दारु घोटाळ्यातील संशयित आरोपींना मदत करण्यासाठी ५ कोटींची लाच घेतल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
छत्तीसगडच्या सुरगुजामध्ये ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे जाणवले आहेत.
केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की, जनगणना कायदा, 1948 केवळ केंद्र सरकारलाच जनगणना करण्याचा अधिकार देतो.सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने सांगितले की, भारताच्या संविधानाच्या आणि लागू कायद्याच्या तरतुदींनुसार एससीएस/एसटीएस/एसईबीसी आणि ओबीसींच्या सक्षमीकरणासाठी सर्व सकारात्मक कृती करण्यास केंद्राने वचनबद्ध आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, "नरेंद्र मोदींना खुर्चीपेक्षा समाजाची जास्त चिंता वाटते."
तेजस्वी यादव यांना गुजराती लोकांची बदनामी केल्याप्रकरणी अहमदाबाद कोर्टाकडून समन्स बजावण्यात आले आहे.
शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी मिशन आदित्यवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "हा एक अभ्यास प्रकल्प आहे, ते 15 लाख किलोमीटर अंतरावरुन सुर्याचा अभ्यास करणार आहेत... हा एक चांगला प्रकल्प आहे."
भारताने चंद्रावर पाठवलेले प्रज्ञान रोव्हर ४ मीटर व्यासाच्या खड्ड्यात अडकले होते. यावर त्याला मागे फिरण्याची कमांड देण्यात आली. रोव्हर आता नवीन मार्गावर चालत आहे.
चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर इस्रोने पुढच्या मोहिमेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मिशन आदित्य एल-१ २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजून आकाशात झेपावणार आहे. मिशन आदित्यच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास करणार आहे.
19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला जीओ एअर फायबर लाँच केले जाईल अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज बोर्डाने संचालक मंडळावर ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे; त्यांना कंपनीचे गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त केले. नीता अंबानी बोर्डातून पायउतार होणार आहेत. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील.
उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहयला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी पंढरपूर-सातारा मार्गावर उपरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. उजनी धरणातून पाणी सोडून पीकं वाचवावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पुण्यातील गणेश मंडळांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व मिरणणुकी वेळेत निघतील. मिरवणुका वेळेत पार पडाव्यात यासाठी विनंती केल्याचे पुण्यता झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच गणपती उत्सवादरम्यान पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत चालु राहील अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली आहे.
ठाणेः बीड येथील अजित पवार यांच्या उत्तर सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे शरद पवार यांच्या गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. छगन भुजबळ यांच्याविरोधात ठाण्यामध्ये शरद पवार गटाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. टीकेच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड समर्थकांनी भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
गुजरातची राजधानी गांधीनगर येथे २६ वी पश्चिम क्षेत्रिय परिषद सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत. तसेच यावेळी गोवा आणि गुजरात या राज्यांचे प्रतिनीधी देखील या बैठकीला उपस्थित आहेत.
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्य आज देखील न्यायालयात गैरहजर राहिले. वाकिल रिझवान मर्चंट यांचे नातेवाईक वारल्याने वाकिलच आज हजर राहिले नाहीत. यानंतर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी सुनावणी तहकूब केली असून आता पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.
आज आठवड्याचा पहिला दिवस ठाण्यातील चाकरमानी मुंबईच्या दिशेने कामावर जाण्यास निघाले आणि त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ठाण्याच्या तीन हात नाका ब्रिज, आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या 2 ते 3 कोलोमीटर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. टोल नाका आणि अवजड वाहनामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईच्या दिशेने जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहने जागच्या जागी उभी आहेत. यामुळे चाकरमान्यांना आपल्या कार्यालयाकडे जाण्यास उशीर होत आहे. ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कोपरी येथील टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांना टोल नाक्यावरील होणारे आताचे ट्राफिक टोल न घेता तात्काळ पुढे सोडण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवनियुक्त कर्मचाऱ्यांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी पंतप्रधानांनी नवनियुक्त जवानांनाही संबोधित केले.
देशभरात 45 ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाद्वारे केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (सीआयएसएफ) यांची भरती केली आहे.
नवी दिल्ली - बिहार सरकारनं केलेल्या जातीय जनगणनेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. न्यायमुर्ती संजिव खन्ना आणि न्यायमुर्ती एसवीएन भट्टी यांच्या बेंचसमोर सुनावणी सुरू आहे. 1 ऑगस्टला पटना उच्च न्यायालयाने जातीय जनगनेना विरोध केलेल्या याचिका फेटाळून लावत सरकारला जातीय जनगणना करण्यास परवानगी दिली होती.
काय आहे प्रकरण?
बिहार जातनिहाय जनगणनेच्या विरोधात बिहार उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकेत राज्यसरकारला जातनिहाय जनगणना करण्याचे अधिकार नसल्याचं याचिकाकर्त्याच म्हणणं आहे. यासाठी ५०० कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.
जातनिहाय जनगणना करणं म्हणजे करदात्यांच्या पैश्याची नासाडी आहे असं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. मात्र, बिहार उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळलेस नंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल करत तात्काळ जनगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने तात्काळ जनगणना थांबवण्याची मागणी फेटाळली होती. तसंच सुनावणीवेळी सॉलिटरी जनरल तुषार मेहता यांनी काही कागदपत्र सादर करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला होता. बिहारमध्ये ७ जानेवारीला जातनिहाय जनगणनेला सुरूवात झाली आहे.
सध्या राज्यभर तलाठी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा सेंटरवर गोंधळ उडल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये मुंबईतील पवई आयटी पार्क सेंटरवर देखील असाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. परीक्षेसाठी आठ वाजता परीक्षा केंद्रावर पोहचले. वेळेपूर्वीच सेंटरचे गेट बंद केल्याने वेळेवर पोहचलेल्या विद्यार्थांना गेटवर थांबावे लागले.
अभिनेत्री जान्हवी कपूरने आंध्र प्रदेश तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना करत दर्शन घेतलं.
काल रात्री जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरल्यानंतर नीरज चोप्राच्या कुटुंबातील सदस्यांनी एकच जल्लोष केला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान या नियुक्त्या मिळालेल्या लाभार्थ्यांना संबोधित देखील करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.