळ कारभार नुकताच समोर आला आहे. या खात्यानं प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांचं नाव चुकीचं लिहिलं आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त मराठा समाजाला आपण न्याय मिळवून दिला, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दिघेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
चिपळूण विधानसभा मतदार संघातील प्रशांत यादव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यामुळं कोकणात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यात मदत होणार आहे.
नितीन गडकरी हे कुठेही असो, क्षेत्र कुठलाही असो विषय विदर्भाचा विकास झाला पाहिजे हाच उद्देश ठेवून ते सातत्याने काम करत असतात. नितीन गडकरींपूर्वी कोणी रस्ते मंत्री नव्हता का?नितीन गडकरी असो की देवेंद्र फडणवीस असो त्यांनी विदर्भाचा कायापालट केला. 1987 झाली मी गडचिरोली जिल्ह्यात संपर्कप्रमुख म्हणून होतो. त्यामुळं मी विदर्भातील सगळे जिल्हे पाहिलेले आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने २३ राज्याच्या प्रभरींची यादी जाहीर केली आहे. खासदार प्रकाश जावडेकर यांना केरळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बिहारच्या प्रभारी पदी विनोद तावडे कायम असतील.
सगेसोयरेंचा अध्यादेश मिळाल्यानंतर महाराष्ट्रभर मराठा आंदोलकांनी आंनदोत्सव सुरु केला आहे. लोणावळ्यात मराठा बांधवांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला. यावेळी गुलाल उधळण्यात आला. तसेच फटाके फोडण्यात आले.
ऑफर आली तरी राजकारणात जाणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. विजयाचा पताका हाती घेत जरांगे पाटील आंतरवली सराटी येथे परत निघाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या मुद्द्यावर आंदोलन मागे घेतले आहे हे माहिती नाही. पण, जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला.
सोमवारची वाट पाहा असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाचे दार ठोठावण्याचे संकेत दिले आहेत. सरकारच्या अध्यादेशाविरोधात सदावर्ते कोर्टात जाणार आहेत. त्यामुळे मराठा-सदावर्ते वाद पुन्हा पाहायला मिळू शकतो.
छगन भुजबळ यांनी आपले नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आज भुजबळ राज्य नागरी सहकारी बँक परिषद आणि एका कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलीय.उद्या याच मुद्यावर भुजबळ यांनी मुंबईत बैठक बोलवलीय आहे. सरकारच्या निर्णयावर भुजबळ आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल.
मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आज जरांगे पाटील यांच्यासर सर्व मराठा बांधव आपापल्या गावी परत निघत आहेत. आंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांच्या स्वागताची तयारी सुरु करण्यात आली आहे.
Gunratna Sadavarte: मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "मी मराठ्यांना दिलेली शपथ पूर्ण केली. "
Maratha Reservation: नुकतच मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारकडून काढण्यात आला. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारचं आभार मानलं. मात्र, यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारकडून देण्यात आलेला अध्यादेश नसून, मसुदा असल्याचे वक्तव्य भुजबळ यांनी केलं.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांना गावी परतताना जपून जाण्याची विनंती केली.
Maratha Reservation: ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राबाबतचा अध्यादेश सरकारकडून काढण्यात आला. यावेळी जरांगेंनी सरकारचे आभार मानलं. यावेळी ते म्हणाले की, "मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला. तो अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची. "
आऱक्षणाचा अध्यादेश दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, 'सगेसोयरे आरक्षणात यावे, यासाठी अध्यादेश महत्वाचा होता.'
मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने काढल्यानंतर मराठा समाजाने जल्लोष साजरा केला. त्यानंतर मनोज जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाल लावला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांचं उपोषण सोडलं आहे. आता थोड्याच वेळात मनोज जरांगे उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन करतील. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा नवा जीआर देखील जरांगेंना सूपुर्द केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. वाशी येथे आज मनोज जरांगे यांची विजयी सभा होत असून या सभेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे त्यांचे उपोषण सोडणार आहेत. यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीमध्ये दाखल झाले आहेत. तसेच काही वेळातच मुख्यमंत्री मनोज जरांगे यांच्या भेट घेणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजन हे मनोज जरांगे यांच्या विजयी सभास्थळाकडे पायी रवाना झाले आहेत.
नवी मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने आज आंदोलन संपवणार असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते आज उपोषण सोडणार आहेत. यादरम्यान मराठा आंदोलकांडून जल्लोष केला जात आहे. मनोज जरांगे यांची विजयी रॅली सुरू आहे. जरांगे सध्या मराठा बांधवांचे अभिवादन स्वीकारत आहेत. थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या उपस्थित विजयी सभा होणार आहे.
मनोज जरांगे सध्या मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी बाहेर पडले आहेत. त्यांच्याकडून मराठा बांधवांच्या अभिवादनाचा स्वीकार केला जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वाशीच्या दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात जरांगे आणि एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.
बिहारमध्ये राजकीय भूकंपाच्या चर्चेदरम्यान तेथील राजकीय परिस्थितीवर भाजपचे प्रदेश प्रभारी विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी बिहार भाजप नेत्यांची बैठक होत आहे असे तावडे म्हणाले आहेत.
पटणा येथे 27 आणि 28 जानेवारीला बिहार भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांची विजयी सभा वाशीमध्ये होणार आहे. येथे मराठा बांधवांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या सभेला उपस्थित असणार आहेत. यावेळी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जेसीबीच्या माध्यामातून फुले उधळण्यात येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताने ज्यूस घेऊन जरांगे पाटील उपोषण सोडतील. सोबतच मुख्यमंत्री स्वतः अध्यादेशाची प्रत जरांगे यांना सुपूर्द करणार आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या तिन्ही मोठ्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाशी येथे मनोज जरांगे यांना अध्यादेश सोपवण्यात येणार आहेत. यावेळी मनोज जरांगे यांची विजय सभा होणार आहे. या सभेत जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं असून मनोज जरांगे यांच्या मागण्या तीन तासांच्या चर्चेनंतर सरकारच्या शिष्टमंडळाने मान्य केल्या आहेत. यानंतर आज मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण यासह राज्य आणि देशातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.