Marathi News Update: दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update: दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर
Updated on

महाराष्ट्रातून मोठे उद्योग बाहेर कसे गेले, श्वेतपत्रिका आणण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

मागच्या काही काळात महाराष्ट्रातून मोठे उद्योग परराज्यात गेले होते. यासाठी श्वेतपत्रिका आणण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेच्या सभागृहात केली. विद्यमान सरकारमुळे टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क असे मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून लावण्यात आला होता. आदित्य ठाकरेंनी या प्रकरणात आपली भूमिका मांडली होती.

महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या धर्तीवर देण्यात येणार उद्योगरत्न पुरस्कार, पहल्या उद्योगरत्न पुरस्काराचे मानकरी रतन टाटा

महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना दिला जाणार आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरुचं, कल्याण स्टेशनवरील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरुचं आहे. नुकताच कल्याण स्टेशनवरील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण स्टेशन पाणी साचल्याचा व्हिडीओ देखील समोर आलाय.

मुंबई आणि उपनगर परिसरात देखील प्रचंड पाऊस कोसळतोय. बोरिवली स्थानकाच्या बाहेर देखील पाणी साचल्याची दृष्ये बघायला मिळाली आहेत.

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे मातीची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून विवाहितेचा मृत्यू

आजरा तालुक्यातील किणे येथे भिंत पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. तर महिलेचा पती आणि अन्य महिला जखमी झाले आहेत. सुनीता अर्जुन गुडूळकर असे मयत महिलेचे नाव आहे. तर अर्जुन गुडूळकर आणि वत्सला परसु गुडूळकर अशी जखमींची नावे आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ब्लाॅक संपला; वाहतूक सुरळीत सुरू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ब्लाॅक संपला आहे. आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक २ तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटवण्यात आली आहे.

विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आदिवासी आमदार राज्यपालांच्या भेटीला

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आदिवासी आमदार राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. मणिपूरमध्ये आदिवासी महिलेवर झालेल्या अन्यायाविरोधात ही भेट घेणार आहेत. भेटीवेळी सत्ताधारी विरोधी गटातील आदिवासी आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विधान भवनात

सना मलिक विभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेणार भेट घेणार आहेत. काल कप्तान मलिक यांनी पक्ष कार्यालयात नेत्यांच्या भेटीसाठी आले होते, मात्रा भेट झाली नाही.

परभणी जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांचे आर्थिक घोटाळाप्रकरणी निलंबन

परभणी जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॅा नागरगोजे यांनी कोरोना काळात केलेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांना निलंबन करत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत केली आहे.

मनसेने सायन पनवेल महामार्गावरील खड्ड्यात 'होडी' सोडत केलं आंदोलन

मनसेने सायन पनवेल महामार्गावरील खड्ड्यात 'होडी' सोडत आंदोलन केलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहे आहेत. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आक्रमक झाली आहे. मनसेच्या वाहतूक विभागाचे सरचिटणीस माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द टी जंक्शन येथे मनसेने अनोखे आंदोलन केलं आहे. या जंक्शनवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून मनसैनिकांनी या खड्ड्यात पालिका , एमएमआरडीए प्रशासणाचा जोरदार निषेध करण्यात आला. प्रशासनाच्या नावाच्या होड्या बनवून या खड्ड्यात सोडण्यात आल्या आहेत. तसेच खड्डे बुजले नाहीत तर या खड्ड्यात मत्स्यपालन व्यवसाय मनसे सुरू करेल अशी चेतावणी मनसेच्यावतीने देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मोठी भेट, किसान सन्मान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील सीकर येथे एका सरकारी कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी या लाभदायक योजनेअंतर्गत हा हप्ता जारी केला. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे, 2000 रुपये थेट देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक २ तासांसाठी राहणार बंद

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक २ तासांसाठी बंद राहणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटवण्यात येणार आहे.

निवळी घाटात कोसळली दरड, मुंबई -गोवा महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटामध्ये आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आलेत. दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील दोन्ही मार्गीकेवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

पुण्यातील नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

पुण्यातील नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना काही जणांना आढळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. हा मृतदेह पुरुष व्यक्तीचा असून त्याचे वय 55 ते 60 च्या आसपास असण्याची शक्यता आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्या उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

चंद्रशेखर बावनकुळेंनी उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो, आयुष्य मंगलमय राहो, ते शतायुषी होवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. आजच्या दिवशी सुद्धा विश्वगुरू यांच्याबद्दल त्यांनी चुकीची विधान केली, त्यांना स्मृतिभ्रंश झाला, त्याला अल्झायमर म्हणतात असंही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

संसद भवनातील कार्यालयात आज 'INDIA'तील पक्षाच्या नेत्यांची बैठक

संसद भवनातील कार्यालयात आज 'INDIA'तील पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. यामध्ये अनेक नेत्यांनी काळे कपडे परिधान करत मणिपूर प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.

पुण्यातील मनपा पुलाजवळ आढळला मृतदेह 

पुण्यातील मनपा पुलाजवळ पोलीसांना मृतदेह आढळला आहे. पोलीस आधिक तपास करत आहे.

काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता ठरण्याची शक्यता

आज काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी बैठक घेऊन बैठकीत विरोधी पक्ष नेते पदावर चर्चा होणार असल्याची माहीती आहे.

अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयाच आज ठाण्यात होणार लोकार्पण

अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयाच आज ठाण्यात लोकार्पण होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर अजित पवार गटाचे नवे कार्यालय असणार आहे. ऐकेकाळी आव्हाडांचे निकटवर्ती मानले जाणारे आनंद परांजपेंच्या नेतृत्वाखाली आज शक्तीप्रदर्शन पार पडणार आहे. कार्यालय लोकार्पणाच्या निमित्ताने अजित पवार गटाचे ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

मुंबई नाशिक महामार्गावर खड्डेच खड्डे, वाहतुकीवर मोठा परिणाम

मुंबई नाशिक महामार्गावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. सामान्यांना याचा नाहक त्रास सहन कारावा लागत आहे.

पुढील काही तासांत मुंबईसह 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पुढील काही तासांत मुंबईसह 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यातही आज अतिमुसळधार पाऊस बरसणार असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.