अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटना बांधणीला सुरुवात केली जात आहे. अशातच पक्ष कार्यालय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ए फाय म्हणजे प्रतापगड हा बंगला देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे मुंबईचे माजी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि इतर पदाधिकारी हे बंगल्यात पोहोचलेले आहेत.
आम्ही जनतेत जाऊ आणि सिद्ध करु. रात्री पासून वेगळ्या घटना घडल्या . रात्री 12 वाजता पत्रकार परिषद घेतली गेली. आम्ही घेतलेला निर्णय राज्याचा आणि राष्ट्रवादीच्या भल्याचा निर्णय आहे.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या नेत्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याकडे तशी शिफारस केली आहे.
माझे कार्यकर्ते माझ्यासोबत- शरद पवार
समाजात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न
सातारा कोल्हापुरने राष्ट्रवादीला बळ दिलं
महाराष्ट्राचा पुन्हा झंझावती दौरा करणार
भाजपचा समाजात वेगळं वातावरम निर्णाण करण्याचा प्रयत्न
नव्या पिढीला नाउमेद होऊ देणार नाही
५ जुलै रोजी राष्ट्रवादी पक्षाची यशवंत चव्हाण सेंटरला होणार बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांना 5 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्याच दिवशी दोन्ही बैठकांचं नियोजन करण्यात आलं आहे.
"अजितदादांमुळेच मी राष्ट्रवादीत; मी दादांसोबतच" राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांचं स्पष्टीकरण, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित दादांनी हा निर्णय घेतला आहे. मी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले आहे.
जवळपास तासभरानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील बैठक संपली आहे. यानंतर आता थोड्याच वेळात अजित पवार हे पत्रकारपरिषद घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खाते वाटपाबद्दल चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांसाठी मंत्रालयात विशेष कॅबिन
उपमुख्यमंत्री पदासाठी अजित दादा पवार यांनी काल शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात त्यांच्या कार्यालयासाठी आता मंत्रालयाने अधिकाऱ्यांनी लगबग ही सुरू केलेली आहे. मंत्रालयातल्या सहाव्या माळ्यावरील मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव त्याचबरोबर सातव्या माळ्यावरील उपमुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क कार्यालय या दोन कार्यालयांपैकी एक कार्यालय हे अजित दादांना मिळण्याची शक्यता आहे.
देवगिरीवरील दीड तासाच्या बैठकीनंतर सागरावर बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एकाच गाडीतून सागर बंगल्यावर रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खाते वाटपाबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार ? यावर बैठकीत चर्चा सुरू
राज्यातील या घडामोडींचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. राजकारण किळसवाणं होतं चालले आहे. राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे.
सामान्यांच्या लोकशाहीचा आधिकार हिसकावण्याचा प्रयत्न - शरद पवार
लोकशाहीचा आधिकार जतन केला पाहिजे
आता आवाज माझ्या एकट्याचाच
महाराष्ट्रात देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
एकोप्यानं राहणाऱ्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
देशभरातील विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याची काम सुरू
फोडाफोडीच्या भाजपच्या वृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले.
शरद पवार यांनी प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. आता शरद पवारांसोबत श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करुन ते राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. प्रीतीसंगमवार कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. शरद पवार यांच्या समर्थनाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत.
प्रितीसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ते राजकीय घडामोडींवर भाष्य करणार आहेत.
अजित पवार गटाचा प्रतोद ठरला आहे. अनिल पाटील हे आता अजित पवार गटाचे प्रतोद असणार आहेत. खुद्द अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती ABP माझा शी बोलताना दिली आहे.
शरद पवारांना मी गुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन करणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटलं आहे. १० दिवसात पिच्यर क्लिअर होणार आहे. कायदेशीर कारवाईचा आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही. आता मागे वळून बघणार नाही असंही ते म्हणालेत.
शरद पवार कराडमध्ये दाखल झाले आहेत. ते पहिल्यांदा यशंवतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पवारांची सभा होणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचा विरोधी पक्षनेता तावडे ठरवणार आहेत. मंत्री मनसुख मंडवीय आणि विनोद तावडे यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजकारणात तावडे सक्रिय झाले आहेत.
बेंगलोरला होणारी विरोधी पक्षांची बैठक रद्द झाली आहे. 17 आणि 18 जुलैला ही बैठक होणार होती. संसदेच्या अधिवेशनंतर ही बैठक होणार आहे. अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांचे पाचवडहून साताराकडे प्रस्थान, आमदार मकरंद पाटील शरद पवार यांच्या सोबत आहेत.
कराडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार आहे. शरद पवार थोड्याच वेळात कराडमध्ये दाखल होतील. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि रोहीत पवार हे ही नेते असणार आहेत.
सोमवारी सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली होती. एसपीजीने दिल्ली पोलिसांना याची माहिती देताच सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पहाटे पाचच्या सुमारास एसपीजीने नवी दिल्ली पोलिसांना या संदर्भात माहिती दिली, त्यानंतर नवी दिल्ली परिसरातील सर्व अधिकारी आणि भरारी पथकांनी ड्रोनचा शोध सुरू केला.
राज्यात काल झालेल्या राजकीय भूकंपाची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती. वरिष्ठांनी बोलून निर्णय घेतला आहे. त्यात आम्ही काय बोलणार. घरातल्या लोकांना कायम शेवटच्या पंगतीत जागा मिळते असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी आपल्या आमदारांचा लवकरच शपथविधी होईल, असं सूचक विधान केलं.
बुलढाण्यात प्रेत जळत असताना शपथविधी पार पडला- संजय राऊत
अपघाताला 1 दिवस उलटला नाही तोवर शपथविधी पार पडला
तिकडे चिता जळत होत्या इकडे मुंबईत मंत्री पेढे वाटत होते.
24 तासही यांना थांबता आलं नाही, मात्र या निर्णयाचे परिणाम दूरगामी होतील.
अजित पवारांच्या निर्णयावर आम्ही बोलणार नाही.
भाजप आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी करार
रविवारचा दिवस राजकारणातील काळा दिवस आहे, भ्रष्टाचाराची व्याख्या काल लिहली गेली. याचा परिणाम भाजपला भोगावे लागणार आहेत.
राज्यात जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागांत आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक कोल्हापूरसह राज्यभरात रविवारी रिमझिम पाहायला मिळाली. हवामान विभागाने आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात असून या भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
"भाजप ज्यापद्धतीने शिवसेना फोडली तसाच प्रयत्न राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल, असा अंदाज होतो," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज दिली आहे.
अजित पवारांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर आज बैठकी आणि पत्रकार परिषदा यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.