Marathi News Update: लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर ते महाराष्ट्र अधिवेशनाच्या अपडेट वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
loksabha
loksabha
Updated on

दिल्ली सेवा विधेयक संविधान आणि त्याच्या मूलभूत संरचनेच्या विरोधात - असदुद्दीन ओवैसी

दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. हे दिल्ली सेवा विधेयक संविधान आणि त्याच्या मूलभूत संरचनेच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत बिहारमधील एनडीए खासदारांची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी एनेक्सी संसद भवनात बिहार एनडीए खासदारांची बैठक घेत आहेत

दिल्ली सरकारचे राष्ट्रीय राजधानी प्रदेश (सुधारणा) विधेयक लोकसभेत मंजूर

दिल्ली सरकारचे राष्ट्रीय राजधानी प्रदेश (सुधारणा) विधेयक, 2023 लोकसभेत मंजूर झाले.

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाला न्यायालयाचा समन्स

नरेश दहिया (कुस्ती प्रशिक्षक) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाला समन्स बजावले. न्यायालयाने पुनिया यांना ६ सप्टेंबर रोजी आरोपी म्हणून समन्स बजावले आहे.

तक्रारदार नरेश दहिया यांनी फौजदारी बदनामीच्या तक्रारीद्वारे म्हटले आहे की 10 मे रोजी जंतरमंतर येथे झालेल्या निषेधादरम्यान बजरंग पुनिया यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केली.

मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींनी घेतली खासदारांची बैठक

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात पक्षाच्या केरळ खासदारांची बैठक घेतली.

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगासंदर्भात विधानपरिषदेत श्वेतपत्रिका सादर

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत श्वेतपत्रिका सादर केली

विधान परिषद अर्ध्या तासासाठी तहकूब

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याचे फोटो सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर बातचित केल्याचं सिद्धरामय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष सबंध चांगले असायला हवेत- जयंत पाटील

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष सबंध चांगले असायला हवेत. माझ्या मनात विचार आला की विरोधी पक्षाच्या खुर्चीची पूजा करायला पाहिजे. कारण त्या खुर्चीवर माणूस बसला की पुढच्या काही दिवसांत तो माणूस थेट पुढच्या खुर्चीवर जातो. मला मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं की कोणती पूजा करायला हवी. आता पायगुणाचा देखील फायदा होतो कारण मागे ते काही महिने विरोधी पक्षनेते झाले आणि आमची सत्ता आली, आता देखील हेच होईल असं सभागृहात जयंत पाटील बोलत होते.

'...पण तुमचे आमच्याकडे लक्ष नाही', अजित पवारांचा जयंत पाटलांना टोमणा

विरोधी पक्ष नेते वर बोलत आहेत. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष नाही असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर माझं आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री यांचं तुमच्याकडे लक्ष आहे. पण तुमचे आमच्याकडे लक्ष नाही असं अजित पवार यावेळी सभागृहात बोलताना म्हणाले आहेत.

'विरोधी पक्ष नेते जागेवर असतील तर...', जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

विरोधी पक्ष नेते खंबीर असतील जागेवर असतील तर जनतेचा प्रश्न न्याय मिळवून देऊ शकतो असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला आहे.

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील देखील काही वर्ष विरोधी पक्षनेत्या होत्या- अजित पवार

मुख्यमंत्र्यांकडून जशा अपेक्षा असतात, तश्याच अपेक्षा विरोधी पक्षनेते यांच्याकडून देखील असतात. अनेक महत्वाच्या व्यक्तीनी हे पद भूषवलं आहे. देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील झाल्या. त्या आधी काही वर्ष विरोधी पक्षनेत्या होत्या असं अजित पवार म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेता राज्याचा भावी मुख्यमंत्री असतो- CM शिंदे

सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक आठवण सांगितली आहे. एकनाथ शिंदेंना आर.आर. पाटील यांनी सांगितलं होतं, की राज्याचा विरोधी पक्षनेता राज्याचा भावी मुख्यमंत्री असतो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी आज मुख्यमंत्री आहे असंही शिंदे यावेळी म्हणालेत.

विदर्भात शिवसेना वाढवण्याचे काम विजय भाऊंनी केले, CM शिंदेंनी केलं नव्या विरोधी पक्ष नेत्याचं कौतुक

विदर्भात शिवसेना वाढवण्याचे काम विजय भाऊंनी केले म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नव्या विरोधी पक्ष नेत्याचं कौतुक केलं आहे. पुढे देखील ते चांगले काम करतील, चांगले निर्णय घेतील असं शिंदेंनी म्हंटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी घोषणा

विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या नावाची घोषणा सभागृहात केली आहे.

कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा- जयंत पाटील 

कुरुलकर प्रकरणी विरोधक सभागृहात आक्रमक झाले आहेत. हा देशद्रोहाचा गुन्हा असल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. याकडे आम्ही सरकारचे लक्ष वेधत असल्याचे ते म्हणाले. कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यावर चार्जशीट झाली आहे, कोर्ट कारवाई करेल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हंटलं आहे.

नितीन देसाई यांचा स्टुडिओ सरकार ताब्यात घेणार? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीतील महत्वाचे नाव होते. मराठी माणसाला अभिमान वाटावे असे त्यांनी काम केले. दिल्लीतील आपले चित्ररथ त्यांच्या माध्यमातून करायचे. तर त्याच्या आत्महत्येची सखोल चौकशी केली जाईल. तर कुठेही जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती केली का?, नियमांबाहेर जाऊन व्याज लावले का? याची चौकशी सरकार करेल. कायदेशीर बाजू तपासून घेऊ. स्टुडीओ ताब्यात घेण्या बाबत काय करता येईल याबाबत कायदेशीर बाब तपासून घेऊ असं फडणवीस म्हणाले आहेत.

इंदापूरमध्ये ८० फुट विहीरीत अडकलेल्या ४ जणांचा तब्बल ३० तासांपासून शोध सुरुच

इंदापूरधल्या म्हसोबाचीवाडी येथे ८० फुट विहीरीत ढिगाऱ्याखाली कामगार अजूनही अडकलेले आहेत. मंगळवारी रात्री विहिरीची रिंगंचे बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा पडला. चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज पुन्हा एनडीआरएफकडून शोधकार्याला सुरुवात झाली आहे. एनडीआरएफचे जवान विहिरीत जाऊन शोध घेत आहेत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक उर्से टोल नाका आणि खंडाळा घाटात थांबवण्यात आली आहे. तर काही वाहतूक ही लोणावळ्यातुन जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वळविण्यात आली आहे.

अलाहाबाद हायकोर्टाची ज्ञानव्यापी मस्जिद सर्व्हेला अखेर परवानगी

इलाहाबाद हायकोर्टाने ज्ञानव्यापी मस्जिद सर्व्हेला अखेर परवानगी दिली आहे.

विधानसभेत बुलढाणा दुर्घटनेच्या मुद्द्यावर चर्चा

विधानसभेत बुलढाणा दुर्घटनेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. महामार्गावर वाहन चालकाने नियमांचं उल्लघंन केल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. अपघात टाळण्यासाठी सरकारच्यावतीने कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. चालकांना विशेष ट्रेनिंग द्यावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.

चिपळूणमधील भिडेंची सभा रद्द, भिडेंच्या सभेला प्रशासनाची परवानगी नाही

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसात राज्याचे राजकारण तापले आहे. एकापाठोपाठ एक सभांमध्ये भिंडेंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.