Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
Updated on

लोकसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे आमदार-खासदारांना सूचना

मुख्यमंत्र्यांनी आज महायुतीच्या नेत्यांची बैठक वर्षावर बोलावली होती. यावेळी त्यांनी आमदार-खासदारांना लोकसभेसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. (पूर्ण बातमी येथे वाचा)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैना पाक सीमेवर सतर्क

येत्या काही दिवसात देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर सतर्क झालं आहे. पाकिस्तान सीमेवर लष्करांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या काळात पाकिस्तानकडून घुसखोरीची शक्यता व्यक्त करण्यात आलीये.

कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा; शिंदेच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकार सक्रिय झाल्याचं दिसत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (वाचा संपूर्ण बातमी)

वर्षा बंगल्यावर महायुतीची थोड्याच वेळात बैठक

वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला तिन्ही पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षण आणि येणाऱ्या निवडणुका याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

बीडमधील परिस्थिती निवळली

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीड शहरात हिंसक आंदोलन करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बीडमध्ये परिस्थिती पूर्व पदावर येऊ लागली आहे.

मोठ्या संख्येने आमदार आमच्या सोबत आल्याने सुप्रिया सुळेंना नैराश्य- तटकरे

नवी दिल्ली- आम्ही सुद्धा पिटीशन दाखल केली आहे. संसदरत्न, श्रीनिवास आणि फौजिया खान यांच्याबाबत पिटीशन केली आहे. आमचं देखील तेच म्हणणं आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पिटीशन दाखल केली. संसदरत्न नेहमीच अदृश्यशक्ती असा उल्लेख केला आहे. मोठ्या संख्येने आमदार आमच्यासोबत आल्याने त्यांना नैराश्य आलं असेल. शपथविधीच्या दिवशी डॅा अमोल कोल्हे आमच्या सोबत होते.. त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला समर्थन दिलं, असं सुनिल तटकरे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांचा अशक्तपणा वाढला

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना उलटी आणि चक्कर आली आहे. किडनी आणि लिव्हरला सूज आलीये. त्यांना अशक्तपणा आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिंदेंनी बोलावली सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. काल जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारकडून युद्ध पातळीवर काम सुरु झाल्याचं दिसतंय.

पुणे विद्यापीठात डाव्या संघटना अन् भाजप आमने-सामने 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजप आक्रमक झाल्या असून डाव्या संघटनांचा लाल झेंडा पायाखाली टाकून भाजप युवा मोर्चाकडून निषेध व्यक्त केला. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केल्याने विद्यापीठात वातावरण तापलं आहे. दरम्यान येथे पोलीस बंदोबस्त वाढवला असून डाव्या संघटनांकडूनही इंकलाब जिंदा बादच्या घोषणा दिल्या. यावेळी मोठा गोंधळ सुरू असून डाव्या संघटना आणि भाजप आमने सामने आल्या आहेत.

पुणे विद्यापीठ परिसरामध्ये दोन संघटना आमने-सामने

पुणे विद्यापीठ परिसरामध्ये दोन संघटना आमने-सामने आले असून भाजप युवा मोर्चा आणि एसएफआयमध्ये बाचाबाची सुरु झाली आहे.

शाहरुख  वाढदिवशी 'मन्नत' बाहेरून ३०हून अधिक मोबाईल चोरीला

बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानच्या वाढदिवसानिमीत्त त्याचे घर 'मन्नत' बाहेर काल जमलेल्या चाहत्यांचे 30 हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याची एक झलक पाहण्यासाठी तेथे जमलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीनंतर अतुल सावे फडणवीसांना भेटणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर अतुल सावे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगे पाटील यांच्यासोबत केलेल्या चर्चेची माहिती मंत्री सावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. आज सायंकाळी महायुतीच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चेची शक्यता आहे.

ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये सहा जण अडकले; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ससून रुग्णालयातील लिफ्ट अडकल्याची घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी अग्निशमन दल रुग्णालयात दाखल झाले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

सुनिल तटकरेंना अपात्र करा; सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीलं आहे. अजित पवार यांच्या गटासोबत गेलेले खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलै ला याचिका दाखल केली होती, मात्र त्यावर कुठलीही करावी केली नाही. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची घेण्याची विनंती सुळे यांनी केली आहे. घटना आणि लोकशाही तत्वे टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल दिला पाहिजे असे पत्रात म्हटले आहे. एकीकडे राज्यात आमदार अपात्र प्रकारांचा विषय विधानसभा आद्यक्षांच्या समोर सुरू असताना खासदार अपात्रतेप्रकरणी सुळेंनी पत्र लिहीलं आहे.

वाहतूक कोंडीला त्रस्त झालेले पुणेकरांचा मूक मोर्चा  

पुणे : वाहतूक कोंडीला त्रस्त झालेले पुणेकरांचा वाहतुक कोंडी विरोधात मूक मोर्चा काढत आंदोलन केलं आहे. पुण्यातील चांदणी चौक परिसरातील अनेक इमारतीत राहणारे नागरिक मोठ्या संख्येने या मूक मोर्चेत सहभागी होणार आहेत.

जालना, छत्रपती संभाजीनगर येथील इंटरनेट सेवा पूर्ववत

मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर विस्कळीत झालेली एसटी बस सेवा पूर्ववत झाली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्याचा वेळ देत आंदोलन स्थगित केलं आहे. यानंतर आज सकाळपासून एसटी बससेवा सुरू झाली आहे. तसेच छत्रपती संभाजी ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा देखील पूर्ववत झाली आहे. तर जालना येथील इंटरनेट सेवा मध्यरात्रीपासून पूर्ववत झाली आहे.

ललित पाटील अन् त्याच्या साथिदारांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई

ललित पाटील ड्रग प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात ललित पाटील आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील तरतुदी लावल्या. पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपासानंतर मोक्का लावण्यात आला आहे. पाटील सध्या ७ नोव्हेंबरपर्यंत पुणे पोलिस कोठडीत आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.